(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aurangabad: दुपारी उन्हाचे चटके अन् पहाटे अंगाला बोचणारी थंडी; औरंगाबाद शहरात सर्दी-खोकल्याची साथ
Aurangabad News: लहान मुलांमध्ये झपाट्याने साथ पसरत असल्याने डॉक्टरांकडून काळजी घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
Aurangabad News: दिवसा कडक ऊन (Heat) आणि रात्री अंगाला बोचणारी थंडी (Cold) असे बदल सध्याच्या वातावरणात पाहायला मिळत आहे. तर याच वातावरण बदलामुळे आजारी पडणाऱ्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. तर घरोघरी सर्दी, खोकला, अंगदुखी आणि तापाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे सर्वच शासकीय आणि खाजगी रुग्णालये हाऊसफुल्ल गर्दी दिसत आहे. विशेष म्हणजे, लहान मुलांमध्ये झपाट्याने साथ पसरत असल्याने डॉक्टरांकडून काळजी घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
मागील काही दिवसांपासून शहरात तापमानवाढ सुरू आहे. रात्री आणि सकाळी कडाक्याची थंडी असे वातावरण सतत बदलत आहे. मागील सहा दिवस कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत 1 ते 3 अंशांनी जास्त असल्याचे दिसून आले. तर उत्तरेत बर्फवृष्टी सुरू असून, तिकडील अतिशीत वारे वाहून आल्याने पारा 3 ते 6 अंशांपर्यंत नीचांकी पातळीवर गेल्याची नोंद झाली आहे.
बदलत्या वातावरणाचे परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होतोय. तर डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार व्हायरल फिव्हरमुळे लहान मुले, महिला व वृद्ध आजारी पडत आहेत. सर्दी, खोकल्याने रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे उपचारासाठी रुग्णालयात गर्दी होताना दिसत आहे. अगदी ग्रामीण भागापासून शहरातील रुग्णालयात गर्दी असल्याचे चित्र आहे. चिखलठाणा येथील मिनी घाटीतील ओपीडी या आठवड्यापासून वाढली आहे. रुणांमध्ये सर्दी, खोकला, अंगदुखी, थंडी आणि तापेचे असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.
काळजी घेण्याचे आवाहन...
यावर्षी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सौम्य थंडी जाणवत होती. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात कमाल तापमानाने सरासरीपेक्षा तीन अंशांनी उसळी घेऊन 34.5 अंश उच्चांकी पातळीवर गेले होते. वेळेआधी तापमान वाढण्यास सुरुवात झाल्याचे चित्र आहे. सकाळी 9 पासून उन्हाचे चटके जाणवत आहेत. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. विशेष म्हणजे या काळात आजारी पडण्याची शक्यता अधिक असते.
पिकांना बसतोय फटका...
बदलत्या हवामानाचा परिणाम जसा मानवी जीवनावर होत आहे, तसाच पीकांवर देखील होत आहे. अनेक रब्बीच्या पीकांना या वातावरणाचा फटका बसतोय. त्यात दुपारी उन्हाचा चटका जाणवत असल्याने पीकांना पाण्याची अधिक गरज भासत आहे. तसेच यामुळे पीकांवरील रोग पडण्याची शक्यता देखील वाढली आहे. त्यामुळे या बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Aurangabad News: ...अन् अवघ्या एक हजारांत उडवला सात जोडप्यांच्या लग्नाचा बार; 'व्हॅलेंटाइन' पावला