एक्स्प्लोर

Marathwada Rain: मराठवाड्यात पावसाची पुन्हा दाणादाण, सात दिवसांत 34 मंडळात अतिवृष्टी

Marathwada Rain: अतिवृष्टीमुळे खरीप पीकं हातचे गेले असून, सरकराने नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करतायत. 

Rain News: परतीच्या पावसाने पुन्हा एकदा मराठवाड्यात दाणादाण उडविली आहे. कारण मागील सात दिवसांत 34  मंडळात अतिवृष्टी झाली आहे. तर सोमवारी 10 मंडळात 65  मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, विभागात 450  पैकी 285  मंडळात यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे पिकांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे खरीप पीकं हातचे गेले असून, सरकराने नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करतायत. 

मराठवाड्यात ऑक्टोबर महिन्यात आजवर 95  मि.मी. पाऊस झाला आहे. विभागाच्या 379 वार्षिक सरासरीच्या तुलनेत आतापर्यंत 771 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर मागील सात दिवसांत पुन्हा 34 मंडळात अतिवृष्टी झाली आहे. सुरवातीला झालेल्या अतिवृष्टीमुळे आधीच अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना आता परतीच्या पावसाने झोडून काढलं आहे. 

या भागात अतिवृष्टी (17 ऑक्टोबर 2022)

  • 17 ऑक्टोबर रोजी औरंगाबादच्या फुलंब्री तालुक्यातील पीरबावडा मंडळात 70 मि.मी. पावसाची नोंद झाली.
  • जालना जिल्ह्यात राजूर, केदारखेडा, जाफराबाद, कुंभारझरी, रामनगर, टेंभुर्णी या सर्व मंडळात प्रत्येक 75 मि.मी. पावसाची नोंद झाली.
  • बीड जिल्ह्यातील गंगामसला मंडळात 79 तर केजमधील नांदूरघाट मंडळात 66 मि.मी. पावसाची नोंद झाली.
  • उस्मानाबादमधील केशगाव मंडळात 66  मि.मी. पाऊस झाला. 

औरंगाबादमध्ये पिकांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान...

औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे पिकांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान होत असल्याचे चित्र आहे. काढणीला सोयाबीनला अक्षरशः कोंब फुटत असल्याचे पाहायला मिळत आहे. तर वेचणीला आलेला कापूस देखील ओला होत असल्याने याचा फटका शेतकऱ्यांना बसतोय. त्यामुळे आता पंचनामे न करता सरकराने सरसकट मदतीची घोषणा करावी अशी मागणी शेतकरी करतायत. 

येलदरी-दुधना धरणातून पाण्याचा विसर्ग 

परभणी जिल्ह्यातील येलदरी-दुधना धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. येलदरी धरणाचे सोमवारी चार दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले आहे. या चारही दरवाज्यातून 1 हजार 648 क्युसेकने पाण्याचा  विसर्ग करण्यात आला  आहे. तर लोअर दुधना धरणाचे बारा दरवाजे उघडण्यात आले आहे. लोअर दुधना प्रकल्पाचे बारा दरवाजे 0.30 मीटरने उचलण्यात आले असून, त्यातून 1 हजार 2120 क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. 

संबंधित बातमी...

Aurangabad Rain: औरंगाबादमध्ये मागील 16 दिवसांत 271 टक्के पाऊस; सर्वाधिक खुलताबाद तालुक्यात पावसाची नोंद

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Mahayuti CM  Post : महायुतीच्या गोटात नेमकं काय सुरुय? पुढील मुख्यमंत्री कोण होणार?Special Report Pawar VS Dilip Walse Patil : 'गुरू'चा कोप, शिष्य भावूक; पवारांच्या टीकेवर वळसे काय म्हणाले?Rahul Gandhi On Amit Shah Sabha : राहुल गांधींचा मोदी-शाहांवर गंभीर आरोप; धारावीच्या जमिनीसाठी..Who is Sajjad Nomani : व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चर्चेत आलेले सज्जाद नोमानी कोण आहेत? #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
×
Embed widget