(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Politics:'पहिले हे सांगा तुमचा ईमान कितीला विकला'; अंबादास दानवेंची संजय शिरसाट यांच्यावर जहरी टीका
political crisis: संजय शिरसाट यांनी केलेल्या आरोपाला आता शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी उत्तर दिले आहे.
Maharashtra political crisis: एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होऊन बंड करणाऱ्या शिवसेना आमदारांच्या विरोधात शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यातच आता शिवसेना नेत्यांकडून बंडखोर आमदारांवर जोरदार हल्लाबोल केला जात आहे. दरम्यान शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी बंडखोर आमदार संजय शिरसाट यांच्यावर जहरी टीका केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आम्हाला वेळ देत नव्हते, आम्हाला निधी मिळत नव्हता असा आरोप संजय शिरसाट यांनी केला होता. त्यांच्या याच आरोपाला उत्तर देतांना अंबादास दानवे यांनी फेसबुक पोस्ट करत म्हटले आहे की, पोस्ट टाकायला थोडा उशिरच झाला. तरीही, संजय शिरसाठ यांनी पहिले सांगावे तुमचा ईमान कितीला विकला गेला?, अगदी मुख्यमंत्री, पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांची भेट नाही होत, निधी नाही मिळाला असा आरोप केलाय. माझ्या सोबत स्वतः मुख्यमंत्रीसाहेबांची आपण मागच्या काही दिवसात आपल्या मतदार संघाच्या कामासंदर्भात भेट घेतली. त्यामुळे बंडखोरी केल्यानंतर सोशल मिडिया हैडलवर मुख्यमंत्री साहेब सोबतचे फोटो डिलेट करु शकता, कमेंट सेक्शन बंद करु शकतात. पण सभाजीनगरला आल्यावर शिवसैनिकांना सामोरे नाही जाऊ शकत, असे दानवे म्हणाले.
शिरसाट यांनी उत्तर द्यावे...
याचवेळी अंबादास दानवेंनी शिरसाट यांना काही प्रश्न विचारले असून, याचे उत्तर त्यांना देता येईल का? असेही म्हटले आहे. ज्यात तूमच्या कार्यालयाचा उद्धघाटन कोणी केले?, मागच्या काही दिवसापूर्वी मंत्रालय येथे झालेली पाणीपुरवठा बैठकीला तुम्हीं होता का नाही?, वर्षा निवासस्थानी स्नेहभोजनाला होता का नाही? आणि सर्वात महत्वाच जो हज़ारों कोटी विकास निधी तूमच्या मतदारसंघात मागच्या अड़ीच वर्षात दिला गेलाय तो तुमची प्रॉपर्टी विकून किंवा रिक्षा चालवून आलेल्या पैशातून केलाय का?,असा प्रश्न दानवे यांनी उपस्थित केले आहे.
शिरसाट यांच्या फोटोला काळे फासले
शिवसेनेचे बंडखोर आमदारांविरोधात शिवसैनिकांचा संताप अजूनही पाहायला मिळतोय. राज्यात अनेक ठिकाणी बंडखोर आमदारांच्या कार्यालयावर हल्ले होत आहे. त्यातच औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांच्या फोटोला शिवसैनिकांनी आज काळे फासले. पडेगाव येथे मुख्य रस्त्यावर लावण्यात आलेल्या होर्डिंगवरील शिरसाट आणि त्यांच्या मुलाच्या फोटोला काळे फासण्यात आले. तर याचवेळी होर्डिंग सुद्धा पाडण्यात आला. त्यांनतर स्थानिक शिवसैनिकांनी शिरसाट यांचे ते होर्डिंग काढून घेतले.