एक्स्प्लोर

मुलांचं कर्तव्य गेलं कुठं? बहिणींनी सख्ख्या भावांना का करु दिले नाहीत आईवर अंत्यसंस्कार?

90 वर्षीय आईचे निधन झालयावर तीन मुलींनी आपल्या आईवर अंत्यसंस्कार केले आहेत. सख्ख्या भावाला त्यांनी आईचे अंत्यसंस्कार करण्यापासून रोखले आहे. ही घटना औरंगाबाद जिल्ह्यात घडली आहे.

औरंगाबाद : वृद्धापकाळाने निधन झालेल्या आपल्या आईवर तीन मुलींनी अंत्यसंस्कार केले आहेत. या तिनही मुलींनी आपल्या सख्ख्या भावाला आईचे अंत्यसंस्कार करू दिले नाहीत. या तिनही मुलींनी एका जाऊबाईच्या मदतीने आईच्या मृतदेहाला खांदा देत स्मशानभूमी गाठली आणि अंत्यसंस्कार केले. ही घटना घडलीय औरंगाबाद  जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील लिहाखेडी या गावात. आता तुम्हाला सहाजीकच असा प्रश्न पडला असेल की, या मुलींनी आपल्या भावांना आईचे अंत्यसंस्कार करण्यापासून का रोखले? 

सिल्लोड तालुक्यातील लिहाखेडी येथील चंद्रभागाबाई आनंदा साखळे (वय, 90) यांचे निधन झाले. त्यांनी आपल्या तिनही मुलांना शिकवलं, मोठं केलं. पण आईच्या उपकाराची परतफेड करण्याची वेळ आल्यानंतर त्यांच्या तिनही मुलांनी 20 वर्षांपूर्वी  त्यांना घराबाहेर हाकलून दिले. वंशाच्या दिव्यांनीच घरातून बाहेर काढल्यानंतर  'त्या' आईला आधार दिला, तो मुली आणि जावयांनी. अखेर वृद्धापकाळाने शनिवारी चंद्रभागाबाई यांनी जगाचा निरोप घेतला. तिच्या अंत्यसंस्कारालादेखील तीन मुलांपैकी दोघांनी फक्त पाहुण्यांसारखी हजेरी लावल्याने संतप्त लेकींनी त्या दोघांनाही आईच्या मृतदेहाला हात लावू दिला नाही. सुभद्राबाई श्रीकृष्ण टाकसाळे (रा. औरंगाबाद), सुनीता शिवाजी सोने (रा. अनवी), जिजाबाई उत्तम टाकसाळे (रा. कोटनांद्रा), तर जाऊबाई छाया शिरसाठ (रा. लिहाखेडी) या चौघींनी आपल्या आईच्या मृतदेहाला खांदा दिला आहे.


मुलांचं कर्तव्य गेलं कुठं? बहिणींनी सख्ख्या भावांना का करु दिले नाहीत आईवर अंत्यसंस्कार?

मुलांनी चंद्रभागाबाईंना वाऱ्यावर सोडले होते. तरीही त्यांना आपल्या तिन्ही मुलांना भेटायची इच्छा होती. अनेक वेळा तिन्ही मुलांना फोन करूनही ते आईला बघायला फिरकले नाहीत. शेवटी मुलांच्या भेटीविनाच तिने आपले प्राण सोडले. पोटाला चिमटा घेऊन चंद्रभागाबाईंनी तिन्ही मुलांसह मुलींना शिक्षण दिले. काबाडकष्ट करून मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी पै-पै जमा केली. मुलगा सेवानिवृत्त कृषी अधिकारी, दुसरा उच्च न्यायालयात क्लर्क, तर तिसरा मुलगा एका खासगी कंपनीत उच्च पदावर आहे. पण या मुलांनी सुखाच्या प्रसंगात आईला आपल्यापासून दूर केले. अखेर त्या आईला मायेचा आधार मिळाला, तो औरंगाबाद शहरात राहणारी मुलगी सुभदा आणि जावई श्रीकृष्ण टाकसाळे यांचा.


मुलांचं कर्तव्य गेलं कुठं? बहिणींनी सख्ख्या भावांना का करु दिले नाहीत आईवर अंत्यसंस्कार?

तीस वर्षांपूर्वी वडिलांचे निधन झाले होते. तेव्हापासून माझ्या भावांनी आईला सोडून दिलेले आहे. सुरुवातीची दहा वर्षे ती आम्हा बहिणींकडे राहत असे. तर गेल्या वीस वर्षांपासून ती माझ्याकडे होती. मुलीच्या नात्याने मी तिचे सर्व कर्तव्य पूर्ण केले. पण भाऊ मात्र कर्तव्य विसरले. असे निर्दयी भाऊ व मुले कोणालाही मिळवू नयेत, अशी संतप्त प्रतिक्रिया तिनही बहिणींनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

 

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange Patil: 28 ऑगस्टच्या आत सर्व मागण्या पूर्ण करा, अन्यथा 29 ऑगस्टनंतर सरकारची जिरवणार; मनोज जरांगेंचा थेट इशारा
28 ऑगस्टच्या आत सर्व मागण्या पूर्ण करा, अन्यथा 29 ऑगस्टनंतर सरकारची जिरवणार; मनोज जरांगेंचा थेट इशारा
Chhatrapati Sambhajinagar: गाडीला जॅमर लावलं, चालक संतापला; भररस्त्यात चक्क स्वतःचीच कार पेटवली, छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळजनक घटना
गाडीला जॅमर लावलं, चालक संतापला; भररस्त्यात चक्क स्वतःचीच कार पेटवली, छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळजनक घटना
Prakash Mahajan on Prithviraj Chavan: सोनिया गांधींची परवानगी असताना मनमोहन सिंग यांच्यात नाही म्हणण्याची क्षमता होती का?; प्रकाश महाजनांचा पृथ्वीराज चव्हाणांना थेट सवाल
सोनिया गांधींची परवानगी असताना मनमोहन सिंग यांच्यात नाही म्हणण्याची क्षमता होती का?; प्रकाश महाजनांचा पृथ्वीराज चव्हाणांना थेट सवाल
'शिंदे-फडणवीस पागल समजता का? पुन्हा भानगडी करू नका, तुम्हाला राजकारणातून संपवू'; मनोज जरांगे पाटलांची घणाघाती टीका
'शिंदे-फडणवीस पागल समजता का? पुन्हा भानगडी करू नका, तुम्हाला राजकारणातून संपवू'; मनोज जरांगे पाटलांची घणाघाती टीका

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget