एक्स्प्लोर

Anjali Damaniya On Santosh Deshmukh Case: आई तुम्ही भोळ्या, आपण वास्तव पिक्चर बघा...; वाल्मिक कराडच्या आईला अंजली दमानियांचा सल्ला

Anjali Damaniya On Santosh Deshmukh Case: वाल्मिक कराडच्या आईच्या आंदोलनावर अंजली दमानिया यांनी सवाल उपस्थित केले आहेत. 

Anjali Damaniya On Santosh Deshmukh Case: बीडच्या परळी शहर पोलीस ठाण्याबाहेर वाल्मिक कराडच्या आईचं ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे. माझ्या मुलाला न्याय द्या, अशी मागणी वाल्मिक कराडच्या आईने केली आहे. वाल्मिक कराडच्या आईच्या आंदोलनावर अंजली दमानिया यांनी सवाल उपस्थित केले आहेत. 

अंजली दमानिया नेमकं काय म्हणाल्या?

वाल्मिक कराड यांच्या आईंना सर्वप्रथम नमस्कार...आई आपण भोळ्या आहात, आपला मुलगा आणि नातू काय करतात ह्याची कल्पना तुम्हाला असती तर आपण ‘माझ्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे’ असे कधीच म्हणाला नसतात. आपल्या मुलावर असलेल्या आरोपांची यादी मी पाठवत आहे. आपण पहावी ही विनंती. त्यांच्यावर ह्याच गुन्ह्यात झालेला FIR देखील आपण पहावा. आपल्याला काही प्रश्न

1. आपल्या मुलाकडे इतक्या गाड्या कुठून आल्या हा प्रश्न आपल्याला पडला नाही का ? 
2. आपल्या नातवाकडे बंदूक कशासाठी आहे हा प्रश्न आपल्याला पडला नाही का ? 
3. आपला मुलगा काय उद्योग करतो हा प्रश्न आपल्याला पडला नाही का ? 
4. संतोष मुंडे ह्याच्या क्रूर हत्येनंतर त्यांचा पत्नीने वाल्मिक कराड यांचे नाव घेतले, ते चुकीचे आहे का ? 
5. आवादा कंपनीचे लोक ह्यानी केलेला FIR खोटा आहे का ? 
6. गोट्या गित्ते सारखी माणस सदगृहस्त आहेत का ?

एक आई म्हणून आपल्या मुलाबद्दल प्रेम असणे योग्य आहे, पण डोळ्यावर पट्टी बांधून चालणार नाही. त्यामागचे वास्तव आपण बघा ही विनंती. ‘वास्तव’ ह्या पिक्चर आपण बघा. एक वाया गेलेल्या मुलाला, आईने काय करायला हवं, ते आपण पाहा...संतोष देशमुख हे देखील कोणाचे पाती, वडील व भाऊ होते. त्यांना न्याय मिळायला हवा की नाही?, असा सवाल अंजली दमानिया यांनी उपस्थित केला आहे.

वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक

तर दुसरीकडे वाल्मिक कराडच्या मातोश्री आता मैदानात उतरल्या आहेत. लेकाच्या न्यायासाठी वाल्मिक कराडच्या मातोश्रींनी परळी पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या आंदोलनास सुरुवात केली आहे. अशातच आता परळीत वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले आहे. परळीच्या राणी लक्ष्मीबाई टॉवरवर हे समर्थक चढले असून या समर्थकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. परळीत दोन ठिकाणी कराड समर्थकांचे आंदोलन सुरू असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे आता आगामी काळात कराड विरुद्ध देशमुख असा वाद रंगण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.

वाल्मिक कराड समर्थकांचं टॉवर आंदोलन, आईंचा पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या, VIDEO:

संबंधित बातमी:

दोन घडामोडींमुळे शंकेची पाल चुकचुकली; अंजली दमानिया यांनी घटनाच सांगितली!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

