(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मोठी बातमी! शिंदे सरकार नामांतराचा आणखी एक निर्णय घेणार, आता दौलताबाद...
Aurangabad News: दौलताबादच्या किल्ल्याचे नाव अधिकृतरीत्या देवगिरी किल्ला करण्याचा प्रस्ताव सरकारकडे दाखल करणार: मंगल प्रभात लोढा
Aurangabad News: औरंगाबादसह उस्मानाबाद जिल्ह्याच्या नामांतराच्या निर्णनंतर आता शिंदे सरकार आणखी एक नामांतराचा निर्णय घेणार आहे. कारण औरंगाबाद जिल्ह्यातील दौलताबादच्या किल्ल्याचे (Daulatabad Fort)
नाव अधिकृतरीत्या देवगिरी किल्ला (Devagiri Fort) करण्याचा प्रस्ताव सरकारकडे दाखल करणार असल्याची माहिती पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली आहे. लोढा हे दोन दिवसीय औरंगाबाद दौऱ्या असून, दौलताबाद किल्ल्यावर त्यांनी आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावत ही घोषणा केली आहे.
यावेळी बोलतांना लोढा म्हणाले की, हा पूर्वी देवगिरी किल्ला होता,अजूनही देवगिरी किल्लाच आहे. मात्र काही लोकं याला दौलताबाद किल्ला म्हणूनच ओळखतात. त्यामुळे या किल्ल्याचे नाव आता परत देवगिरी किल्ला करावे असा ठराव आम्ही सरकारपुढे ठेवणार असल्याच पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले. तसेच यापुढे आता दरवर्षी या किल्ल्यावर 17 सप्टेंबरला भारत माता मंदिर येथे ध्वजारोहण कार्यक्रम पार पडेल. तर पर्यटन विभाग आणि इतर प्रशासकीय विभागाच्यावतीने मोठा कार्यक्रम दरवर्षी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने करण्यात येणार असल्याची माहिती लोढा यांनी दिली आहे.
असा आहे दौलताबादचा (देवगिरी) किल्ला...
- औरंगाबादपासून सुमारे 15 किलोमीटरवर दौलताबाद गावाजवळ हा किल्ला आहे.
- किल्ल्याचा डोंगर 600 फूट उंचीचा आहे.
- किल्ल्याच्या भोवती 50 फूट रुंदीचा खोल पाण्याने भरलेला खंदक पाहायला मिळतात.
- विशेष म्हणजे खंदकाच्या तळापासून अंदाजे 150 ते 200 फूट उंचीचा कडा तासून काढलेला आहे.
- किल्ल्याच्या तळापासून तयार करण्यात आलेल्या कडा असा आहे की, साधा सापही वर चढू शकत नाही.
- किल्ल्यात प्रवेश केल्यावर उजव्या बाजूस एक मनोरा असून, त्याला ‘चांदमिनार’ म्हणतात.
- या मनोऱ्याची उंची 210 फूट असून, बुंध्याचा परीघ 70 फूट असल्याची नोंद आहे.
- याच किल्यात एक 180 स्तंभाचे हेमाडपंती मंदिर सुद्धा आहे.
- याच मंदिरासमोरच हत्ती हौद नावाचा 150 फूट लांब, 100 फूट रुंद आणि 23 फूट खोल असा विस्तीर्ण जलाशय पाहायला मिळतो.
महत्वाच्या बातम्या...