Aurangabad: जोरजोरात ओरडणारे सोमय्या, चित्रा वाघ आता कुठे आहेत, सत्तेसाठी एवढी लाचारी: जलील
Aurangabad News: केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर फक्त राजकीय फायद्यासाठी केला जात असल्याचा आरोप जलील यांनी केला आहे.
![Aurangabad: जोरजोरात ओरडणारे सोमय्या, चित्रा वाघ आता कुठे आहेत, सत्तेसाठी एवढी लाचारी: जलील maharashtra News Aurangabad News Where are Somayya and Chitra Vagh who screamed loudly Commentary by Imtiaz Jalil Aurangabad: जोरजोरात ओरडणारे सोमय्या, चित्रा वाघ आता कुठे आहेत, सत्तेसाठी एवढी लाचारी: जलील](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/03/28/9e99c1b44f286dec8a60a273329e4119_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Imtiaz Jaleel: देशातील केंद्रीय यंत्रणा आणि राज्यातील सत्तांतरावरून एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी भाजपवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. सोबतच भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि चित्रा वाघ यांच्यावर जोरदार टीकाही केली आहे. राज्यात भाजपची सत्ता नसतांना जोरजोरात ओरडणारे किरीट सोमय्या (Bhagwat Karad) आणि चित्रा वाघ (Chitra Wagh) आता कुठे आहेत असा खोचक टोलाही जलील यांनी लगावला आहे. औरंगाबादमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेतून त्यांनी ही टीका केली आहे.
यावेळी बोलतांना जलील म्हणाले की, मी सुरवातीपासूनच बोलत आहे की, ईडीचा उपयोग फक्त राजकीय फायद्यासाठी केला जात आहे. त्यामुळे सीबीआय, ईडी, आयकर विभाग यांचा ज्याप्रकारे दुरुपयोग होत आहे ते देशासाठी खूपच घातक आहे. आता शिंदे-फडणवीस सरकारमध्ये जे मंत्री झाले आहेत त्या लोकांच्याविरुद्ध जोरजोरात ओरडणारे किरीट सोमय्या साहेब आता गप्प झाले आहे. महिलांवर अत्याचार झाला आहे त्यामुळे आम्ही हे करणार, ते करणार म्हणणाऱ्या चित्रा वाघ यासुद्धा आता गप्प बसल्या आहेत. म्हणजे इतकी लाचारी कशासाठी तर फक्त सत्तेसाठी असल्याचा टोला जलील यांनी लगावला आहे.
मोदींना राखी बांधल्याने भावना गवळींवरील ईडीची कारवाई टळली?
याचवेळी शिवसेना खासदार भावना गवळी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बांधलेल्या राखीवरून सुद्धा जलील यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. बहुतेक आम्हाला संधी मिळाली असती किंवा येणाऱ्या अधिवेशनात आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारणार आहे की, ज्या भावना गवळींच्या विरोधात ईडीची कारवाई झाली आहे त्यांचे आता तुम्ही भाऊ झाला आहात. त्यामुळे आता भाऊ त्यांचे रक्षण करणार आहे. आता कुणीही त्यांना हात लावणार नाही, ईडी किंवा कोणतेही तपास यंत्रणा आता येणार नाही, असे जलील म्हणाले.
दानवे-करडांवरही निशाणा
याचवेळी जलील यांनी केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड (Bhagwat Karad) आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्यावर सुद्धा निशाणा साधला. ममता बनर्जी रेल्वे मंत्री असतांना सर्वकाही त्यांनी आपल्याकडे नेलं होतं. लालूप्रसाद यांनी सुद्धा तेच केले. आता रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे आहेत त्यामुळे तुम्हीतरी आमच्यासाठी काहीतरी करा असा टोला जलील यांनी लगावला. तर संपूर्ण देशाच्या बँका माझ्या हातात असल्याचं सांगणाऱ्या भागवत कराड यांनी औरंगाबाद आणि गावात तरी बँका सुरु कराव्यात. काही नवीन योजना आणाव्यात, असाही टोला जलील यांनी लगावला.
महत्वाच्या बातम्या...
Aurangabad Bhondubaba : औरंगाबादच्या 'भोंदूबाबा'ची अखेर पोलिसांकडून चौकशी, जवाबही घेतला
Imtiyaz Jalil: केंद्राची आदर्श ग्रामविकास योजना फालतू, उगाच टाईमपास; जलील यांची टीका
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)