टीका जिव्हारी लागली नाही, नोंद घ्यावी अशी ती व्यक्ती नाही, शरद पवारांचा अमित शाह यांना टोला 
टीका जिव्हारी लागली नाही, नोंद घ्यावी अशी ती व्यक्ती नाही, शरद पवारांचा अमित शाह यांना टोला 
Walmik Karad mother Parli : आईसोबत परळीकरांचाही ठिय्या, वाल्मिक कराड समर्थकांची घोषणाबाजी
Walmik Karad mother Parli : आईसोबत परळीकरांचाही ठिय्या, वाल्मिक कराड समर्थकांची घोषणाबाजी
वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक, दोन ठिकाणी आंदोलन, आईसोबत महिलांचा पोलिस स्टेशनबाहेर ठिय्या, कार्यकर्ते टॉवरवर चढले!
वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक, दोन ठिकाणी आंदोलन, आईसोबत महिलांचा पोलिस स्टेशनबाहेर ठिय्या, कार्यकर्ते टॉवरवर चढले!
Mutual Fund SIP : 25000 हजारांची एसआयपी दरवर्षी 10 टक्क्यांनी स्टेप अप केल्यास 10 वर्षात किती परतावा मिळणार? जाणून घ्या
25000 हजारांची एसआयपी 10 टक्क्यांनी स्टेपअप केल्यास 10 वर्षात किती परतावा मिळणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad- Jyoti Mangal Jadhav यांचा संबंध काय, FC रोडवरील संपत्तीचं गौडबंगाल काय? Vastav EP 122Walmik Karad Mother : माझ्या लेकाला न्याय मिळाला पाहिजे, सगळे गुन्हे खोटे, वाल्मिकच्या आईची सादWalmik Karad mother Parli : आईसोबत परळीकरांचाही ठिय्या, वाल्मिक कराड समर्थकांची घोषणाबाजीDhananjay Deshmukh On SIT : नवीन एसआयटी स्थापन, पण धनंजय देशमुख नाराजच

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टीका जिव्हारी लागली नाही, नोंद घ्यावी अशी ती व्यक्ती नाही, शरद पवारांचा अमित शाह यांना टोला 
टीका जिव्हारी लागली नाही, नोंद घ्यावी अशी ती व्यक्ती नाही, शरद पवारांचा अमित शाह यांना टोला 
Walmik Karad mother Parli : आईसोबत परळीकरांचाही ठिय्या, वाल्मिक कराड समर्थकांची घोषणाबाजी
Walmik Karad mother Parli : आईसोबत परळीकरांचाही ठिय्या, वाल्मिक कराड समर्थकांची घोषणाबाजी
वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक, दोन ठिकाणी आंदोलन, आईसोबत महिलांचा पोलिस स्टेशनबाहेर ठिय्या, कार्यकर्ते टॉवरवर चढले!
वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक, दोन ठिकाणी आंदोलन, आईसोबत महिलांचा पोलिस स्टेशनबाहेर ठिय्या, कार्यकर्ते टॉवरवर चढले!
Mutual Fund SIP : 25000 हजारांची एसआयपी दरवर्षी 10 टक्क्यांनी स्टेप अप केल्यास 10 वर्षात किती परतावा मिळणार? जाणून घ्या
25000 हजारांची एसआयपी 10 टक्क्यांनी स्टेपअप केल्यास 10 वर्षात किती परतावा मिळणार?
मंत्रालयातील लॅम्बोर्गिनी प्रकरणात रोहित पवारांचा गंभीर आरोप, VIP कारच्या मालकाचं नाव सांगितलं, म्हणाले....
मंत्रालयातील लॅम्बोर्गिनी प्रकरणात रोहित पवारांचा गंभीर आरोप, VIP कारच्या मालकाचं नाव सांगितलं, म्हणाले....
Dhananjay Deshmukh On SIT : नवीन एसआयटी स्थापन, पण धनंजय देशमुख नाराजच
Dhananjay Deshmukh On SIT : नवीन एसआयटी स्थापन, पण धनंजय देशमुख नाराजच
Walmik Karad: विस्कटलेले केस, वाढलेली पांढरी दाढी; 13 दिवस पोलीस कोठडीत राहिल्यानंतर ऐटीत राहणाऱ्या वाल्मिक कराडचं रुपडं पालटलं
विस्कटलेले केस, वाढलेली पांढरी दाढी ; 13 दिवस कोठडीत राहिलेल्या वाल्मिक कराडचं रुपडं पालटलं
Nashik Accident: नाशिकच्या भीषण अपघातात पुण्याच्या आयटी कंपनीतील एकटा विक्रांत कसा वाचला? आक्रित घडण्यापूर्वी मृत्यू समोर दिसला
नाशिकच्या भीषण अपघातापूर्वी विक्रांतला मृत्यू समोर दिसला, पण मित्रांनी ऐकलं नाही, नेमकं काय घडलं?
Embed widget