रागाच्या भरात घराबाहेर पडलेल्या मुलीवर सामूहिक अत्याचार, अमरावतीमध्ये धक्कादायक घटना, 5 नराधम पोलिसांच्या ताब्यात
Amravati News: अमरावती शहरातील वेलकम पॉईंटजवळील शेतात घेऊन गेले. तिथे तरुणांनी आळीपाळीने युवतीवर अत्याचार केले
अमरावती : अमरावती शहरात 25 वर्षीय युवतीवर जणांकडून सामुहिक अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. युवतीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करुन पोलिसांकडून आरोपींना अटक करण्यात आली आहे. यामध्ये पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून दोन दुचाकी आणि कार जप्त करण्यात आहे. सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपींना पकडण्यात यश आले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, विलासनगर येथील एका युवतीचे घरी भांडण झाले त्यानंतर युवती रागाच्या भरात घराबाहेर पडली. घरातून बाहेर पडल्यानंतर रस्त्याने जात असताना एका ओळखीच्या युवकाने विलासनगरमधून युवतीला राग शांत करण्यासाठी नेलं आणि दारू पाजली. त्यानंतर त्याने आपल्या चार मित्रांना बोलावले. त्यानंतर कारमध्ये आलेल्या तरुणांनी पीडिताला कारमध्ये बसवून अमरावती शहरातील वेलकम पॉईंटजवळील शेतात घेऊन गेले. तिथे तरुणांनी आळीपाळीने युवतीवर बलात्कार केला. त्यानंतर तरुणीला बुधवारी पहाटे एका ठिकाणी सोडण्यात आले.
तरुणांनी सोडल्यानंतर पीडिताने ताबडतोब पोलीस स्थानक गाठले. आज दुपारी 1 च्या जवळपास पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन अटक केली. या प्रकरणी गाडगेनगर पोलीसांनी मनोज डोंगरे (वय 29) यांच्यासह अक्षय सरदार (वय 29), अजय लोखंडे (वय 28), मिलिंद दहाट (वय 30), प्रीतम धडसे (वय 19) यांना अटक केली असून यांच्यावर गुन्हा दाखल केले असून त्यांच्याकडून चारचाकी गाडी जप्त केली आहे..
सीसीटीव्हीने आरोपीला पकडून दिले
पीडितीन तक्रार केल्यानंतर पोलिसांनी ज्या बारमध्ये दारु घेतली त्या हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. सीसीटीव्हीमध्ये पीडित महिलेला एका व्यक्ती हात पकडून जबरदस्तीने घेऊन जाताना दिसली. त्या फुटेजची बारकाईने चौकळी केली असता संशयीत व्यक्तीला विशालनगर येथून ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर संशयीत व्यक्तीची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्या आाधारे इतर तिघांना अटक करण्यात आली. गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी आणि कारदेखील यावेळी जप्त करण्यात आली.
राज्यात बाल लैंगिक अत्याचार आणि अल्पवयीन व महिलांवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. बदलापूरच्या शाळेतील बाल लैंगिक अत्याचाराची घटना समोर आल्यानंतर राज्यभर संतापाची लाट उसळली होती. या लाटेनंतर राज्यातील अनेक जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या घटना उघड झाल्या असून पोलिसांनी (Police) देखील तातडीने कारवाई करत गुन्हे दाखल केले आहेत. विशेष म्हणजे बदलापूरच्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीचा काही दिवसांपूर्वीच एन्काऊंटर करण्यात आल्याने राज्यात खळबळ उडाली होती.
हे ही वाचा :