Aurangabad Rain: औरंगाबादमध्ये मागील 16 दिवसांत 271 टक्के पाऊस; सर्वाधिक खुलताबाद तालुक्यात पावसाची नोंद
Aurangabad : सततच्या जोरदार पावसाने औरंगाबाद जिल्ह्यातील भूजलपातळी देखील वाढली असल्याचे पाहायला मिळत आहे.
Aurangabad Rain: यंदा औरंगाबाद जिल्ह्यात सुरवातीपासूनच जोरदार पावसाने हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. तर परतीच्या पावसाने देखील जाताजाता अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे सर्वत्र पाणीच- पाणी पाहायला मिळत आहे. तर औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या 16 दिवसांत 271. 5 टक्के पावसाची नोंद झाली आहे. ज्यात सर्वाधिक 807.1 टक्के पाऊस खुलताबाद तालुक्यात झाल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील भूजलपातळी देखील वाढली असल्याचे पाहायला मिळत आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात 1 ते 16 ऑक्टोबरपर्यंत एकूण 28.8 मिमी अपेक्षित पावसाच्या तुलनेत तब्बल 78.2 मिमी म्हणजेच 271.5 टक्के प्रत्यक्ष पर्जन्यमान झाले. ज्यात खुलताबाद तालुक्यात 28.2 मिमीच्या तुलनेत 227.6 मिमी विक्रमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. अशीच काही परिस्थिती जिल्ह्यातील इतर भागात पाहायला मिळत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसतांना पाहायला मिळत आहे.
कोणत्या तालुक्यात किती पाऊस (मागील16 दिवसांची आकडेवारी)
तालुका | अपेक्षित | प्रत्यक्ष | टक्के |
औरंगाबाद | 31.3 | 83.9 | 268.1 |
पैठण | 27.2 | 80.1 | 274 |
गंगापूर | 37.7 | 106.5 | 282.5 |
वैजापूर | 26.5 | 64.3 | 242.6 |
कन्नड | 24..4 | 61.2 | 250.8 |
खुलताबाद | 28.2 | 227.6 | 807.1 |
सिल्लोड | 26.6 | 49.0 | 184.0 |
सोयगाव | 26.7 | 60.2 | 225.5 |
फुलंब्री | 15.6 | 40.0 | 256.7 |
शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान...
गेल्या दोन आठवड्यापासून सुरु असलेल्या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे. शेतात तुंबलेल्या पाण्यामुळे खरीपाचे पीकं मातीमोल झाले आहेत. गेल्या तीन वर्षांपासून सतत मराठवाड्यातील शेतकरी अतिवृष्टीचा सामना करत असतानाच यावर्षी पुन्हा एकदा पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे यंदाही शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागणार आहे.
महत्वाच्या बातम्या...
Aurangabad: परतीच्या पावसाने मोठ्याप्रमाणावर नुकसान, कृषीमंत्री पोहचले बांधावर