(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Beed News: ऊसतोड मजुरांनी उचल घेऊन उभारली जिल्हा परिषद शाळेची टोलेजंग इमारत
Beed ZP School News: एकूण 32 लाख रुपये गावकऱ्यांच्या लोकवर्गणीतून जमा झाले आणि शाळेच्या बांधकामाला सुरवात झाली.
Beed ZP School News: जिल्हा परिषद (School) शाळा म्हंटले की, पडलेल्या भीती, अंधार असलेले वर्ग, बसण्यासाठी तुटलेले बाक असे चित्र डोळ्यासमोर उभं राहते. त्यामुळे अनकेदा पालक जिल्हा परिषद शाळेपेक्षा (ZP School) मुलांना खाजगी शाळेत प्रवेश घेण्यासाठी पसंती देतात. मात्र बीडच्या जिल्ह्यातील (Beed District) एका गावात आपल्या मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेत चांगले शिक्षण मिळावे म्हणून, गावातील उसतोड मजुरांनी (Sugarcane Workers) ऊस तोडणीसाठी उचल घेऊन मिळालेल्या पैश्यातून जिल्हा परिषद शाळेची टोलेजंग इमारत (School Building) उभी केली आहे. यासाठी गावकऱ्यांनी थोडीथोडकी नव्हे तब्बल 32 लाख रुपये जमा केले आहेत.
बीड जिल्ह्यातील पोखरी गावात बहुतांश लोक हे ऊस तोडणीचा व्यवसाय करतात. त्यामुळे गावातून ऊस तोडणीसाठी इतर जिल्ह्यात गेल्यानंतर त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न उभा राहायचा. दुसरीकडे गावात शाळेला इमारत नसल्याने विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी धजत नव्हते. हाच प्रश्न सोडवण्यासाठी या गावकऱ्यांनी एकत्र येऊन लोकसहभागातून शाळेची इमारत उभी करण्याचा निर्णय घेतला.
आणि पाहता-पाहता 32 लाख जमा झाले...
संपूर्ण आयुष्य ऊसतोडणीसाठी घातल्यावर किमान आपल्या मुलांनी तरी चांगले शिक्षण घेऊन मोठं व्हावे म्हणून गावातील नागरिकांनी गावातील जिल्हा परिषद शाळेचं नवीन बांधकाम करण्याचा निर्णय घेतला. पण यासाठी लागणारी रक्कम मोठी होती. गावातील सर्वांची परिस्थिती जेमतेम असल्याने पैसे देणार कोण? असा प्रश्न निर्माण झाला. त्यातून लोकवर्गणीचा पर्याय सुचला. पण शिल्लक रक्कम कोणाकडेच नसल्याने ऊसतोडणीसाठी गावकऱ्यांनी उचल घेतलेले पैसे यासाठी जमा केले. पाहता-पाहता एकूण 32 लाख रुपये गावकऱ्यांच्या लोकवर्गणीतून जमा झाले आणि शाळेच्या बांधकामाला सुरवात झाली.
प्रशासनाकडूनही मिळणार आर्थिक मदत...
पोखरी गावामध्ये सातवीपर्यंत जिल्हा परिषदेची शाळा असून, वर्गखोल्या नसल्याने एकाच वर्गात बसून विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावं लागत होतं. त्यामुळे मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न कसा सोडवायचा हा प्रश्न गावकऱ्यासमोर उभा होता. त्यातूनच त्यांनी चक्क ऊस तोडणीची उचल घेऊन नवीन शाळेची इमारत बांधण्याचा निर्णय घेतला. गावकऱ्यांनी जमा केलेल्या 32 लाख वर्गणीतून पाच वर्ग खोल्या आणि एक कार्यालय बांधण्यात आले आहे. मात्र उर्वरित कामासाठी आणखी निधीची आवश्यकता असल्याने त्यांनी आपली कैफियत बीडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांच्याकडे मांडली. याबाबत माहिती मिळताच पवार यांनी गावात भेट देत शाळेच्या बांधकामाची पाहणी केली. त्यानंतर राजमाता जिजाऊ योजनेतून दोन वर्ग खोल्यासाठी 18 लाख 40 हजार रुपये तर, संपूर्ण स्वच्छता अभियानांतर्गत शाळेच्या प्रसाधन ग्रहासाठी 3 लाख रुपये शासनाकडून देण्याशी घोषणा केली.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI