एक्स्प्लोर

Video: 'रॉकी भाईची हवा...' थेट समृद्धी महामार्गावर केली फायरिंग, व्हिडिओ व्हायरल

Aurangabad Crime News: याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपीचा शोध घेतला जात आहे.

Aurangabad Crime News: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) हस्ते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे (Balasaheb Thackeray Samruddhi Mahamarg) लोकार्पण झाल्यावर हा मार्ग प्रवासासाठी खुला करण्यात आला आहे. मात्र हा महामार्ग खुला होताच कोणत्या कोणत्या कारणाने चर्चेत येत आहे. कारण आधी अपघात आणि आता एका तरुणाचा  बंदुकीतून फायरिंग करतानाचा व्हिडिओ (Video) समोर आल्याने समृद्धी महामार्गाची चर्चा पाहायला मिळत आहे. औरंगाबादजवळ असलेल्या सम्रुद्धी महामार्गावरील बोगद्या समोर उभं राहून एका तरुणाने बंदुकीतून फायरिंग केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. तर याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपीचा शोध घेतला जात आहे. बाळु गायकवाड असे या आरोपीचे नाव आहे. 

कालपासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यात काळ्या रंगाची स्कारपिओ (क्र. MH 20 FG 2020) दिसत असून, ज्यात काळा टीशर्ट घातलेला एक तरुण दिसत आहे. हा तरुण हातात एक बंदुक घेऊन गाडीसमोर येतो आणि हवेत फायरिंग करतांना या व्हिडिओमध्ये दिसत आहे. विशेष म्हणजे अग्नीशस्र मधुन जिवंत काडतुस फायर होतांना देखील या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. औरंगाबाद जवळ असलेल्या समृद्धी महामार्गाच्या बोगद्या समोर हा सर्व प्रकार घडला आहे. 

पोलिसांकडून गुन्हा दाखल... 

समृद्धी महामार्गाच्या बोगद्या समोर उभं राहून अग्नीशस्रमधुन जिवंत काडतुस फायर करतानाचा व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हेडकॉन्स्टेबल आनंत ज्ञानोबा पाचंगे (वय 40 वर्ष) यांच्या फिर्यादीवरून बाळु गायकवाड याच्याविरोधात फुलंब्री पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आरोपीला पकडण्यासाठी फुलंब्री पोलिसांनी दोन पथक तयार केले असून, एक फुलंब्री पोलीस ठाणे हद्दीत तर दुसरा औरंगाबाद शहरात रवाना करण्यात आला आहे. 

रील बनवण्यासाठी समृद्धी महामार्गाचा वापर....

सोशल मिडीयावर व्हिडिओ रील बनवण्याचा क्रेज सद्या तरुणांमध्ये मोठ्याप्रमाणावर पाहायला मिळत आहे. दरम्यान औरंगाबाद परिसरातून गेलेला समृद्धी महामार्ग अशाच रील बनवणाऱ्या तरुणांचा अड्डा बनला आहे. स्थानिक तरुणांसह शहरातील अनेक तरुण-तरुणी व्हिडिओ बनवण्यासाठी समृद्धी महामार्गावर येतांना पाहायला मिळत आहे. आत्तापर्यंत महामार्ग वाहतुकीसाठी बंद असल्याने समजू शकतो, पण आता वाहतूक सुरु झाल्यावर देखील तरुण अशाप्रकारे व्हिडिओ तयार करण्यासाठी या महामार्गाचा वापर करत असतील तर हा प्रकार गंभीर आहे.  

काल समृद्धीवर अपघात, आज पुलाखाली ट्रक‌ अडकला; वाहनचालकाची झाली अशी कसरत

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ST Employees Salary : वाढीव वेतनाचा हप्ता गायब! एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक; तीन दिवसांत पैसे न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
वाढीव वेतनाचा हप्ता गायब! एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक; तीन दिवसांत पैसे न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 फेब्रुवारी 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 फेब्रुवारी 2026 | शनिवार
Kolhapur Accident: कोल्हापुरात शाहू मिल चौकात भीषण अपघात, क्रेटानं दुचाकीला उडवलं; दोघांचा मृत्यू, दुचाकीचा चक्काचूर
कोल्हापुरात शाहू मिल चौकात भीषण अपघात, क्रेटानं दुचाकीला उडवलं; दोघांचा मृत्यू, दुचाकीचा चक्काचूर
MNS : बोरीवली, दहिसरमध्ये फक्त मराठी फेरीवाल्यांवर कारवाई, परप्रांतियांकडे दुर्लक्ष; मनसे आक्रमक
बोरीवली, दहिसरमध्ये फक्त मराठी फेरीवाल्यांवर कारवाई, परप्रांतियांकडे दुर्लक्ष; मनसे आक्रमक

