एक्स्प्लोर

Astrology : आज महालक्ष्मी योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 5 राशींची चांदीच चांदी, होणार बक्कळ धनलाभ

Panchang 25 September 2024 : आज बुधवारचा दिवस हा अनेक शुभ योगांनी संपन्न झाला आहे, या दिवशी महालक्ष्मी योग निर्माण झाल्याने याचा सर्वाधिक लाभ 5 राशींना होणार आहे. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

Astrology Panchang 25 September 2024 : आज बुधवार, 25 सप्टेंबर रोजी चंद्र मिथुन राशीत संक्रमण करणार आहे, जिथे मंगळ आधीपासूनच आहे, त्यामुळे आज महालक्ष्मी राजयोग तयार होत आहे. तसेच, आज भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाची नववी तिथी आहे आणि या तिथीला नवमी श्राद्ध केलं जाईल, याला मातृ नवमी किंवा सौभाग्यवतीनाम श्राद्ध असेही म्हणतात. या दिवशी मृत महिला आणि मुलींचं श्राद्ध केलं जातं.

मातृ नवमीच्या दिवशी महालक्ष्मी राजयोगासोबत वरियान योग आणि आद्रा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजचं महत्त्व अधिकच वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 5 राशींना (Zodiac Signs) या शुभ संयोग योगांचा फायदा होणार आहे, या राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

मेष रास (Aries)

आजचा म्हणजेच मातृ नवमीचा दिवस मेष राशीच्या लोकांसाठी सकारात्मक असणार आहे. मेष राशीच्या लोकांच्या घरी आज श्राद्ध विधी आयोजित केला जाऊ शकतो, त्यामुळे घरातील वातावरण धार्मिक राहील आणि कुटुंबातील सर्व सदस्यही सहकार्य करतील. पूर्वजांच्या आशीर्वादाने तुम्हाला तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात सुरू असलेल्या समस्यांपासून आराम मिळेल. वाहन आणि मालमत्ता खरेदी करण्याची तुमची इच्छा देखील पूर्ण होईल. नोकरी शोधणाऱ्यांना नवीन नोकरी मिळवायची असेल तर आज त्यांना चांगल्या उत्पन्नासह मोठ्या कंपनीकडून ऑफर मिळू शकते. आज तुम्हाला कुटुंबासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल.

सिंह रास (Leo)

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा, म्हणजेच मातृ नवमीचा दिवस विशेष फलदायी असणार आहे. आज तुम्ही तुमच्या सभोवतालचं वातावरण आनंददायी ठेवू शकाल. तुमच्या पूर्वजांच्या आशीर्वादाने तुम्हाला आज भौतिक सुख मिळेल आणि अचानक आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे. आजचा दिवस गुंतवणुकीसाठी खूप चांगला असणार आहे, त्यामुळे तुम्ही आज कुठेतरी पैसे गुंतवू शकता. व्यवसाय करणाऱ्यांना आज चांगला आर्थिक फायदा होईल आणि व्यवसाय वाढवण्याचे जे प्रयत्न सुरू आहेत तेही पूर्णत: यशस्वी होतील. नशिबाच्या पाठिंब्याने कौटुंबिक आणि वैवाहिक समस्या संपतील आणि कुटुंबातील सदस्यांसोबत सुरू असलेले मतभेदही मिटतील. 

वृश्चिक रास (Scorpio)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा, म्हणजेच मातृ नवमीचा दिवस लाभदायक असणार आहे. अविवाहितांच्या आयुष्यात काही खास व्यक्ती दस्तक देऊ शकतात, ज्याचा विचार करून मनालाही आनंद वाटेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आज शुभ परिणाम मिळतील आणि एकाग्रता वाढल्यामुळे तुमच्यासाठी गोष्टी अधिक स्पष्ट होतील. नोकरदारांचे आज सहकाऱ्यांशी चांगले संबंध राहतील आणि सर्व प्रकारचे गैरसमज दूर झाल्याने कार्यालयीन कामे करावीशी वाटतील. संध्याकाळी मित्रांसोबत हँग आउट करताना तुम्हाला काही महत्त्वाची माहिती मिळू शकते.

धनु रास (Sagittarius)

आजचा म्हणजेच, मातृ नवमीचा दिवस धनु राशीच्या लोकांसाठी शुभ असणार आहे. धनु राशीच्या लोकांच्या पूर्वजांच्या आशीर्वादाने रखडलेल्या कामांना गती मिळेल आणि तुम्हाला पूर्णपणे उत्साही वाटाल. सामाजिक आणि धार्मिक कार्यात तुम्ही सक्रिय सहभाग घ्याल, त्यामुळे तुमची कीर्ती सर्वत्र पसरेल आणि अनेक प्रतिष्ठित लोकांशी जनसंपर्कही वाढेल. आज नोकरी करणाऱ्यांना अधिकाऱ्यांच्या सहकार्याने नवीन प्रकल्पांवर काम करण्याची संधी मिळेल. त्याचबरोबर व्यापाऱ्यांना भरघोस नफा मिळाल्याने व्यवसायाची प्रतिष्ठाही वाढणार आहे. पितरांसाठी दानधर्म केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळेल आणि कुटुंबात सुख-शांती नांदेल.

