एक्स्प्लोर

Website Closed: बांधकाम परवाने देणारी वेबसाईट बंद; राज्यातील सर्वच महापालिकांमधील कामकाज ठप्प

BPMS Website Closed: औरंगाबाद महापालिकेत (Aurangabad Municipal Corporation) गेल्या सहा दिवसांत पन्नासहून अधिक बांधकाम परवानग्या रखडल्याची माहिती महापालिकेतील सूत्रांनी दिली.

BPMS Website Closed: राज्यातील सर्व महापालिका (Municipal Corporation) आणि नगरपालिकांमध्ये (Municipality) बांधकाम परवानग्यांसाठी महाआयटीने (MahaIT) तयार केलेली बीपीएमएस (Building Plan Management System) ही ऑनलाइन सिस्टीम सहा दिवसांपासून बंद पडली आहे. त्यामुळे राज्यभरातील हजारो बांधकाम परवानग्या (Construction Permission) रखडल्या आहेत. तर एकट्या औरंगाबाद महापालिकेत (Aurangabad Municipal Corporation) गेल्या सहा दिवसांत पन्नासहून अधिक बांधकाम परवानग्या रखडल्याची माहिती महापालिकेतील सूत्रांनी दिली.

यापूर्वी महापालिका आणि नगरपालिकांमधून मिळणारी बांधकाम परवानगी ऑफलाइन पद्धतीने दिली जात होती. मात्र नागरिकांना बांधकाम परवनागी सहज आणि वेळेत उपलब्ध व्हावे या हेतूने ही प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली. त्यासाठी बीपीएमएस वेबसाइट (https://www.mahavastu.maharashtra.gov.in) नगरविकास विभागाने 1 एप्रिल 2022 पासून सुरू केली. मात्र या वेबसाईटमध्ये काही त्रुटी येऊ लागल्याचे समोर आले. तर साइटमधील त्रुटी काढण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता. पण या त्रुटी काही दूर झाल्या नाहीत, मात्र 21  डिसेंबरपासून बीपीएमएस साइटच बंद पडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आर्किटेक्टकडून (Architect) बांधकाम परवानग्या अपलोड होणे बंद झाले आहे.

'या' अडचणीचा सामना करावा लागतोय 

जुलै 2022 पासून सक्तीने महाआयटीने तयार केलेल्या बीपीएमएस साइटवरच आर्किटेक्ट (वास्तुविशारद) यांना बांधकाम परवानगीची संचिका अपलोड करावी लागत आहे. पण साइटवर बांधकाम परवानगीची संचिका अपलोड करतांना अनेक अडचणी येत होत्या. साइट स्लो चालणे, नेटवर्क न मिळणे, बांधकामाचे मोठे ड्रॉइंग अपलोड न होणे, वारंवार साइट हँग होणे अशा तक्रारी आहेत. अशातच आता 21 डिसेंबरपासून बीपीएमएस साइटच बंद पडल्यामुळे आर्किटेक्टकडून बांधकाम परवानग्या अपलोड होणे बंद झाले आहे.

बांधकाम परवानगी देणारी यंत्रणा कोलमडली... 

बीपीएमएस वेबसाईट बंद पडल्याने राज्यभरातील बांधकाम परवानगी देणारी यंत्रणा कोलमडून पडली आहे. कारण बीपीएमएस साइटवरच बांधकाम परवानगीची संचिका अपलोड करण्याचे आदेश असल्याने सद्या बहुतांश ठिकाणी ऑफलाइन पद्धतीने परवानगी देणं बंद आहे. त्यामुळे राज्यातील मनपा आणि नगरपालिकांमधील अभियंते, सहायक कर्मचारी, अभियंते, उपअभियंते, कार्यकारी अभियंता यांचे ऑनलाइन बांधकाम परवानगी देण्याचे काम ठप्प झाले आहे. औरंगाबाद महापालिकेतही गेल्या सहा दिवसांत सुमारे पन्नास बांधकाम परवानग्या रखडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

Share Market Opening Bell: शेअर बाजारात आजही तेजीचे संकेत; सेन्सेक्स 300 अंकांनी वधारला, पण...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच अरविंद केजरीवालांची मोठी खेळी, काँग्रेस-भाजपमधून आलेल्या नेत्यांवर मोठी जबाबदारी
सर्वांचं लक्ष महाराष्ट्राकडे लागलेलं असताना नवी दिल्लीत अरविंद केजरीवालांची मोठी खेळी, काँग्रेस-आपमधून आलेल्या नेत्यांना संधी
Rajesaheb Deshmukh: धनंजय मुंडेंच्या आरोपावर राजेसाहेब देशमुखांचं स्पष्टीकरण; 122 मतदान केंद्रावर फेर मतदानाची मागणी, सांगितली इनसाईड स्टोरी
धनंजय मुंडेंच्या आरोपावर राजेसाहेब देशमुखांचं स्पष्टीकरण; 122 मतदान केंद्रावर फेर मतदानाची मागणी, सांगितली इनसाईड स्टोरी
Shani 2024 : तब्बल 30 वर्षांनंतर राहु आणि शनीची युती; 2025 पासून 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
तब्बल 30 वर्षांनंतर राहु आणि शनीची युती; 2025 पासून 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
Rajesh Kshirsagar : हिशेब चुकता केला जाईल म्हणजे काय? माझ्यावर काल दोन वेळा जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न; राजेश क्षीरसागरांचा गंभीर आरोप
हिशेब चुकता केला जाईल म्हणजे काय? माझ्यावर काल दोन वेळा जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न; राजेश क्षीरसागरांचा गंभीर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sambit Patra on Gautam Adani : छत्तीगडमध्ये काँग्रेसच्या काळात अदानींची गुंतवणूक कशीKolhapur School Prayer : ए मत कहो खुदासे या प्रार्थनेवर पालकांचा आक्षेपRahul gandhi PC On Adani : “अदानींवर अमेरिकेचेही गंभीर आरोप, पण अटक होणार नाही, कारण…”- गांधीHemant Rasne Kasaba Pune : हेमंत रासनेंचा मिसळीवर ताव; विजयावर विश्वास

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच अरविंद केजरीवालांची मोठी खेळी, काँग्रेस-भाजपमधून आलेल्या नेत्यांवर मोठी जबाबदारी
सर्वांचं लक्ष महाराष्ट्राकडे लागलेलं असताना नवी दिल्लीत अरविंद केजरीवालांची मोठी खेळी, काँग्रेस-आपमधून आलेल्या नेत्यांना संधी
Rajesaheb Deshmukh: धनंजय मुंडेंच्या आरोपावर राजेसाहेब देशमुखांचं स्पष्टीकरण; 122 मतदान केंद्रावर फेर मतदानाची मागणी, सांगितली इनसाईड स्टोरी
धनंजय मुंडेंच्या आरोपावर राजेसाहेब देशमुखांचं स्पष्टीकरण; 122 मतदान केंद्रावर फेर मतदानाची मागणी, सांगितली इनसाईड स्टोरी
Shani 2024 : तब्बल 30 वर्षांनंतर राहु आणि शनीची युती; 2025 पासून 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
तब्बल 30 वर्षांनंतर राहु आणि शनीची युती; 2025 पासून 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
Rajesh Kshirsagar : हिशेब चुकता केला जाईल म्हणजे काय? माझ्यावर काल दोन वेळा जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न; राजेश क्षीरसागरांचा गंभीर आरोप
हिशेब चुकता केला जाईल म्हणजे काय? माझ्यावर काल दोन वेळा जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न; राजेश क्षीरसागरांचा गंभीर आरोप
तब्बल 30 वर्षांनी मतदानाचा टक्का वाढला; तेव्हा पवारांची सत्ता युतीने खेचली अन् आता युतीविरोधात तेच पवार उभा ठाकले! निकराच्या झुंजीत कोण बाजी मारणार?
तब्बल 30 वर्षांनी मतदानाचा टक्का वाढला; तेव्हा पवारांची सत्ता युतीने खेचली अन् आता युतीविरोधात तेच पवार उभा ठाकले! निकराच्या झुंजीत कोण बाजी मारणार?
प्रणिती ताईंची गाडी फोडण्याआधी तुझी गाडी फोडतो; काँग्रेसच्या युवक नेत्याचा इशारा; मविआत मोठी बिघाडी
प्रणिती ताईंची गाडी फोडण्याआधी तुझी गाडी फोडतो; काँग्रेसच्या युवक नेत्याचा इशारा; मविआत मोठी बिघाडी
Maharashtra Vidhan Sabha Election Result: एक्झिट पोलचे निकाल समोर येताच मविआच्या हालचाली सुरु, जयंत पाटील-बाळासाहेब थोरातांकडून अपक्ष, बंडखोर आमदारांशी संपर्क
एक्झिट पोलच्या निकालानंतर मविआचे वाऱ्याची दिशा ओळखणारे जाणते नेते कामाला लागले
Ajit Pawar vs Yugendra Pawar: बारामतीत अजितदादा 40 हजार मतांनी पडणार, जानकरांचा दावा, प्रफुल पटेल म्हणाले, हा दादा नव्हे, दुसरा दादा पडणार!
बारामतीत अजितदादा 40 हजार मतांनी पडणार, उत्तम जानकरांचा धक्कादायक दावा
Embed widget