Aurangabad Corona Update: औरंगाबादमध्ये कोरोनाचा 'पहिला रुग्ण' आढळला, आरोग्य विभाग अलर्ट
Aurangabad Corona Update: खासगी डॉक्टरांच्या मार्गदर्शनात या रुग्णाला होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.
![Aurangabad Corona Update: औरंगाबादमध्ये कोरोनाचा 'पहिला रुग्ण' आढळला, आरोग्य विभाग अलर्ट maharashtra News Aurangabad Corona News The first patient of Corona was found in Aurangabad Health Department Alert Aurangabad Corona Update: औरंगाबादमध्ये कोरोनाचा 'पहिला रुग्ण' आढळला, आरोग्य विभाग अलर्ट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/24/fa3d48878ade47b7573eeedaaafb19451671891662055457_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Aurangabad Corona Update: चीनमध्ये कोरोनाचा थैमान (China Covid Outbreak) पाहता राज्यसह देशभरातील आरोग्य विभाग अलर्ट (Health Department Alert) झाले आहेत. तर औरंगाबाद जिल्ह्यात (Aurangabad District) देखील कोरोनाच्या चाचण्या (Corona Test) वाढवण्यात येत आहे. दरम्यान वाळूज महानगरमधील बजाजनगरातील सिडकोत कोरोनाचा रुग्ण (Corona Patient) आढळून आला. त्यामुळे जिल्हा परिषद आरोग्य विभागाने त्याचा आरटीपीसीआर (RTPCR) स्वॅब तपासणीसाठी पाठवला आहे. तर खासगी डॉक्टरांच्या मार्गदर्शनात या रुग्णाला होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, स्पर्धा परीक्षेसाठी खानदेशातून एक विद्यार्थी शहरात आला होता. दरम्यान त्याची अँटीजेन चाचणी करण्यात आली असता त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळून आला आहे. तर गंभीर लक्षण नसल्याने त्याला त्याच्या राहत्या खोलीमध्ये डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली होम आयसोलेशन मध्ये ठेवण्यात आले आहे.
आरोग्य केंद्रांत कोरोना चाचण्या
गेल्या काही दिवसांपासून चीनसह जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होतांना पाहायला मिळत आहे. अशात औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत सुदैवाने एकही रुग्ण सक्रीय नव्हता. मात्र आता वाळूज भागात जिल्ह्यातील पहिला कोरोना रुग्ण आढळून आला असल्याने आरोग्य विभाग देखील अलर्ट झालं आहे. तसेच आता खबरदारीचा उपाय म्हणून मनपाच्या 41 आरोग्य केंद्रांत कोरोना चाचण्या करण्यात येणार आहेत.
जिल्ह्यातील चाचण्या वाढवणार...
चीनमध्ये कोरोनाचा थैमान पाहता आता राज्यातील आरोग्य यंत्रणा देखील अलर्ट झाली आहे. याचवेळी औरंगाबाद जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणादेखील सतर्क झाली आहे. तर जिल्ह्यातील कोरोना चाचण्या वाढवण्याचे आदेश जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिले आहे. सद्या तालुका स्तरावर 20 ते 25 चाचण्या होत असून, त्या असमाधानकारक असल्याचं आरोग्य अधिकारी यांनी सांगितले आहे. तर यापुढे सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, आयुर्वेदिक दवाखाने, युनानी दवाखाने, फिरते आरोग्य पथक यांना दिवसभरात 50 अँटीजेन, आरटीपीसीआर चाचण्या करण्याचे आदेश औरंगाबाद जिल्हा आरोग्य अधिकारी सुधाकर शेळके यांनी दिले आहे.
औरंगाबादकरांनी लसीकरणाकडे पाठ फिरवली
एकीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग अलर्ट झाले असतानाच,दुसरीकडे मात्र औरंगाबादकरांनी लसीकरणाकडे पाठ फिरवली असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कारण औरंगाबाद जिल्ह्यासाठी आलेल्या लसी तशाच पडून आहे. तर आता यातील 56 हजार कोव्हॅक्सिनचे डोस 31 डिसेंबरनंतर एक्स्पायर होणार आहेत. आत्तापर्यंत औरंगाबाद जिल्ह्यात 30 लाख 56 हजार नागरिकांनी पहिला डोस घेतला असून, 24 लाख 1 हजार 532 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. तर फक्त 2 लाख 71 हजार नागरिकांनीच बुस्टर डोस घेतला आहे.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)