अमित ठाकरे आजपासून 10 दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर; असा असणार संपुर्ण दौरा
Aurangabad: आगामी निवडणुका लक्षात घेता मराठवाड्यातील मनसैनिकांसाठी हा दौरा महत्वाचा ठरणार आहे.
Amit Thackeray Marathwada Tour: मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र तथा मनसे विध्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे आजपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. 06 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर असा दहा दिवसांचा त्यांचा दौरा असणार आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथून सुरु होणारा दौरा औरंगाबादला संपणार आहे. या दरम्यान अमित ठाकरे हे पक्षाच्या बैठका, विध्यार्थी सेनेचे बांधणी करणार आहेत. आगामी निवडणुका लक्षात घेता मराठवाड्यातील मनसैनिकांसाठी हा दौरा महत्वाचा ठरणार आहे.
याबाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी ट्वीट करत या दौऱ्याची माहिती दिली आहे. ज्यात 'येतोय नवनिर्माणाची वाज्रमुठ बांधण्यासाठी, महासंपर्क अभियान सहावा टप्पा,'असा उल्लेख करण्यात आला आहे. तर दौऱ्याची सुरवात उस्मानाबाद जिल्ह्यातून होणार असून, ज्यात 6 ऑक्टोबर तुळजापूर, 7 ऑक्टोबर उस्मानाबाद, 8 ऑक्टोबर लातूर, 9 ऑक्टोबर नांदेड, 10 ऑक्टोबर हिंगोली, 11 ऑक्टोबर परभणी, 12 ऑक्टोबर बीड, 13 ऑक्टोबर जालना, 14 – 15 ऑक्टोबर औरंगाबाद असा हा दौरा असणार आहे.
महाराष्ट्राच्या नवनिर्माणाची वज्रमूठ बांधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आणि महाराष्ट्रातील कर्तृत्ववान युवा नेते मा. श्री. अमित राजसाहेब ठाकरे ६ ऑक्टोबरपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर येत आहेत. महासंपर्क अभियानासाठी अमितसाहेबांना हार्दिक शुभेच्छा !#MNS pic.twitter.com/gWLS63VxfE
— Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) October 6, 2022