एक्स्प्लोर

शिवरायांबद्दल वादग्रस्त विधान, 'एमआयएम'ही उतरणार रस्त्यावर; खासदार जलील यांची माहिती

Aurangabad : शिवरायांबद्दल राज्यपालांनी केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात एमआयएमकडून उद्या रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे.

Aurangabad News: औरंगाबादच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्रमात बोलतांना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी ( Bhagat Singh Koshyari ) यांनी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj)  यांच्याबद्दल केलेल्या एका वादग्रस्त विधानावरून राज्यभरात संतापाचे वातावरण पाहायाला मिळत आहे. तर शिवप्रेमी रस्त्यावर उतरून आंदोलन करतांना दिसत आहे. दरम्यान आता याच मुद्यावरून एमआयएम देखील आंदोलन करणार आहे. शिवरायांबद्दल राज्यपालांनी केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात एमआयएमकडून उद्या रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे. औरंगाबादच्या शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

यावेळी बोलतांना जलील म्हणाले की, भाजपकडून सतत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले जात आहे. तर राज्यपाल यांनी देखील असेच काही विधान केले आहे. त्यामुळे जेव्हा राज्यपालांनी सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते, त्यावेळीच महाराष्ट्राने त्यांचा जोरदार विरोध केला असता तर आज त्यांची अशाप्रकारे विधान करण्याची हिम्मत झाली नसती. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल सतत भाजपकडून आणि राज्यपाल यांच्याकडून होणाऱ्या वादग्रस्त विधानांचा निषेध करण्यासाठी उद्या औरंगाबादच्या क्रांती चौकात एमआयएमकडून निदर्शने केले जाणार असल्याची माहिती जलील यांनी दिली आहे. मुळात आम्ही आजचं आंदोलन करणार होतो, मात्र पोलिसांनी परवानगी दिली नसल्याने उद्या हे आंदोलन होणार असल्याचे देखील जलील म्हणाले. 

राज्यपालांच्या हकालपट्टीचा निर्णय घ्या!

पुढे बोलतांना जलील म्हणाले की, जर राष्ट्रवादी, कॉंग्रेस,शिवसेना, शिंदे सेना यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल प्रेम असेल आणि आदर असेल तर त्यांनी सर्वांनी एकत्र येऊन राज्यपाल यांना परत पाठवण्याचा निर्णय एकमताने घेतला पाहिजे. एमआयएम देखील त्यांच्या या निर्णयाचे स्वागत करेल असं जलील म्हणाले. 

भाजप नेत्यांवर टीका... 

भारतीय जनता पार्टीच्या कोणत्याही मंत्र्याला कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेण्याचे अधिकार नसायला पाहिजे. कारण आता त्यांची परीक्षा असून, त्यांना कोश्यारी महत्वाचे आहेत की, छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर महत्वाचा आहे. त्यामुळे या परीक्षेत तुम्ही पास होणार की, नापास हे तुमच्या हातात असल्याचा इशारा जलील यांनी भाजपला दिला आहे. राजकीय मतभेद काहीही असू द्या, मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल होणारे वादग्रस्त विधान आम्ही कधीही सहन करणार नसल्याचं जलील म्हणाले. 

राज्यपालांनी महाराष्ट्राची नाक रगडून माफी मागावी, अन्यथा लोकं टकमक टोकावर घेऊन जातील; अंबादास दानवेंची टीका

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  6:30 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Embed widget