Chandrakant Patil : माझ्या बॅगेत आठ शर्ट, एकावर शाई फेकली की दुसरा घातलो, तिसऱ्या मिनिटाला कामाला लागतो; चंद्रकांत पाटलांनी सांगितली स्ट्रॅटेजी
Chandrakant Patil Amravati Visit: सोलापूरच्या दौऱ्यावर असताना चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेक करण्यात आली होती. त्यानंतर चंद्रकांत पाटील आज अमरावतीच्या दौऱ्यावर होते.
अमरावती : मी कशासाठीही तयार असतो, माझ्या बॅगेत आठ शर्ट असतात, एकावर शाई फेकली की दुसरा घालतो आणि तिसऱ्या मिनिटाला कामाला लागतो असं राज्याचे मंत्री आणि अमरावतीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil ) यांनी सांगितलं. आतापर्यंत आपल्यावर दोन वेळा शाई फेकली, पण मी पुन्हा लगेच कामाला लागलो असंही ते म्हणाले. चंद्रकांत पाटील आज अमरावती (Amravati) दौऱ्यावर होते. पालकमंत्रिपदाचा कार्यभार घेतल्यानंतर ते पहिल्यांदाचा जिल्ह्याच्या दौऱ्याव आले होते.
दर आठवड्याला अमरावतीला यावं असा माझा संकल्प आहे. मेळघाटमध्ये मोठा निधी जातो पण अंबलबजावणी होत नाही हे माझ्या निदर्शनास आले त्यामुळे मी मेळघाटात जाणार असल्याचं पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले.
शाई फेकली की लगेच दुसरा शर्ट घालतो
राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांच्यावर भीम आर्मीने शाईफेक केली होती. राज्य सरकारच्या कंत्राटी धोरणाच्या निषेधार्त त्यांनी शाई फेकली होती. त्यानंतर अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना चंद्रकांत पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, ठकाही छोटे दुकानं आज जिल्हाधिकारी परिसरात बंद केल्याचं मला समजलं. मी लगेच जिल्हाधिकारी यांना त्याबाबत कळवलं. काही होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी यांनी काळजी घेतली. पण मी त्यांना म्हटलं काही होत नाही आणि व्हायचं असेल तर चुकत नाही. मी कशासाठी ही तयार असतो. माझ्या बॅगमध्ये आठ शर्ट असतात. शाई फेकली की मी लगेच दुसरे शर्ट घालतो. आतापर्यंत दोनदा शाही फेकली पण मी तिसऱ्या मिनिटाला लगेच बाहेर पडतो.ठ
माझं पुणेच नाही तर कोल्हापूरकडे पण लक्ष असतं, कोणालाही 'अभी मेरा कुछ काम नही' म्हणून सोडता येत नाही, तसं करणं योग्य असतं असं मला वाटतं असं चंद्रकांत पाटलांनी सांगितलं.
सोलापुरात शाईफेक
चंद्रकांत पाटील हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते, शासकीय विश्रामगृहामध्ये दाखल झाल्यानंतर त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली होती. कंत्राटी भरती विरोधात भीम आर्मीच्या पदाधिकाऱ्याने घोषणाबाजी करत हे कृत्य केलं होतं. चंद्रकांत पाटील येणार म्हणून याठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता. पण त्यामधून या पदाधिकाऱ्याने पुढे जात शाईफेक केली होती.
पुण्यातही चंद्रकांत पाटील यांच्यावर झाली होती शाईफेक
त्याआधी पुण्यात मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली होती. महापुरुषांबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. दरम्यान यावेळी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली होती. त्यानंतर राज्यातलं राजकारण चांगलंच पेटलं होतं. तर ठिकठिकाणी आंदोलनं देखील करण्यात आली होती.
ही बातमी वाचा: