Bachchu Kadu : एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदावरून हटवल्यास भाजपला त्याचे मोठे परिणाम भोगावे लागतील, बच्चू कडूंचा इशारा
Bachchu Kadu On Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मानणारे पाच ते दहा टक्के मतदार असून ते नाराज होतील असं आमदार बच्चू कडू म्हणाले.
अमरावती: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पदावरून हटवल्यास त्याचं गंभीर परिणाम भाजपला भोगावे लागतील, त्यांचे कोणतेही प्लॅन कामी येणार नाहीत असा इशारा आमदार बच्चू कडू ( Bacchu Kadu ) यांनी दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अपात्र ठरल्यास अजितदादा मुख्यमंत्री होणार अशा चर्चा सुरू झाल्यानंतर यावर आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली.
आमदार बच्चू कडू म्हणाले की, असं होऊ शकत नाही, पण असं झाल्यास भाजपला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, कारण एकनाथ शिंदे यांचे देखील 5 ते 10 टक्के मतदार नाराज होतील. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवल्यास तुमचे काही प्लॅन कामी येणार नाहीत.
Bachchu Kadu On Eknath Shinde : आरक्षण ही राजकीय लोकांनी तयार केलेली जातीय व्यवस्था
मराठा आरक्षणानंतर धनगर आणि मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावं यासाठी सर्वच समाज आक्रमक झालेत. यावर आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली की. ते म्हणाले की, सरकारने एकदा आरक्षणाचा मुद्दा संपवायला पाहिजे. आरक्षण विषय हा राजकीय लोकांनी केलेली जातीय व्यवस्था आहे. कारण ते विकासावर मते घेऊ शकले नाही. आता निवडणुकीत समाजाच्या आरक्षणावर आणि जातीचे मुद्दे घेऊन मते मागितली जाणार.
अधिकारी काम करतात का?
आमदार बच्चू कडून यांनी राज्यातील कंत्राटी नोकर भरतीवर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, एकीकडे लोक आरक्षण मागत आहेत तर दुसरीकडे कंत्राटी नोकर भरती केली जातेय. अधिकाऱ्यांच्या कामाचं मूल्यांकन झालं का कधी? तो किती काम करतोय, पगाराप्रमाणे तो काम करतोय का? मग कंत्राटी कडून अपेक्षा काय ठेवता? स्वच्छ प्रशासन लावून कंत्राटी भरायला काहीच हरकत नाही.
ही बातमी वाचा: