मनोज जरांगेंच्या आंदोलनात सहभागी होणार, सरकार म्हणून आता माझी भूमिका संपली, बच्चू कडूंचे स्पष्टीकरण
Bacchu Kadu : मनोज जरांगे यांनी मुंबईच्या दिशेने कूच करण्याआधी बच्चू कडू हे सरकारचं शिष्टमंडळ म्हणून मनोज जरांगेंची समजूत काढण्यासाठी अंतरवाली सराटी येथे गेले होते. पण तरीही मनोज जरांगे हे त्यांच्या भूमिकेवर ठाम होते.
![मनोज जरांगेंच्या आंदोलनात सहभागी होणार, सरकार म्हणून आता माझी भूमिका संपली, बच्चू कडूंचे स्पष्टीकरण Bacchu kadu MLA Prahar said I will participate in Manoj Jarange Maratha Reservation protest detail marathi news मनोज जरांगेंच्या आंदोलनात सहभागी होणार, सरकार म्हणून आता माझी भूमिका संपली, बच्चू कडूंचे स्पष्टीकरण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/20/c4f48c52cb502292631262a61dd94eb21705746693151720_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
अमरावती : प्रहारचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) हे देखील मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या आंदोलनात सहभागी होणार असून सरकार म्हणून आता माझी भूमिका संपली, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली. शनिवार 20 जानेवारी रोजी मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने कूच केली. यावर बच्चू कडू यांनी भाष्य केलं आहे. सरकारने सगे सोयरेंबाबतीत भूमिका स्पष्ट केलीये आणि जरांगे पाटलांनी ती स्विकारली देखील, असं देखील बच्चू कडू यांनी म्हटलं.
अंतरवाली सराटी येथून शनिवार 20 जानेवारी रोजी मनोज जरांगे यांचे आंदोलन मुंबईच्या दिशेने सरकू लागले आहे. तसेच हे आंदोलन 26 जानेवारी रोजी मुंबईत धडकणार असल्याचा दावा देखील मनोज जरांगे यांनी केलाय. दरम्यान हे आंदोलन सुरु होण्याआधी बच्चू कडू हे सरकारचं शिष्टमंडळ म्हणून मनोज जरांगेंची समजूत काढण्यासाठी अंतरवाली सराटी येथे गेले होते. पण तरीही मनोज जरांगे हे त्यांच्या भूमिकेवर ठाम होते.
जरांगें पाटलांच्या आंदोलनाला यश यावं आणि समाजाचं भलं व्हावं - बच्चू कडू
कुणबी नोंदी बाबत दुरुस्त्या केल्या आहेत. नोंदी बाबत प्रश्न मिटला असल्याचं जरांगेंनी सांगितलं. तसेच सरकारने सगे सोयरे यांच्यासंदर्भात देखील भूमिका स्पष्ट केलीये. तसेच जरांगे पाटली यांनी ती भूमिका स्विकारली देखील आहे. 54 लाख नोंदी सापडलेल्यांना जातीचे दाखले दिले पाहिजे. याबाबत सरकार देखील सकारात्मक आहे. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यश यावं आणि समाजाचं भलं व्हावं यासाठी आम्ही प्रयत्न करतोय, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी दिली.
धोराणात्मक लढाई जरांगे पाटलांच्या आंदोलनाने जिंकली आहे - बच्चू कडू
धोराणात्मक लढाई मनोज जरांगेंच्या आंदोलनाने जिंकली आहे. तसेच मनोज जरांगे यांनी सरकारला जे काम सांगितलं ते सरकारने केलं आहे. तसेच सापडलेल्या नोंदीवर वंशावळ करणं हे फार किचकट काम आहे.
अधिसूचना आल्या तर जरांगे पाटील यांना मोठं यश - बच्चू कडू
चार ते पाच दिवस मुख्यमंत्री आणि आम्ही त्यावर सातत्याने काम केलं आहे. काही सूचना मनोज जरांगे यांनी सुचविल्या त्या दुरुस्त करुन देखील आणल्यात. ण एकदा वाचून सांगणार होते पण त्या अंतिम सूचना आल्या आणि जर त्याच अधिसूचना निघाल्या तर हे खूप मोठं यश जरांगे पाटील मुळे समाजाला होणार आहे. दुसरं जरांगे पाटील यांनी 54 लाखांना दाखला द्या सांगितले होते पण त्यात प्रशासन कमी पडले. हे मान्य आहे की 200 - 250 तरुणांनी आत्महत्या केल्या.शिंदे समिती, नोंणी पाहायचं काम झाले आहे. काहीच काम झाले नाही, असं बोलता येणार नाही. भावून होऊन ते म्हणाले असतील पण सरकारचं काम हे थोडं राहिलं आहे आणि ते पूर्ण करतील, असंही मनोज जरांगे म्हणालेत.
हेही वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)