(Source: ECI/ABP News/ABP Majha)
HSC Exam: औरंगाबाद विभागातील 430 केंद्रांवर बारावीची परीक्षा; प्रत्येक केंद्राबाहेर पोलिसांचा बंदोबस्त
HSC Exam: औरंगाबाद (मराठवाडा) विभागातून एकूण 1 लाख 68 हजार 263 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज केले होते.
HSC Exam In Aurangabad Division : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीच्या परीक्षेला (HSC Exam) आजपासून सुरुवात झाली आहे. या परीक्षेत औरंगाबाद (मराठवाडा) विभागातून एकूण 1 लाख 68 हजार 263 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज केले होते. तर यासाठी प्रशासनाने एकूण 430 परीक्षा केंद्राची व्यवस्था करण्यात आली होती. दरम्यान मराठवाडा विभागात सर्वत्र परीक्षा शांतेत पार पडताना पाहायला मिळत असून, काही ठिकाणी मात्र नियम पायदळी तुडवण्यात आल्याचे पाहायला मिळाले आहे. तर प्रशासनाकडून परीक्षा सुरळीत आणि कॉपीमुक्त पार पडावे यासाठी प्रयत्न केले जात आहे.
औरंगाबाद : जिल्ह्यातील एकूण 470 महाविद्यालयातील 60 हजार 400 विद्यार्थी 157 परीक्षा केंद्र आणि 21 परीक्षक केंद्रावर परीक्षा देत आहेत. दरम्यान यासाठी तालुकानिहाय एक भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली असून, केंद्रनिहाय दोन जणांच्या बैठ्या पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच संवेदनशील 48 केंद्रावर 3 जणांचे बैठ्या पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे.
बीड : जिल्ह्यातील एकूण 298 महाविद्यालयातील 38 हजार 929 विद्यार्थी 101 परीक्षा केंद्र आणि 15 परीक्षक केंद्रावर परीक्षा देत आहेत. यासाठी जिल्ह्यात एकूण पाच भरारी पथक नियुक्त करण्यात आले आहे. सोबतच एकूण 101 बैठे पथक असून, 15 परीरक्षक कार्यालय परीक्षांवर लक्ष ठेवून आहे.
परभणी : जिल्ह्यातील एकूण 233 महाविद्यालयातील 24 हजार 366 विद्यार्थी 59 परीक्षा केंद्र आणि 08 परीक्षक केंद्रावर परीक्षा देत आहेत. सोबतच परीक्षा सुरळीत सुरु राहावी यासाठी परभणी जिल्हाधिकारी यांनी 31 पथकांची नियुक्ती केली आहे. तर प्रत्येक परीक्षा केंद्राच्या परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आले आहे.
जालना : जिल्ह्यातील एकूण 239 महाविद्यालयातील 31 हजार 127 विद्यार्थी 80 परीक्षा केंद्र आणि 09 परीक्षक केंद्रावर परीक्षा देत आहेत. तर जालना जिल्ह्यातील बारावी परीक्षा कॉपीमुक्त पाड पडावी म्हणून, एकूण 16 भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. सोबतच परीक्षा केंद्र परिसरात कलम 144 लागू करण्यात आले आहे.
हिंगोली : जिल्ह्यातील एकूण 120 महाविद्यालयातील 13 हजार 441 विद्यार्थी 33 परीक्षा केंद्र आणि 05 परीक्षक केंद्रावर परीक्षा देत आहेत. सोबतच परीक्षा केंद्राबाहेर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. तसेच शिक्षण विभाग आणि महसूल विभागाचे भरारी पथक देखील तैनात करण्यात आले आहे.
राज्यातील 14 लाख 57 हजार 293 विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार
आजपासून राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणारी बारावी बोर्ड परीक्षेला सुरुवात झाली आहे. संपूर्ण राज्यातून बारावीच्या परीक्षेला 14 लाख 57 हजार 293 विद्यार्थी बसले आहेत. संपूर्ण राज्यात 3195 केंद्रावर ही परीक्षा होत आहे. राज्यभरात संपूर्ण परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी 21,396 कर्मचारी कार्यरत असतील. 271 भरारी पथके संपूर्ण राज्यभरात परीक्षा दरम्यान काम करतील.
इतर महत्वाच्या बातम्या:
All the Best! आजपासून बारावीच्या बोर्ड परीक्षेला सुरवात!
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI