एक्स्प्लोर
Advertisement
सासरे रावसाहेब दानवे यांच्या सांगण्यावरुन मुलावर अॅट्रॉसिटी गुन्हा; हर्षवर्धन जाधवांच्या आईचा आरोप
केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर त्यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांच्या आईने गंभीर आरोप केलाय. दानवे यांच्या सांगण्यावरुन मुलावर अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल झाल्याचं तेजस्विनी जाधव यांनी म्हटलंय.
औरंगाबाद : मनसे जिल्हाध्यक्ष हर्षवर्धन जाधव यांच्यावर त्यांचे सासरे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनीच अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करायला लावला, असा आरोप हर्षवर्धन जाधव यांच्या आई तेजस्विनी जाधव यांनी केला आहे. सोबतच त्यांची सून संजना हिच्या विरोधातही क्रांतीचौक पोलीस ठाण्यात छळाची तक्रार देण्यात आली आहे. सोमवारी (9 मार्च)अॅट्रॉसिटी प्रकरणात कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला. एका पानटपरी चालकाला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. त्यामुळे हर्षवर्धन जाधव यांना अटक होण्याची शक्यता आहे. तर, हर्षवर्धन जाधव आणि त्यांच्या आई विरोधात रावसाहेब दानवे यांच्या मुलीने छळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दिलीय. सासू-सुनेने एकमेकांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रारी दिल्या आहेत.
केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर त्यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांच्या आईने गंभीर आरोप केले आहेत. काही दिवसांपूर्वी मनसे जिल्हाध्यक्ष हर्षवर्धन जाधव यांच्यावर एका पानटपरी चालकाला जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या आरोपावरुन अॅट्रॉसिटी दाखल झाला आहे. ही तक्रार रावसाहेब दानवे यांच्या सांगण्यावरुन झाली असल्याचा आरोप तेजस्विनी जाधव यांनी केला आहे. तेजस्विनी जाधव यांनी त्यांची सून हिच्या विरोधातही क्रांतीचौक पोलीस ठाण्यात छळाची तक्रार दिली आहे.
अॅट्रॉसिटी प्रकरणात हर्षवर्धन जाधव यांना अटक होण्याची शक्यता; कोर्टाने अटकपूर्व जामीन फेटळला
काय आहे प्रकरण?
एका पानटपरी चालकाला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप हर्षवर्धन जाधव यांच्यावर आहे. या प्रकरणात पानटपरी चालक नितीन रतन दाभाडे यांनी तक्रार दिली होती. तक्रारीनुसार, दाभाडे यांनी जिल्हा न्यायासमोरील सिग्नल जवळ पानटपरी सुरु केली व तेथे निळा झेंडा लावला. 29 फेब्रुवारी 2020 रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास हर्षवर्धन जाधव तेथे आले. त्यांनी ज्या जागी टपरी व निळा झेंडा लावला ती जागा माझ्या मालकीची आहे. त्यामुळे टपरी व झेंडा हटव असे दाभाडे यांना सांगितले. त्यामुळे दोघांमध्ये वाद झाला व जाधव यांनी दाभाडे यांना जातीवाचक शिवीगाळ करुन टपरी व झेंडा हटवला नाही तर, जीवे मारीन अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. याप्रकारानंतर दाभाडे यांनी क्रांतीचौक पोलीस ठाणे गाठत दिलेल्या तक्रारीवरुन हर्षवर्धन जाधव यांच्या विरुद्ध अॅट्रॉसिटीच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
राजकारण
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement