TET Scam: सत्तारांच्या मुलीला 2017 पासून आजतागायत मिळतोय पगार, धक्कादायक माहिती आली समोर
Maharashtra TET Scam: अब्दुल सत्तार यांच्या एका मुलीला महिन्याला 40 हजार पेक्षा अधिक पगार मिळतोय.
Maharashtra TET Scam: टीईटी घोटाळ्यात माजी अब्दुल सत्तारांच्या मुलींचे नाव समोर आल्यानंतर, आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अब्दुल सत्तार यांच्या मुलीला 2017 पासून ते आजतागायत पगार मिळत असल्याचे समोर आले आहे. सत्तार यांच्या दाव्यानुसार त्यांच्या मुली टीईटी परीक्षेत अपात्र ठरल्या होत्या. मग अपात्र असतांना त्यांना पगार कसा काय मिळतोय असा प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे. तर आता सत्तार यांनी केलेल्या दावाच कितीपत खरा आहे हे यावर सुद्धा प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे.
अब्दुल सत्तार यांच्या मुलांचे नाव टीईटी घोटाळ्यात आली आहे. त्यातच आता त्यांच्या एका मुलीला 2017 पासून तर आजतागायात पगार मिळत असल्याच समोर आले आहे. सत्तार यांची मुलगी हीना कौसर अब्दुल सत्तार शेख या टीईटी परीक्षेत अपात्र असताना 2017 पासून त्यांना पगार कसा काय मिळतोय असा प्रश्न उपस्थित होतोय. त्यामुळे या संदर्भात आता एक वेगळी चौकशी करण्याची गरज आहे.
शाळेकडून वेतन बिल सादर...
शिक्षण विभागाच्या रेकोर्डनुसार 2017 पासून ते जुलै 2022 या महिन्यापर्यंत हिना कौसर अब्दुल सत्तार शेख यांनी पगार उचलला आहे. हिना यांना महिन्याला 40 हजार पेक्षा अधिक पगार मिळतोय. विशेष म्हणजे खुद्द अब्दुल सत्तार यांनीच त्यांची मुलगी टीटीईटी अपात्र असल्याची माहिती माध्यमांना दिली आहे. त्यामुळे जर त्या अपात्र होत्या तर मग त्या पगार कुठल्या निकषावर उचलतात हाही प्रश्न या निमित्ताने उभा राहत आहे. तर शाळेने वेतन बिल सादर केलं त्यात त्या पूर्णतः पात्र असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळेच त्यांचा पगार सुरू असल्याचा खुलासा यावेळी शिक्षण विभागाने केला आहे. शिक्षण उपसंचालक कार्यालयातून पात्रता निकष पडताळणी केली जाते त्यानुसार आमच्या कार्यालयातून पगार पत्रक निघतात असेही शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI