(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Abdul Sattar : टीईटी प्रकरणानंतर अब्दुल सत्तारांच्या अडचणी पुन्हा वाढल्या; आता निवडणूक प्रतिज्ञापत्रावरुन चौकशीचे आदेश
Abdul Sattar : टीईटी प्रकरणानंतर कृषी मंत्री अब्दुल सत्तारांच्या अडचणी पुन्हा वाढल्या आहेत. आता निवडणूक प्रतिज्ञापत्रावरुन त्यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
Abdul Sattar : टीईटी प्रकरणानंतर कृषी मंत्री अब्दुल सत्तारांच्या अडचणी पुन्हा वाढल्या आहेत. आता निवडणूक प्रतिज्ञापत्रावरुन त्यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. सिल्लोड प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कोर्टाने मंत्री अब्दुल सत्तार यांची या प्रकरणी सखोल चौकशीचे आदेश आदेश पोलिसांना दिले आहेत. पोलिसांना सखोल चौकशी करून 60 दिवसात अहवाल द्यावा लागणार आहे.
सिल्लोडमधील महेश शंकरपेल्ली आणि पुण्यातील डॉ अभिषेक हरिदास यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार आणि इतर विरोधात तक्रार दाखल केली होती. सत्तार यांनी निवडणुकीवेळी दिलेल्या शपथ पत्रात शेतजमीन, बिगरशेती जमीन, वाणिज्य इमारती, निवासी इमारती, शैक्षणिक अहर्तेबाबत तफावत असलेली माहिती सादर केली होती. या बाबत अभ्यास करून महेश शंकरपेल्ली आणि डॉ अभिषेक हरिदास यांनी केस दाखल केली.
या केसमध्ये सिल्लोड न्यायालयाने पोलिसांना सी.आर.पी.सी 202 अंतर्गत तपासाचे आदेश दिले होते. सदर आदेशानुसार पोलिसांनी अहवाल देखील सादर केला होता. परंतु पोलिसांनी भ्रामक, त्रुटीयुक्त अहवाल देऊन अभय दिले असल्या बाबत फिर्यादींनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले होते. सिल्लोड न्यायालयाने पोलिसांना पुनश्च सखोल चौकशी करून 60 दिवसात अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत.
अब्दुल सत्तारांवर आता काय आहेत आरोप
अब्दुल सत्तार यांनी सन 2014 आणि 2019 निवडणूक नामनिर्देशन शपथपत्रांमध्ये चुकीची माहिती दिली.
निवडणूक नामनिर्देशन शपथपत्रांमध्ये मौजे दहिगाव येथील शेत जमिनीचे मूल्य 2019 ला 2,76,250 व 2014 मध्ये 5,06,000 हजार दाखवली.
सिल्लोड सर्वे नंबर 90/2 वाणिज्य इमारतीची किंमत सन 2019 मध्ये 28,500 तर 2014 मध्ये 46,000 रुपये नमूद केली.
सिल्लोड सर्वे नंबर 90/2 पत्नीच्या नावे असलेली वाणिज्य इमारतीची किंमत 18,55,500 तर 2014 मध्ये 1,70,000 रुपये नमूद केली.
सिल्लोड सर्वे नंबर 364 निवासी इमारतीची खरेदी किंमत 2019 मध्ये 10,000 तर 2014 मध्ये 42,66,000 हजार दाखवली.
सर्वे नंबर 364 मधील पत्नीच्या नावे असलेली निवासी इमारत सन 2019 मध्ये 1,65,000 हजार तर 2014 मध्ये 16,53,000 हजार रुपये दाखवली.
प्रतिज्ञापत्रांमध्ये सन 2019 मध्ये अब्दुल सत्तार हे BAFY 1984 ला यशवंतराव चव्हाण महाविद्यालय सिल्लोड इथून तर 2014 चे प्रतिज्ञा पत्रानुसार अब्दुल सत्तार हे HSC 1984 आणि BA अपियर्ड दाखवले आहे.
त्यामुळे त्यांच्यावर सिल्लोड न्यायालयात सीआरपीसी 200 अंतर्गत आयपीसी 199, 200, 420 व 34 तसेच लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 कलम 125 नुसार याचिका दाखल करण्यात आली.
महत्वाच्या बातम्या...
मोठी बातमी! टीईटी घोटाळ्यात अपात्र ठरलेल्या राज्यातील शिक्षकांचे पगार ऑगस्ट महिन्यापासून बंद