कुंभ रास (Aquarius)

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा म्हणजेच, मातृ नवमीचा दिवस लाभदायक असणार आहे. कुंभ राशीच्या लोकांना त्यांच्या पूर्वजांच्या आशीर्वादाने अडकलेला पैसा आज मिळेल आणि मिळालेला पैसा काही चांगल्या गुंतवणुकीत गुंतवता येईल. जर तुम्ही बऱ्याच काळापासून कोणत्याही कायदेशीर प्रकरणांमध्ये अडकले असाल तर आज निर्णय तुमच्या बाजूने येऊ शकतो, ज्यामुळे तुमच्या मनावरील ओझं देखील हलकं होईल. नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्यांना आज आपापल्या क्षेत्रात अनेक फायदेशीर संधी मिळतील आणि नफाही वाढेल. तुमच्या जोडीदारासोबत काही तणाव सुरू असेल तर तो आज संपेल आणि एकमेकांमधील समन्वय वाढेल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Horoscope Today 25 September 2024 : आज बुधवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ममतादीदींचा 'इंडिया'च्या नेतृत्वावर दावा, अनेक पक्षांची साथ; काँग्रेसच्या मौनामुळे नेत्यांचा राहुल गांधींवरचा विश्वास उडणार?
ममतादीदींचा 'इंडिया'च्या नेतृत्वावर दावा, अनेक पक्षांची साथ; काँग्रेसच्या मौनामुळे नेत्यांचा राहुल गांधींवरचा विश्वास उडणार?
एबीपी माझा इम्पॅक्ट; अस्तित्वात नसलेल्या औषधांच्या 5 कंपन्या उघडकीस, आता चौकशी होणार
एबीपी माझा इम्पॅक्ट; अस्तित्वात नसलेल्या औषधांच्या 5 कंपन्या उघडकीस, आता चौकशी होणार
Prakash Ambedkar : देशातील जनतेला हिंसाचार करण्याचा आधिकार, एक देश एक निवडणूकच्या सरकारच्या भूमिकेवर प्रकाश आंबेडकरांची संतप्त प्रतिक्रिया
देशातील जनतेला हिंसाचार करण्याचा आधिकार, एक देश एक निवडणूकच्या सरकारच्या भूमिकेवर प्रकाश आंबेडकरांची संतप्त प्रतिक्रिया
Satish Wagh Murder Case : आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Best Bus Driver Viral Video : धक्कादायक! बस थांबवून दारू घेतली.. BEST बस चालकाचा प्रताप FULL VIDEOZero Hour  INDIA Alliance Leadership : इंडिया आघाडीतील संघर्षाचा मविआवर परिणाम?ABP Majha Headlines : 11 PM : 10 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सZero Hour Priyanka Chaturvedi : इंडिया आघाडीच्या नेतृत्त्वाच्या मुद्द्यावर ठाकरे कुणाच्या बाजूने?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ममतादीदींचा 'इंडिया'च्या नेतृत्वावर दावा, अनेक पक्षांची साथ; काँग्रेसच्या मौनामुळे नेत्यांचा राहुल गांधींवरचा विश्वास उडणार?
ममतादीदींचा 'इंडिया'च्या नेतृत्वावर दावा, अनेक पक्षांची साथ; काँग्रेसच्या मौनामुळे नेत्यांचा राहुल गांधींवरचा विश्वास उडणार?
एबीपी माझा इम्पॅक्ट; अस्तित्वात नसलेल्या औषधांच्या 5 कंपन्या उघडकीस, आता चौकशी होणार
एबीपी माझा इम्पॅक्ट; अस्तित्वात नसलेल्या औषधांच्या 5 कंपन्या उघडकीस, आता चौकशी होणार
Prakash Ambedkar : देशातील जनतेला हिंसाचार करण्याचा आधिकार, एक देश एक निवडणूकच्या सरकारच्या भूमिकेवर प्रकाश आंबेडकरांची संतप्त प्रतिक्रिया
देशातील जनतेला हिंसाचार करण्याचा आधिकार, एक देश एक निवडणूकच्या सरकारच्या भूमिकेवर प्रकाश आंबेडकरांची संतप्त प्रतिक्रिया
Satish Wagh Murder Case : आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
Fact Check : नरेंद्र मोदींच्या पश्चिम बंगालमधील सभेच्या व्हिडीओत छेडछाड, व्हायरल व्हिडीओचं सत्य समोर
नरेंद्र मोदींच्या पश्चिम बंगालमधील सभेच्या व्हिडीओत छेडछाड, व्हायरल व्हिडीओचं सत्य समोर
Pune Crime : धक्कादायक! बांगलादेशी व्यक्तीने पुण्यात जागा घेऊन घरही बांधले, 500 रुपयात बनावट आधारकार्ड काढलं
धक्कादायक! बांगलादेशी व्यक्तीने पुण्यात जागा घेऊन घरही बांधले, 500 रुपयात बनावट आधारकार्ड काढलं
जालन्यातील लाडक्या भावाने 7500 रुपये केले परत; लाडकी बहीण योजनेचा मिळाला होता लाभ
जालन्यातील लाडक्या भावाने 7500 रुपये केले परत; लाडकी बहीण योजनेचा मिळाला होता लाभ
JCB full form : खोदकाम आवडीने पाहता, पण JCB चा फुल फॉर्म माहिती आहे का?
खोदकाम आवडीने पाहता, पण JCB चा फुल फॉर्म माहिती आहे का?
Embed widget