एक्स्प्लोर
Sangli Politics: 'खासदारांचे जास्त मनावर घेऊ नका, ते अपक्ष आहेत', Jayant Patil यांचा Vishal Patil यांना टोला
सांगलीतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार जयंत पाटील आणि काँग्रेसचे बंडखोर अपक्ष खासदार विशाल पाटील यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. 'सांगलीच्या खासदारांचे जास्त मनावरती घेऊ नका, ते अपक्ष आहेत,' असा थेट टोला जयंत पाटील यांनी लगावला आहे. विशाल पाटील यांनी स्थानिक निवडणुकांमध्ये जयंत पाटलांना सोबत न घेता लढण्याची भूमिका घेतल्यानंतर जयंत पाटलांनी ही प्रतिक्रिया दिली. काँग्रेस नेते विश्वजित कदम यांच्याशी आमची चर्चा सुरू असून, ते विशाल पाटलांशी बोलतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, भारतीय जनता पक्षाला विरोध करणाऱ्या शेतकरी संघटनांसारख्या पक्षांनाही सोबत घेण्याची तयारी महाविकास आघाडीची असल्याचे संकेत जयंत पाटील यांनी दिले.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















