एक्स्प्लोर

Aurangabad: राष्ट्रवादी युवकच्या जिल्हाध्यक्षावर हल्ल्याप्रकरणी मोठी माहिती आली समोर; हल्ला करणारे शिंदे गटाशी संबंधित

Aurangabad: पैठण तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या रागातून राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या नेत्यांवर जीवघेणा हल्ला झाला. या प्रकरणातील आरोपी हे शिंदे गटाशी संबंधित असल्याचे समोर आले आहे.

Aurangabad:  औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील बोकुड जळगाव येथे झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या रागातून राष्ट्रवादीच्या युवक (NCP Youth Wing) जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब तरमळे (Bhausaheb Tarmale) यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास समोर आली आहे. मात्र या प्रकरणात आणखी एक मोठी माहिती समोर आली आहे. तरमळे यांच्यावर हल्ला करणारे आरोपी शिंदे गटाचे पदाधिकारी असल्याचं समोर आले आहेत. विशेष म्हणजे ग्रामपंचायत निवडणूक देखील त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना पुरस्कृत अशी लढवली होती. आता याबाबत निवडणूकचे काही बॅनरचे फोटो देखील समोर आले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, काही दिवसांपूर्वी बोकुड जळगाव येथील ग्रामपंचायत निवडणुक पार पडली होती. याच निवडणुकीत राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब तरमळे यांच्या मातोश्री मीराबाई तरमळे यांनी सरपंच पदासाठी निवडणूक लढवली होती. ज्यात त्यांचा विजय झाला होता. दरम्यान हाच पराभव न पचल्याने विरोधी गटातील अनिकेत नागे याने हातातील चाकुने भाऊसाहेब तरमळे यांच्यावर शनिवारी रात्री अचानक हल्ला केला. भाऊसाहेब यांच्या डोक्यावर, मानेवर चाकुचा मार लागला आहे. या हल्ल्यात भाऊसाहेब गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र मोठा रक्तस्त्राव झाल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. 

आरोपी शिंदे गटाचे!

भाऊसाहेब तरमळे यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आता नवीन माहिती समोर आली आहे. तरमळे यांच्यावर हल्ला करणारे आरोपी शिंदे गटाचे पदअधिकारी असल्याचं समोर आलंय. विशेष म्हणजे ग्रामपंचायतच्या निवडणुकीत मुख्य आरोपी अनिकेत नागे याची आई कविता अशोक नागे या बाळासाहेबांची शिवसेना पुरस्कृत सरपंच पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात होत्या. तर याप्रकरणी एकूण सात लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

हे आहेत आरोपी!

याप्रकरणी सात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ज्यात अनिकेत अशोक नागे, राजु बनकर,आकाश अशोक नागे, दिनेश राठोड, अशोक रामनाथ नागे, सुनिल रुपचंद खरात, पांडुरंग भाकचंद नागे (सर्व रा. बोकुडजळगांव पैठण) असे आरोपींचे नावं आहे.

गावात पोलिसांचा बंदोबस्त

बोकुड जळगाव येथे झालेल्या राड्यानंतर घटनास्थळी पोलिसांनी तात्काळ धाव घेत, तरमळे यांना रुग्णालयात दाखल केले. तर गावात शांततापूर्ण तणावाचे वातावरण आहे. खबरदारीचा उपाय म्हणून बिडकीन पोलिसांकडून गावात  बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच फरार आरोपींचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या:

About the author मोसीन शेख

मोसीन शेख
Read More

महत्त्वाच्या बातम्या

संभाजीनगर पदवीधरची लढाई ठरली; ठाकरेंकडून दिलीप घुगे अन् राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण आमनेसामने, राजकीय खलबतं
संभाजीनगर पदवीधरची लढाई ठरली; ठाकरेंकडून दिलीप घुगे अन् राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण आमनेसामने, राजकीय खलबतं
मराठवाड्यात कुठे किती चारा शिल्लक? कुठे 175 दिवसांचा, तर कुठे फक्त 76 दिवसांचा साठा! किती पंचनामे पूर्ण? वाचा सविस्तर
मराठवाड्यात कुठे किती चारा शिल्लक? कुठे 175 दिवसांचा, तर कुठे फक्त 76 दिवसांचा साठा! किती पंचनामे पूर्ण? वाचा सविस्तर
महायुतीमध्ये छत्रपती संभाजीनगर पदवीधरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पारड्यात! सतीश चव्हाण यांच्या नावावर शिक्कामोर्तब
महायुतीमध्ये छत्रपती संभाजीनगर पदवीधरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पारड्यात! सतीश चव्हाण यांच्या नावावर शिक्कामोर्तब
Chhatrapati Sambhajinagar Drought: पाण्याची वाट पाहता पाहता पीक करपलं; शेततळी कोरडी, विहिरींनी तळ गाठला, संभाजीनगरच्या गावागावांमध्ये दुष्काळाचा दाह सोसवेना
पाण्याची वाट पाहता पाहता पीक करपलं; शेततळी कोरडी, विहिरींनी तळ गाठला, संभाजीनगरच्या गावागावांमध्ये दुष्काळाचा दाह सोसवेना

व्हिडीओ

CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
Sharad Koli Arrested : ठाकरेंच्या शिनसेनेचे उपनेते शरद कोळींना पोलिसांनी घेतलं ताब्यात | ABP Majha
Pune MPSC Protest : एमपीएससीचे आंदोलन, राजकारण्यांचा आखाडा? | Special Report ABP Majha
Raj Thackeray & India Alliance : 'इंडिया'ला मनसेचं इंजिन? | Special Report ABP Majha
Raj Thackeray Garjan Morcha Speech : SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राज ठाकरे कडाडले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MPSC Protest : आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
Devendra Fadnavis : 2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो मार्गिकांच्या कामासाठी नवं टार्गेट समोर ठेवलं.. 
2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मेट्रो मार्गिकांच्या कामांना गती देण्याच्या सूचना  
BJP Yuva Morcha Team : भाजप युवा मोर्चाची नवी टिम, 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी; शंभवी साळेकडे मोठी जबाबदारी, पाहा जिल्हानिहाय यादी
भाजप युवा मोर्चाची नवी टिम, 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी; शंभवी साळेकडे मोठी जबाबदारी, पाहा जिल्हानिहाय यादी
हिंगोलीत फटाक्याच्या गोदामाला भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू, 10 ते 12 जखमी, परिसरात खळबळ
हिंगोलीत फटाक्याच्या गोदामाला भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू, 10 ते 12 जखमी, परिसरात खळबळ
Repo Rate : रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणविषयक समितीची बैठक आजपासून सुरु, रेपो रेट वाढल्यास गृह कर्ज आणि वाहन कर्जधारकांना धक्का, EMI वाढणार
आरबीआय 7 ऑक्टोबरला रेपो रेट जाहीर करणार, रेपो रेट वाढल्यास गृह कर्ज आणि वाहन कर्जधारकांना धक्का, EMI वाढणार
रेल्वेतील स्टेशन मास्तरकडून महिला कर्मचाऱ्यास अश्लील व्हॉट्सअप चॅट; तक्रारीनंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी झोडलं
रेल्वेतील स्टेशन मास्तरकडून महिला कर्मचाऱ्यास अश्लील व्हॉट्सअप चॅट; तक्रारीनंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी झोडलं
Video: मी तुमच्या रागात सामिल व्हायला आलोय; राज ठाकरेंचा पुण्यातील MPSC आंदोलनात सहभाग, सांगितली 'मन की बात'
Video: मी तुमच्या रागात सामिल व्हायला आलोय; राज ठाकरेंचा पुण्यातील MPSC आंदोलनात सहभाग, सांगितली 'मन की बात'
Ravindra Chavan : नागपूर पदवीधरमध्ये बंडखोरी करत अनिल सोलेंकडून अर्ज दाखल, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सोले यांच्या घरी पोहोचले पण...
नागपूर पदवीधरमध्ये बंडखोरी करत अनिल सोलेंकडून अर्ज दाखल, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण थेट सोले यांच्या घरी पोहोचले पण...
Embed widget