Aurangabad Politics: निष्ठावंत खैरेंची 'निष्ठा यात्रे'त गैरहजेरी; पुन्हा चर्चा अंतर्गत गटबाजीची
Aurangabd News: पुन्हा एकदा खैरे विरुद्ध दानवे अशी चर्चा औरंगाबादच्या राजकीय वर्तुळात पाहायला मिळतेय.
Aurangabad News: पक्षात झालेल्या बंडखोरीमुळे अडचणीत आलेल्या उद्धव ठाकरेंसमोर आता पक्षातील अंतर्गत गटबाजीचा मुद्दा डोकेदुखी ठरणार असल्याची चर्चा पाहायला मिळत आहे. कारण विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबादमध्ये काढण्यात आलेल्या 'निष्ठा यात्रे'त माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासह महत्वाच्या नेत्यांनी पाठ फिरवल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे पुन्हा एकदा खैरे विरुद्ध दानवे अशी चर्चा औरंगाबादच्या राजकीय वर्तुळात पाहायला मिळतेय.
पक्षात झालेल्या बंडखोरीचा उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेला मोठा फटका बसला आहे. अनेक आमदार, खासदार, पदाधिकारी आणि नेते पक्षाला जय महाराष्ट्र करून शिंदे गटात सहभागी झाले. मात्र अशात देखील खैरे आणि अंबादास दानवे सारखे अनेक नेते उद्धव ठाकरे यांच्यासोबत ठामपणे उभे राहिले. मात्र आता उद्धव ठाकरेंच्या याच निष्ठावंत नेत्यांमध्ये अंतर्गत गटबाजीची पाहायला मिळत आहे. औरंगाबाद येथे काढण्यात आलेल्या दोन दिवसीय 'निष्ठा यात्रे'कडे खैरेंसह महानगरप्रमुख किशनचंद तनवाणी यांनी पाठ फिरवल्याचे पाहायला मिळाले.
दानवे-खैरे वाद जुनाच...
अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्यातील पक्ष अंतर्गत गटबाजीची नेहमीच चर्चा पाहायला मिळत असते. पक्षात झालेल्या बंडखोरीच्या आधी सुद्धा अनेकदा या दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या विरोधात जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. शिंदे गटाच्या बंडखोरीनतर दोन्ही नेते पुन्हा एकदिलाने काम करत असल्याचे पाहायला मिळत होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा या दोन्ही नेत्यांमध्ये दुरावा वाढत असल्याची चर्चा आहे. तर निष्ठा यात्रेत खैरे यांनी लावलेल्या गैरहजरीमुळे या चर्चेला आणखीच उधाण आलंय.
अशी निघाली निष्ठा यात्रा...
दिवस पहिला : हर्सुल मारोती मंदिर -भगतसिंगनगर - मयुरपार्क - सुरेवाडी- पवननगर- शिवनेरी कॉलनी- रायगडनगर एन- 9 /एच. सेक्टर, सुदर्शननगर, मयुरनगर, यादवनगर, सिध्दार्थनगर, स्वामी विवेकानंदनगर, भारतमातानगर, छत्रपतीनगर, रोजाबाग, एन-13 एकतानगर, जटवाडा रोड, राधास्वामी कॉलनी येथे समारोप.
दिवस पहिला : अजबनगर खोकडपूरा, बहादूरपुरा-गांधीनगर चौराहा, संस्थान गणपती, सराफा, सिटीचौक, गुलमंडी, संभाजीपेठ, सामना कार्यालय, निरालाबाजार, नागेश्वरवाडी,नारळीबाग, मनपा, घाटीपरिसर, मकाईगेट, गणपती मंदिर-लालमंडी, गोगानाथमंदिर, कुंभारगल्ली- तारकसगल्ली, कृष्णमंदिर येथे समारोप.
महत्वाच्या बातम्या...
Sanjay Shirsat: आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका; एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईकडे रवाना
जे सरकारला जमलं नाही ते एकट्या जलील यांनी केलं; बंगळुरूला निघालेली कंपनी औरंगाबादला...