(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मोठी बातमी! औरंगाबादमधील पीएफआय कार्यालय पोलिसांकडून सील, राज्यातील पहिलीच कारवाई
Aurangabad: पीएफआयचे कार्यालय सील करण्याची राज्यातील पहिलीच कारवाई आहे.
Aurangabad News: केंद्र सरकारने पीएफआय (PFI) संघटनेवर बंदी घातल्यानंतर आता स्थानिक पोलिसांकडून सुद्धा या संघटनेवर कारवाई करण्यात येत आहे. औरंगाबाद पोलिसांकडून (Aurangabad Police) पीएफआय कार्यालय सिल करण्यात आले आहे. सील केलेल्या नोटीसवर औरंगाबाद पोलीस आयुक्त डॉक्टर निखिल गुप्ता यांची सही आहे. कार्यालयाच्या तीनही गेटवर सील लावण्यात आले आहे. तर पीएफआयच्या कार्यालयाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आला आहे. तर पीएफआयचे कार्यालय सील करण्याची राज्यातील पहिलीच कारवाई आहे.
देशविरोधी कट रचल्याचा आरोप असलेल्या पीएफआय संघटनेच्या शेकडो सदस्यांना केंद्रीय तपास यंत्रणांनी वेगवेगळ्या कारवाया करत ताब्यात घेतले आहे. त्यानंतर या संघटनेवर पाच वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे आता पीएफआय कार्यालयावर सुद्धा कारवाई करण्यात येत आहे. औरंगाबादच्या जिन्सी भागातील पीएफआयचे कार्यालय औरंगाबाद शहर पोलिसांनी सील केले आहे. याबाबत कार्यालयावर एक नोटीस सुद्धा लावण्यात आली आहे. त्यामुळे आता केंद्रीय तपास यंत्रणांनंतर स्थानिक पोलिसांकडून सुद्धा पीएफआयवर कारवाई करण्यात येत आहे.
औरंगाबाद केंद्रबिंदू...
गेल्या आठवड्याभरापासून पीएफआयच्या कार्यकर्त्यांवर करण्यात येत असलेल्या कारवायांमध्ये औरंगाबाद केंद्रबिंदू बनला असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण सुरवातील चार आणि त्यानंतर 13 पीएफआय सदस्यांना औरंगाबादमधून ताब्यात घेण्यात आले होते. विशेष म्हणजे औरंगाबादमधून अटक करण्यात आलेला नासेर शेख या संघटनेचा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आहे. त्यामुळे औरंगाबादमध्ये पीएफआयचं मोठं जाळ असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महत्वाच्या बातम्या...
मोठी बातमी! NIA चा पीएफआयला आणखी एक दणका, देशभरातील 34 बँक खाती गोठवली
PFI Ban: पीएफआयवर बंदी: पोलीस अर्लट मोडवर, स्थानिक पोलिसांसाठी 'हे' महत्त्वाचे निर्देश जारी