Aurangabad: ज्येष्ठ पत्रकार दिलीप धारूरकर यांचे निधन; मुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली
Aurangabad: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धारुरकर यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली वाहिली आहे.
Dilip Dharurkar: ज्येष्ठ पत्रकार, संपादक तथा राज्याचे माजी मुख्य माहिती आयुक्त दिलीप धारूरकर यांचे सोमवारी निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर औरंगाबाद शहरातील हेडगेवार रुग्णालयात उपचार सुरु होते. तर त्यांच्या निधनानंतर माध्यम क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्यावर औरंगाबाद येथील प्रतापनगर स्मशानभूमीत पाच वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.
मुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली
ज्येष्ठ पत्रकार, संपादक तथा राज्याचे माजी मुख्य माहिती आयुक्त दिलीप धारूरकर यांच्या निधनामुळे परखड पत्रकार आणि विचारवंत असे चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व गमावले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धारुरकर यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली वाहिली आहे. 'अभ्यासू पत्रकार, संपादक म्हणून धारुरकर यांनी आपला वेगळा ठसा उमटवला. स्तंभलेखक, उत्तम वक्ते म्हणून ते परिचित होते. राज्याचे माहिती मुख्य माहिती आयुक्त म्हणून त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे. एक चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व म्हणून धारुरकर स्मरणात राहतील. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली,' असे मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.
फडणवीसांकडून श्रद्धांजली
धारुरकर यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी सुद्धा श्रद्धांजली वाहिली आहे. माजी माहिती आयुक्त, ज्येष्ठ पत्रकार दिलीप धारूरकर जी यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे. विदर्भात माहिती आयुक्त म्हणून त्यांनी अतिशय उत्कृष्ट काम केले आणि इतरही भागातील प्रलंबित प्रकरणे निकालात काढण्यासाठी मोठा पुढाकार त्यांनी त्यांच्या कार्यकाळात घेतला. राष्ट्रवादी विचारांना बळकटी देणारे मोठे लेखन कार्य त्यांनी केले. एक उत्तम संपादक, वैचारिक स्तंभलेखक म्हणून ते कायम स्मरणात राहतील. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असे उमुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.
माजी माहिती आयुक्त, ज्येष्ठ पत्रकार दिलीप धारूरकर जी यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 1, 2022
विदर्भात माहिती आयुक्त म्हणून त्यांनी अतिशय उत्कृष्ट काम केले आणि इतरही भागातील प्रलंबित प्रकरणे निकालात काढण्यासाठी मोठा पुढाकार त्यांनी त्यांच्या कार्यकाळात घेतला. pic.twitter.com/87V4MM92DJ
महत्वाच्या बातम्या...
Maharashtra Live Updates 1st August 2022 : राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा