एक्स्प्लोर

Aurangabad: एकाच दिवशी दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार, संतापजनक घटनेनं औरंगाबाद हादरलं

Aurangabad Crime News: पोलिसांनी या दोन्ही घटनेतील आरोपींना बेड्या ठोकल्या आहे.

Aurangabad Crime News: एकाच दिवशी शहरात दोन बलात्काराच्या घटनेने औरंगाबाद शहर हादरलं आहे. वाळूज महानगरात एकाच दिवशी दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. एका 10 वीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीला शाळेतून ढाब्यावर नेत तिच्यावर बलात्कार करण्यात आला आहे. तर दुसऱ्या घटनेत 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी घरात एकटीच असल्याची संधी साधत तिला घरातून ओढत शेतात नेऊन बलात्कार करण्यात आला आहे. पोलिसांनी या दोन्ही घटनेतील आरोपींना बेड्या ठोकल्या आहे. शिवा चौधरी आणि रमेश येडूबा मोरे असे दोन्ही आरोपींचे नावं आहेत. 

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वाळूज भागातील 10 वीच्या वर्गात शिकणाऱ्या एका मुलीसोबत आरोपीने मैत्रीचा बहाणा करून तिला आपल्या जाळ्यात ओढले. त्यानंतर या विद्यार्थिनीला तिच्या शाळेच्या गेटपासून आपल्या दुचाकीवर बसवून खुलताबाद येथील एका ढाब्यावर घेऊन गेला. तिथे गेल्यावर तिच्यावर बळजबरीने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तर आरोपीने यापूर्वी देखील या अल्पवयीन मुलीला तीन ते चार वेळा ढाब्यावर नेऊन तिच्यावर बलात्कार केला.  याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी शिवा चौधरी याला पोलिसांनी अटक केली आहे. 

दुसऱ्या एका घटनेत 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला आहे. यातील आरोपीने घराच्या पाठीमागून येऊन पीडित मुलीला पिण्याचे पाणी मागितले. पणी घेऊन आलेल्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला आरोपीने बळजबरीने कपाशीच्या शेतात ओढत नेलं. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. तर घडलेला प्रकार कुणालाही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. मात्र मुलीने हिम्मत करत घडलेला प्रकार कुटुंबातील सदस्यांना सांगितला आणि त्यानंतर रमेश येडूबा मोरे या नराधमाविरोधात वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

बलात्काराच्या घटनेनं शहर हादरलं...

औरंगाबाद शहरातील मागील काही दिवसांच्या घटना पाहता, शहरात महिला सुरक्षेचा मुद्दा कायम समोर येत आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी शाळेतील अल्पवयीन मुलींसोबत रिक्षाचालकाने अश्लील चाळे करण्याचा प्रकार समोर आल्याने पालकांमध्ये खळबळ उडाली होती. त्यातच आता वाळूज भागात एकाच दिवशी दोन अल्पवयीन मुलीवरील बलात्काराच्या घटना समोर आल्याने शहर हादरलं आहे. त्यामुळे आता शहरातील महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा एरणीवर आला आहे. 

संतापजनक! स्कूलबसमध्ये घुसून रिक्षाचालक करायचा शाळकरी मुलींशी अश्लील चाळे, पालकांनी सापळा लावून दिला चोप

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj jarange Health : अशक्तपणा, पोटदूखी, पाच दिवसाच्या उपोषणानंतर जरांगे रुग्णालयात दाखलPlane book for Yatra Kolhapur : भादवणकरांचा नाद खुळा, गावच्या यात्रेला थेट विमान बूक, मुंबईतून रवानाPune Police on Sam David | सॅमचा बॉलिवूड ते आंतरराष्ट्रीय सायबर टोळीचा प्रवास, पोलिसांकडून पर्दाफाशManoj Jarange On Mumbai : मुंबई जाम होणार मराठा मागे येणार नाही, जरांगेंचा इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
सुरेश धसांनी ज्यूस पाजला, मनोज जरांगेंचं अंतरावालीतील उपोषण स्थगित; आता मोर्चा मुंबईकडे
सुरेश धसांनी ज्यूस पाजला, मनोज जरांगेंचं अंतरावालीतील उपोषण स्थगित; आता मोर्चा मुंबईकडे
Arvind Kejriwal : यमुनेत विष असल्याचा पुरावा द्या, नोटीसवर नोटीस सुरुच; केजरीवाल म्हणाले, निवडणूक आयुक्त राजकारण करत आहेत, दिल्लीतून निवडणूक का लढवत नाही?
यमुनेत विष असल्याचा पुरावा द्या, नोटीसवर नोटीस सुरुच; केजरीवाल म्हणाले, निवडणूक आयुक्त राजकारण करत आहेत, दिल्लीतून निवडणूक का लढवत नाही?
Embed widget