![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Aurangabad Bhondubaba : एबीपी माझाच्या बातमीनंतर 'भोंदूबाबा'चा बाजार उठला; अखेर 'आरोग्य सभा' बंद
ABP Majha Impact : औरंगाबादच्या या भोंदूबाबाच्या भोंदूगिरीची बातमी एबीपी माझाने दाखवली होती. त्यानंतर या बाबावर कारवाई करण्यासाठी प्रशासनाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत.
![Aurangabad Bhondubaba : एबीपी माझाच्या बातमीनंतर 'भोंदूबाबा'चा बाजार उठला; अखेर 'आरोग्य सभा' बंद Aurangabad Bhondubaba News ABP Majha Impact Police to take an action on Fraud health campaign Aurangabad Bhondubaba : एबीपी माझाच्या बातमीनंतर 'भोंदूबाबा'चा बाजार उठला; अखेर 'आरोग्य सभा' बंद](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/26/0fd2c184a2cc7d025640897c1371459a166151252845293_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
औरंगाबाद : डोक्यावर हात ठेवून दुर्धर आजार बरं करण्याचा दावा करणाऱ्या औरंगाबादच्या भोंदूबाबाचा (Aurangabad Bhondubaba) 'एबीपी माझा'ने (ABP Majha Impact) भांडाफोड केल्यानंतर आता या बाबाचा हा उद्योग बंद पडला आहे. दर शुक्रवारी हजारोंच्या संख्येने आलेल्या नागरिकांची आरोग्य सभा भरवणारा बाबा आज गावात फिरकलाच नाही. विशेष म्हणजे एबीपी माझाच्या बातमीनंतर आता प्रशासनाकडून सुद्धा कारवाईच्या हालचाली सुरू झाल्या आहे.
औरंगाबादच्या (Aurangabad) पैठण तालुक्यातील पारुंडी गावात गेल्या अनेक वर्षांपासून बाबासाहेब शिंदे नावाचा भोंदूबाबा ((Aurangabad Bhondubaba)) आरोग्य सभा भरवत होता. एड्स, कॅन्सर शुगर, यासारखे दुर्धर आजार फक्त डोक्यावरून हात फिरवल्यानंतर बरे करतो असा दावा हा बाबा करायचा. मात्र गेल्या आठवड्यात 'एबीपी माझा'च्या टीमने या बाबाच्या आरोग्य सभेत जाऊन त्याच्या भोंदूगिरीचा पर्दाफाश केला. तेव्हापासून हा बाबा गावाकडे फिरकला नाही.
आज आरोग्यसभा भरलीच नाही...
बाबासाहेब शिंदे हा दर शुक्रवारी सकाळी सात वाजल्यापासून तर रात्री नऊवाजेपर्यंत हजारोंच्या संख्येने आलेल्या लोकांची आरोग्य सभा भरवत होता. यावेळी आलेल्या लोकांच्या डोक्यावर हात फिरवून त्यांचे आजार बरे करण्याचा दावा करत होता. मात्र गेल्या शुक्रवारी एबीपी माझाची टीम शिंदेच्या दरबारात पोहोचली आणि त्याचा भांडाफोड झाला. त्यामुळे आज शुक्रवार असून सुद्धा पारुंडी गावात ना बाबा फिरकला, ना त्याचे कार्यकर्ते फिरकले. त्यामुळे आता बाबाचा बाजार बंद पडला असल्याची चर्चा परिसरात आहे.
पोलिसांकडून तपास सुरू
एबीपी माझाच्या बातमीनंतर (ABP Majha Impact) पोलिसांनी (Aurangabad Police) या बाबाची चौकशी सुरू केली आहे. बाबासाहेब शिंदेला औरंगाबाद ग्रामीणच्या पाचोड पोलिसांनी पोलीस ठाण्यात बोलवून त्याचा जबाब नोंदवून घेतला आहे. सोबतच इतर आणखी सात ते आठ लोकांचा जबाब घेण्यात आला आहे. तर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पारुंडी गावात जाऊन शिंदे सभा भरवत असलेल्या ठिकाणची पाहणी केली आहे. त्यामुळे लवकरच या भोंदूबाबावर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- Abdul Sattar : टीईटी प्रकरणानंतर अब्दुल सत्तारांच्या अडचणी पुन्हा वाढल्या; आता निवडणूक प्रतिज्ञापत्रावरुन चौकशीचे आदेश
- एक बॉयफ्रेंड दोन गर्लफ्रेंड; दोघींमध्ये पैठणच्या भर बाजारातच फ्री स्टाईल, तरुण मात्र पसार
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)