एक्स्प्लोर

Aurangabad Crime News: भोळसर महिलेवर अत्याचार; माणुसकीला काळीमा फासणारी घटना

Crime News: घटनेची गंभीरतेने तपास करत औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी अवघ्या दोन तासात आरोपीला बेड्या ठोकल्या.

Aurangabad News: औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातील शिऊर बंगला परिसरात माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका भोळसर महिलेवर अत्याचार नराधमाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी या आरोपीला बेड्या ठोकल्या असून, त्याच्यावर शिऊर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रेमसिंग भन्साराम मैवाळ (रा. तरबाची वाडी, ता. वैजापुर, जि. औरंगाबाद) असे आरोपीचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैजापूर तालुक्यातील एका गावातील भोळसर महिला शिऊर बंगला परिसरात फिरत होती. याचाच फायदा घेत आरोपी मैवाळ याने तिला रविवारी रात्रीच्या सुमारास शिऊर बंगला ते शिऊर रस्त्यावरील नवीन मंदिराच्या पाठीमागे घेऊन गेला. त्यांनतर तिथे असलेल्या मोकळ्या जागेवर नेऊन पिडीत महिलेवर बळजबरीने अत्याचार केला. सकाळी महिलेने घडलेला सर्व प्रकार आपल्या भावाला सांगितला. त्यांनतर दुसऱ्या दिवशी घटना उघडकीस आली. 

बुटावरून सापडला आरोपी...

पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. यावेळी पोलीस पथकाला घटनास्थळी आरोपीचा बूट सापडला. त्यांनतर पोलिसांनी पिडीत महिलेची विचारपूस करून काही महिती घेतली. त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. सोबतच श्वान पथकास बोलावून बुटाच्या आधारे आरोपीची ओळख पटवली. यावेळी प्रेमसिंग भन्साराम मैवाळ हाच आरोपी असल्याचे समोर आले. त्यांनतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन तासात आरोपी ताब्यात...

