एक्स्प्लोर

उपोषणकर्त्या कामगारांचा रोष, राधाकृष्ण विखे पाटलांना उद्घाटन न करताच परतावं लागलं

Radhakrishna Vikhe Patil : अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील अकोलाच्या दौऱ्यावर असून, यावेळी त्यांना उपोषणकर्ते कामगारांच्या रोषामुळे कार्यक्रमाचं उद्घाटन न करताच परतावं लागलंय.

Akola News : अकोल्यात शनिवारी रात्री उपोषणकर्ते कामगारांच्या रोषामुळे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांना एका कार्यक्रमाचं उद्घाटन न करताच परतावं लागलंय. अकोला (Akola) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या काही दिवसापासून बिर्ला कॉलनीतील कामगार कुटुंबीयांसह उपोषणाला बसले आहेत. या कामगारांच्या 70 कुटुंबांना प्रशासनाने घरे खाली करण्याची नोटीस दिल्याने हे उपोषण सुरु आहे. अकोला ऑइल इंडस्ट्रीज आणि बिर्ला ऑइल मिल हे तीस वर्षांपूर्वीच बंद पडले आहे. मात्र, 70 कामगारांची देणी थकल्याने या कामगारांचे कुटुंबीय मिलच्या जागेतच राहतायेत. त्यामुळे त्यांच्याकडून उपोषण सुरु आहे. याच उपोषणकर्ते कामगारांच्या रोषाचा सामना टाळण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील यांना कार्यक्रमाचं उद्घाटन न करताच परतावं लागलंय.

दरम्यान शनिवारी रात्री जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात 'बोलके रस्ते' या सौंदर्यकरण प्रकल्पाचा उद्घाटन राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते होणार होते. यासाठी विखे पाटील यांची वेळ घेऊन संपूर्ण तयारी देखील करण्यात आली होती. मात्र, याच कार्यालयाच्या परिसरात उपोषण करणाऱ्या कामगारांनी पालकमंत्र्यांनी आपल्याला भेटावं अशी मागणी केली होती. मात्र, पालकमंत्री न भेटताच निघून गेल्याने कामगारांनी पालकमंत्री आणि सरकारविरोधात मोठा रोष व्यक्त केलाय. यावेळी बोलताना कामगारांच्या भावना अनावर झाल्या होत्या. तर, यावर विखे पाटील यांचीप्रतिक्रिया मात्र मिळू शकली नाही. 

भूमी अभिलेख, मालमत्ता नोंदणीसह खरेदी विक्रीची सबरजिस्ट्रार कार्यालयाबाबत महत्वाचा निर्णय 

विखे पाटील अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. तर, अकोला जिल्ह्यातील अकोट येथील प्रांत आणि तहसील कार्यालयाचे उद्घाटन विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलतांना विखे म्हणाले की, "राज्याभरात भूमी अभिलेख आणि मालमत्ता नोंदणी आणि खरेदी विक्रीची सबरजिस्ट्रार कार्यालयं आता तहसील आणि प्रांत कार्यालय परिसरात होणार आहे. अनेक ठिकाणी ही कार्यालयं बाहेर असल्याने गैरव्यवहार होत असल्याची कबुली देखील विखे यांनी दिली. तर, चुकीच्या गोष्टींना आळा घालण्यासाठी सरकारने हा महत्वाचा निर्णय घेतला असल्याचा उल्लेख विखे पाटील यांनी केला. 

नवीन वाळू धोरणामुळे या क्षेत्रातील गुन्हेगारीला आळा बसला...

विखे पाटील यांच्या याच दौऱ्यात त्यांच्या हस्ते मूर्तिजापूर तालुक्यातील ताकवाडा येथे शासकीय वाळू विक्री केंद्राचा शुभारंभ करण्यात आले. तसेच लाखपुरी येथील श्री लक्षेश्वर संस्थानाचे 2 कोटी रुपयांच्या निधीतून सभागृह व सौदर्गीकरण कामांचे भूमिपूजन देखील करण्यात आले. तर यावेळी बोलतांना विखे म्हणाले की, "नवीन वाळू धोरणामुळे या क्षेत्रातील गुन्हेगारीला आळा बसून, सर्वसामान्यांना परवडेल अशा परात वाळ उपलब्ध होणार आहे. वाळू तस्करी संपवण्यासाठी व जनसामान्यांना स्वस्त दरात बाळू उपलब्य होण्यासाठी नवे वाळू धोरण उपयुक्त ठरत आहे, हे धोरण अधिकाधिक लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न असल्याचे विखे म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

Radhakrishna Vikhe Patil : "संजय राऊतांना भरपूर शिकायचंय ते भरकटलेले नेते"; राधाकृष्ण विखे पाटलांचा टोला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लॅम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
मंत्रालयातील ती काळी लॅम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay  Raut Meet Sharad Pawar | मिशन पालिका इलेक्शन! संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेटCity Sixty | सिटी 60 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP MajhaSantosh Deshmukh Case | धनंजय देशमुखांचं 'शोले' स्टाईल आंदोलन, सरकारला अल्टिमेटम Special ReportChay Wale Baba |  41 वर्षांपासून मौनव्रत, चायवाल्या बाबाची महाकुंभ मेळ्यात चर्चा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लॅम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
मंत्रालयातील ती काळी लॅम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
Nashik Accident : पोलादी सळ्यांनी घेतला पाच तरुणांचा जीव, नाशिकमधील भीषण अपघातानंतर पोलिसांना खडबडून जाग; घेतला मोठा निर्णय
पोलादी सळ्यांनी घेतला पाच तरुणांचा जीव, नाशिकमधील भीषण अपघातानंतर पोलिसांना खडबडून जाग; घेतला मोठा निर्णय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | सोमवार
Embed widget