व्हिडीओ

Vijay Sethupathi Majha Katta : 96 चा हिरो, साऊथचा सुपरस्टार, विजय सेतूपतीची माझा कट्टावर मोठी घोषणा
Burkha in Local Train : मुंबई लोकलमधील महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर Special Report
ZP Election Election : जिंकली लोकशाही, आजी नववधूच्या बोटाला शाई Special Report
Zp Election Voting Politics : मतदानाचा 'पोर'खेळ, लोकशाहीचा खेळ? Special Report
Pawar Family Together : पार्थ पवार- शरद पवारांचे एकत्र फोटो पाहून राजकीय चर्चेला उधाण Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ST Employees Salary : वाढीव वेतनाचा हप्ता गायब! एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक; तीन दिवसांत पैसे न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
वाढीव वेतनाचा हप्ता गायब! एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक; तीन दिवसांत पैसे न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 फेब्रुवारी 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 फेब्रुवारी 2026 | शनिवार
Kolhapur Accident: कोल्हापुरात शाहू मिल चौकात भीषण अपघात, क्रेटानं दुचाकीला उडवलं; दोघांचा मृत्यू, दुचाकीचा चक्काचूर
कोल्हापुरात शाहू मिल चौकात भीषण अपघात, क्रेटानं दुचाकीला उडवलं; दोघांचा मृत्यू, दुचाकीचा चक्काचूर
MNS : बोरीवली, दहिसरमध्ये फक्त मराठी फेरीवाल्यांवर कारवाई, परप्रांतियांकडे दुर्लक्ष; मनसे आक्रमक
बोरीवली, दहिसरमध्ये फक्त मराठी फेरीवाल्यांवर कारवाई, परप्रांतियांकडे दुर्लक्ष; मनसे आक्रमक
अमेरिकन कृषी उत्पादनांना कोणतेही विशेष आयात फायदे दिले नाहीत; एमएसएमई, कृषी आणि दुग्धव्यवसाय क्षेत्रात कोणतीही बाधा नाही : पियूष गोयलांचा दावा
अमेरिकन कृषी उत्पादनांना कोणतेही विशेष आयात फायदे दिले नाहीत; एमएसएमई, कृषी आणि दुग्धव्यवसाय क्षेत्रात कोणतीही बाधा नाही : पियूष गोयलांचा दावा
शिवेंद्रराजे म्हणाले, छत्रपतींची औलाद कुणाला सोडणार नाही, आता महाराष्ट्र काँग्रेसनं शिवरायांच्या केलेल्या अपमानाची कुंडलीच मांडली; म्हणाले, तुमचा स्वाभिमान भाजपच्या चरणी अर्पण केला नसेल तर...
शिवेंद्रराजे म्हणाले, छत्रपतींची औलाद कुणाला सोडणार नाही, आता महाराष्ट्र काँग्रेसनं शिवरायांच्या केलेल्या अपमानाची कुंडलीच मांडली; म्हणाले, तुमचा स्वाभिमान भाजपच्या चरणी अर्पण केला नसेल तर...
'कोटी, दोन कोटी काय लागतील ती जाऊदे, 'या' चार गावात मागं पडायचं नाही' मतदानादिवशीच पैसा वाटपाची माजी मंत्री तानाजी सावंतांची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल!
'कोटी, दोन कोटी काय लागतील ती जाऊदे, 'या' चार गावात मागं पडायचं नाही' मतदानादिवशीच पैसा वाटपाची माजी मंत्री तानाजी सावंतांची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल!
मुंबई महापौरपदासाठी भाजपनं गुजरातीबहुल भागातून मराठी चेहरा दिला; ठाकरे गटाचं काय ठरलं? गटनेत्या किशोरी पेडणेकरांनी एका वाक्यात सांगितलं..
मुंबई महापौरपदासाठी भाजपनं गुजरातीबहुल भागातून मराठी चेहरा दिला; ठाकरे गटाचं काय ठरलं? गटनेत्या किशोरी पेडणेकरांनी एका वाक्यात सांगितलं..
Embed widget