एका भोळसर महिलेवर अत्याचाराच्या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली होती. त्यामुळे आरोपीचा शोध घेणे पोलिसांसाठी मोठे आवाहन होते. मात्र पोलिसांनी गोपनीय माहिती आणि श्वान पथकाच्या मदतीने कौशल्यपूर्ण तपास करत अवघ्या दोन तासात आरोपीचा शोध घेऊन त्याला बेड्या ठोकल्या.  पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार अंकुश नागटिळक करत आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Baba Siddique Shot Dead : कुर्ल्यात भाड्याने खोली, 200000 रुपयांची सुपारी, बाबा सिद्दिकींच्या हत्येचे थेट पंजाब कनेक्शन; नव्या माहितीने खळबळ!
कुर्ल्यात भाड्याने खोली, 200000 रुपयांची सुपारी, बाबा सिद्दिकींच्या हत्येचे थेट पंजाब कनेक्शन; नव्या माहितीने खळबळ!
Baba Siddique Shot Dead : सत्ताधाऱ्यांना बुलेटप्रूफ जॅकेट घालण्याची वेळ, महाराष्ट्रात गुंडांचे राज्य; बाबा सिद्दीकींच्या हत्येवरून विजय वडेट्टीवार कडाडले,  उच्चस्तरीय चौकशीची मागणी
सत्ताधाऱ्यांना बुलेटप्रूफ जॅकेट घालण्याची वेळ, महाराष्ट्रात गुंडांचे राज्य; बाबा सिद्दीकींच्या हत्येवरून विजय वडेट्टीवार कडाडले, उच्चस्तरीय चौकशीची मागणी
Baba Siddique:दुश्मन बन गये दोस्त! बाबा सिद्दकींनी सलमान शाहरुखचं 5 वर्षांचं भांडण असं मिटवलं, कटूता संपून घेतली गळाभेट
दुश्मन बन गये दोस्त! बाबा सिद्दकींनी सलमान शाहरुखचं 5 वर्षांचं भांडण असं मिटवलं, कटूता संपून घेतली गळाभेट
Astrology Panchang 13 October 2024 : आज समसप्तक योगासह जुळून आला शुभ योग; मेषसह 'या' 5 राशींच्या बॅंक बॅलेन्समध्ये होणार चिक्कार वाढ
आज समसप्तक योगासह जुळून आला शुभ योग; मेषसह 'या' 5 राशींच्या बॅंक बॅलेन्समध्ये होणार चिक्कार वाढ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  10 AM : 13 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सBaba Siddique Shot Dead Superfast : बाबा सिद्दीकी सुपरफास्ट : 13 ऑक्टोबर 2024 : abp majhaBaba Siddique Shot Dead : चौथा आरोपी तीन हल्लेखोरांना मार्गदर्शन करत असल्याचा संशयBaba Siddique Shot Dead :  सिद्दीकी गोळीबार प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी ABP माझावर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Baba Siddique Shot Dead : कुर्ल्यात भाड्याने खोली, 200000 रुपयांची सुपारी, बाबा सिद्दिकींच्या हत्येचे थेट पंजाब कनेक्शन; नव्या माहितीने खळबळ!
कुर्ल्यात भाड्याने खोली, 200000 रुपयांची सुपारी, बाबा सिद्दिकींच्या हत्येचे थेट पंजाब कनेक्शन; नव्या माहितीने खळबळ!
Baba Siddique Shot Dead : सत्ताधाऱ्यांना बुलेटप्रूफ जॅकेट घालण्याची वेळ, महाराष्ट्रात गुंडांचे राज्य; बाबा सिद्दीकींच्या हत्येवरून विजय वडेट्टीवार कडाडले,  उच्चस्तरीय चौकशीची मागणी
सत्ताधाऱ्यांना बुलेटप्रूफ जॅकेट घालण्याची वेळ, महाराष्ट्रात गुंडांचे राज्य; बाबा सिद्दीकींच्या हत्येवरून विजय वडेट्टीवार कडाडले, उच्चस्तरीय चौकशीची मागणी
Baba Siddique:दुश्मन बन गये दोस्त! बाबा सिद्दकींनी सलमान शाहरुखचं 5 वर्षांचं भांडण असं मिटवलं, कटूता संपून घेतली गळाभेट
दुश्मन बन गये दोस्त! बाबा सिद्दकींनी सलमान शाहरुखचं 5 वर्षांचं भांडण असं मिटवलं, कटूता संपून घेतली गळाभेट
Astrology Panchang 13 October 2024 : आज समसप्तक योगासह जुळून आला शुभ योग; मेषसह 'या' 5 राशींच्या बॅंक बॅलेन्समध्ये होणार चिक्कार वाढ
आज समसप्तक योगासह जुळून आला शुभ योग; मेषसह 'या' 5 राशींच्या बॅंक बॅलेन्समध्ये होणार चिक्कार वाढ
Baba Siddique Death Update| बाबा सिद्दीकांचा गोळीबारात मृत्यू, लिलावती रुग्णालयाबाहेर सुरक्षा वाढवली
Baba Siddique Death Update| बाबा सिद्दीकांचा गोळीबारात मृत्यू, लिलावती रुग्णालयाबाहेर सुरक्षा वाढवली
Horoscope Today 13 October 2024 : आज सर्व राशींवर राहणार रविदेवाची कृपा; अडकलेली कामं होणार पूर्ण, वाचा आजचे राशीभविष्य
आज सर्व राशींवर राहणार रविदेवाची कृपा; अडकलेली कामं होणार पूर्ण, वाचा आजचे राशीभविष्य
Horoscope Today 13 October 2024 : आज रविवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज रविवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Baba Siddique Shot Dead: देवीच्या मिरवणुकीतील फटाक्यांच्या आवाजात बाबा सिद्दिकींवर फायरिंग, गोळी कारच्या बुलेटफ्रुफ काचेत घुसली
देवीच्या मिरवणुकीतील फटाक्यांच्या आवाजात बाबा सिद्दिकींवर फायरिंग, गोळी कारच्या बुलेटफ्रुफ काचेत घुसली
Embed widget