वारकऱ्यांपाठोपाठ महानुभाव पंथाकडूनही सुषमा अंधारेंना विरोध, मतदान न करण्याची घेतली शपथ
Sushama Andhare: सुषमा अंधारे यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी देखील यावेळी महानुभाव पंथाकडून करण्यात आली आहे.
Sushama Andhare: ठाकरे गटाच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे (Sushama Andhare) यांनी हिंदू देवी-देवतांबद्दल केलेल्या एका वक्तव्यामुळे त्या अडचणीत सापडल्या आहेत. त्यांच्या याच विधानावरून त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी वारकरी संप्रदायाने केली आहे. तर आता वारकऱ्यांपाठोपाठ महानुभाव पंथाकडूनही सुषमा अंधारेंना विरोध होताना पाहायला मिळत आहे. तर सुषमा अंधारे यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी देखील यावेळी महानुभाव पंथाकडून करण्यात आली आहे.
'रेड्याला शिकवण्याचे सामर्थ्य इथल्या संतांमध्ये आहे म्हणून चमत्कार, ...अरे, तुम्ही रेड्यांना शिकवले रे, माणसांना कुठं शिकवलं तुम्ही, यासह हिंदू धर्म, संत आणि वारकरी संप्रदायाबाबत वक्तव्य करणारे सुषमा अंधारे यांचा एक व्हिडिओ सद्या सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यांच्या या वक्तव्यांवरून राज्यातील वारकऱ्यांनी संताप व्यक्त करत विरोध दर्शवला आहे. दरम्यान आता वारकऱ्यांपाठोपाठ महानुभाव पंथाकडूनही धारेंना विरोध होताना पाहायला मिळत आहे. कारण औरंगाबदेतील महानुभाव आश्रमामध्ये साधकांनी श्रीकृष्णाला साक्षी मानत ज्या पक्षात सुषमा अंधारे राहतील त्या पक्षाला आम्ही मतदान करणार नाही अशी समूहिक प्रतिज्ञा केली. सोबतच अंधारे यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी देखील यावेळी महानुभाव पंथाकडून करण्यात आली आहे.
अशी घेतली शपथ...
महानुभाव आश्रमामध्ये साधकांनी श्रीकृष्णाला साक्षी मानत समूहिक प्रतिज्ञा केली. ज्यात, “ आम्ही सर्व महानुभाव पंथाचे साधक आज शपथ घेतो की..,श्रीमती सुषमा अंधारे यांनी आमच्या दैवताबद्दल, भगवान श्रीकृष्ण चक्रवतींबद्दल जे अपशब्द वापरले आहेत. त्यांचा आम्ही निषेध करतो. ज्या पक्षामध्ये सुषमाताई अंधारे राहतील, त्या पक्षाला आम्ही महानुभाव पंथाचे साधक कधीही मतदान करणार नाहीत. अशी शपथ आज आम्ही भगवान कृष्णांना साक्षी ठेवून घेत आहोत, अशी सामूहिक शपथ महानुभाव आश्रमामध्ये साधकांनी घेतली.
महानुभाव पंथाच्या साधकांची मागणी...
या सर्व प्रकरणावर प्रतिक्रिया देतांना महानुभाव पंथाच्या साधक म्हणाले की, सुषमा अंधारे यांनी आमच्या दैवताबद्दल जे बेताल वक्तव्य केले आहेत, त्याचा आम्ही सर्व महानुभाव पंथाचे साधक म्हणून जाहीर निषेध करत आहेत. तर अंधारे यांनी जाहीर माफी मागावी. अन्यथा त्या ज्या पक्षात राहतील त्या पक्षाला माही मतदान करणार नाही. तर आमच्या ईश्वराविषयी एखांद्या महिलेने बोलावे हे हिंदू धर्मासाठी खूप खेदाची गोष्ट आहे. श्रीकृष्ण भगवान यांच्या नखाची देखील अंधारे बराबरी करू शकत नाही. त्यामुळे अशाप्रकारे विधान करणाऱ्या अंधारे ज्या पक्षात राहतील त्या पक्षाला आम्ही मानणार नाही, अशी प्रतिक्रिया महानुभाव पंथाच्या साधक यांनी दिल्या आहेत.
Sanjay Raut : सुषमा अंधारेचा काही लोकांना राग येणं साहजिकच, संजय राऊतांचा खोचक टोला