(Source: Poll of Polls)
NIA-ATS Raids: औरंगाबाद, नांदेड विभागातून पॉप्युलर फ्रंटच्या 9 जणांना अटक, न्यायालयात हजर करणार
ATS Action: अटक करण्यात आलेल्या सर्वांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.
NIA-ATS Raids In Marathwada: दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी एटीएस आणि एनआयएकडून देशातील वेगवेगळ्या भागात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यालयावर छापेमारी करण्यात आली आहे. ज्यात मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना आणि नांदेड जिल्ह्यात सुद्धा कारवाई करण्यात आली आहे. या तिन्ही जिल्ह्यातून 9 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. तर अटक करण्यात आलेल्या सर्वांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.
औरंगाबाद विभागातून पाच जणांना अटक...
एटीएस आणि एनआयएकडून आज पहाटे राज्यातील अनेक भागात छापेमारी करण्यात आली. ज्यात मराठवाडा विभागातील औरंगाबाद, जालना जिल्ह्यांचा सुद्धा समावेश आहे. औरंगाबाद एटीएसने औरंगाबाद येथून चार आणि जालना जिल्ह्यातून एक असे पाच जणांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे. तर पाचही जणांना अटक देखील करण्यात आली आहे. ज्यात औरंगाबादच्या नॅशनल कॉलनीतुन सय्यद फ़ैसल, बायजीपुरा भागातून पॉप्युलर फ्रंटचा माजी जिल्हाध्यक्ष शेख़ इरफ़ान, नासिर नदवी आणि परवेज़ खान याला बायजीपुरा येथून ताब्यात घेतले आहे. तर जालना येथील रहमान गंज भागातील अब्दुल हादी अब्दुल रौफ याला ताब्यात घेण्यात आले आहे.
नांदेड विभागातून चार जण ताब्यात...
नांदेडमधून सुद्धा एकूण चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. नांदेडच्या देगलूर नाका भागात काल रात्री एटीएसच्या पथकाने छापा टाकत मेराज अन्सारी या पीएफआयच्या सदस्याला ताब्यात घेतले होत. तसेच आणखी तिघांना सुद्धा पथकाने ताब्यात घेतले होते. त्यानंतर अखेर या चारही जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करून, त्यांना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे महिनाभरपूर्वीच नांदेडमध्ये एनआयएच्या दिल्लीच्या पथकाने देगलूर नाका येथे छापेमारी करत तिघांना ताब्यात घेतले होते. तिघांची तब्बल 12 तास चौकशी करण्यात आली होती. तसेच नोटीस देऊन सोडण्यात आले होते.
मेराज चालवायचा किराणा दुकान...
एटीएसच्या अधिकाऱ्यांनी देगलूर नाका भागात छापा मारुन पीएफआयच्या मेराज अन्सारी याला ताब्यात घेतले आहे. मेराज या भागात किराणा दुकानासह जनरल स्टोर चालवतो. एटीएस पथकाने त्याला रात्रीच ताब्यात घेऊन, त्याची चौकशी सुरु केली आहे. दरम्यान किराणा दुकान चालक असलेल्या मेराज अन्सारीसह पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संस्थचे सदस्य असलेल्या आणखी तिघांना सुद्धा ताब्यात घेण्यात आले आहे. यावेळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त पाहायला मिळाला.
या कलमानुसार गुन्हा दाखल...
- कलम 121A म्हणजेच देशाविरुध्द युध्द पुकारणे.
- कलम 153A म्हणजेच जात , धर्म समुहात तेढ निर्माण करणे.
- कलम 109 म्हणजेच एखांद्या गुन्हयाला मदत करणे.
- कलम 13(1)(बी) म्हणजेच प्रतिबंधित कर्त्य करणे.
- कलम 120B म्हणजेच कट रचणे.
महत्वाच्या बातम्या...
What is PFI SDPI: बंदी घातलेल्या सिमीचा नवा अवतार पीएफआय? जाणून घ्या ही संघटना आहे तरी काय
NIA, ATS Raids Live Updates : केंद्रीय तपास यंत्रणा ॲक्शन मोडमध्ये, महाराष्ट्रातसह देशभरात छापेमारी, वाचा प्रत्येक अपडेट एका क्लिकवर....