एक्स्प्लोर

VIDEO : राज्यातील उर्दू शाळांमध्ये दरवर्षी चार ते पाच हजार कोटींचा भ्रष्टाचार, लैंगिक छळही केला जातोय; अल्पसंख्यांक आयोगाच्या अध्यक्षांचा आरोप

Maharashtra Urdu School Scam : उर्दू शाळांमध्ये केलेल्या भ्रष्टाचारातील पैसा हा काँग्रेसच्या प्रचारामध्ये वापरण्यात आल्याचा आरोप राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी केला आहे.

अकोला : राज्य सरकारकडून अनुदान घेणाऱ्या उर्दू शाळांमध्ये मोठा गैरव्यवहार असल्याचा आरोप राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी केला. या शाळांना सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानातून वर्षाकाठी चार ते पाच हजार कोटीचा भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. ते अकोला येथे 'एबीपी माझा'शी बोलत होते. दरम्यान, प्यारे खान यांनी केलेल्या आरोपानंतर अकोला पोलिसांनी उर्दू शाळेचा संस्थाचालक सय्यद कमरोद्दिन याच्याविरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे.

राज्यातील अनेक उर्दू शाळांमध्ये लैंगिक छळासारख्या गंभीर बाबी होत असल्याचाही गंभीर आरोप प्यारे खान यांनी केला. पुढच्या काळात राज्यातील उर्दू शाळांमधला हा भ्रष्टाचार उघड करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. निवडणूक काळात याच भ्रष्टाचारातला पैसा काँग्रेसच्या प्रचारात वापरल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला. उर्दू शाळेत होत असलेल्या या भ्रष्टाचारात सहभागी कुणालाही सरकार पाठीशी घालणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. 

संस्थाचालकाविरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांच्या अकोला दौऱ्यानंतर अकोला पोलीस ॲक्शन मोडवर आल्याचं दिसून आलं. पातुर येथील काँग्रेस नेते आणि संस्थाचालक सय्यद कमरोद्दिन सय्यद इस्माईल याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. भारतीय न्यायसंहितेच्या कलम 74, 75, 308 (2) आणि 351 (2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. सय्यद कमरोद्दिन अध्यक्ष असलेल्या पातूरच्या किल्ला भाग प्राथमिक शाळेतील शिक्षिकेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी संस्थाचालक सय्यद कमरोद्दिन याने शिक्षिकेकडे शरीर सुखाची मागणी केल्याची तक्रार आहे. 

महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे जिया खान यांनी अकोल्यातील उर्दू शाळेला भेट दिली. खान यांच्या भेटीत शाळेतील अनेक महिला शिक्षकांनी कमरोद्दिन याच्या अत्याचाराचा पाढा वाचला. महिला शिक्षिकांचा मानसिक शारीरिक आणि लैंगिक छळ करण्याच्या अनेक तक्रारीनंतर अकोला पोलिसांनी  कारवाई करत गुन्हा दाखल केला. 

कमरोद्दीन याच्या संस्थेच्या जिल्ह्यात एकूण 22 उर्दू शाळा आहेत. या सर्व शाळांमध्ये कमरोद्दीन शिक्षिका आणि कर्मचाऱ्यांवर विविध अत्याचार करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

प्यारे खान यांचा आरोप काय? 

- राज्यातील सरकारचे अनुदान घेणाऱ्या उर्दू शाळांमध्ये मोठा गैरव्यवहार.
- या शाळांना सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानातून वर्षाकाठी चार ते पाच हजार कोटीचा भ्रष्टाचार होत आहे.
- राज्यातील अनेक उर्दू शाळांमध्ये लैंगिक छळासारख्या गंभीर बाबी होत आहेत.
- पुढच्या काळात राज्यातील उर्दू शाळांमधला हा भ्रष्टाचार उघड करणार.
- निवडणूक काळात याच भ्रष्टाचारातला पैसा काँग्रेसच्या प्रचारात वापरण्यात आला.
- या भ्रष्टाचारात सहभागी कुणालाही सरकार पाठीशी घालणार नाही.
- राज्यात बटेंगे तो कटेंगे, व्होट जिहादसारख्या मुद्दांपेक्षा इतर प्रश्न महत्त्वाचे आहेत.‌ अशी भूमिका मांडणाऱ्यांची तक्रार करू.
- नितेश राणेंच्या विषयावर आधीच भूमिका स्पष्ट केली आहे. 
- मुस्लिमांविरुद्ध भूमिका सरकारची नाही आणि ते‌ कुणीही सहन करणार नाही.

 

ही बातमी वाचा: 

गेल्या सोळा वर्षांपासून पत्रकारितेत. लेखक, कवी. समाज माध्यमांद्वारे प्रभावी लेखन. 
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! अकोल्यात 6 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार; पीडितेच्या आईला पोलिस दाद देईना, गुन्हाही दाखल होईना
धक्कादायक! अकोल्यात 6 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार; पीडितेच्या आईला पोलिस दाद देईना, गुन्हाही दाखल होईना
Akola News: दहावीत कमी गुण मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांचं टोकाचं पाऊल; 'अगली बार आऊंगा, सबका मनपसंद बन कर' स्टेट्स ठेवत स्वत:ला धरणात झोकून दिलं, अकोला हादरलं!
दहावीत कमी गुण मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांचं टोकाचं पाऊल; 'अगली बार आऊंगा, सबका मनपसंद बन कर' स्टेट्स ठेवत स्वत:ला धरणात झोकून दिलं, अकोला हादरलं!
Akola : अकोल्यातील 10 वर्षीय चिमुकलीवरील अत्याचारप्रकरणी मोठी कारवाई; 60 वर्षाचा नराधम जेरबंद
अकोल्यातील 10 वर्षीय चिमुकलीवरील अत्याचारप्रकरणी मोठी कारवाई; 60 वर्षाचा नराधम जेरबंद
Akola Crime News: अकोल्यातील 10 वर्षांच्या चिमुरडीसोबत दुष्कर्म करणाऱ्या नराधमाची पत्नीची प्रतिक्रिया; म्हणाली 'मी त्यावेळी घरी नव्हते, ती छोटी मुलगी...'
अकोल्यातील 10 वर्षांच्या चिमुरडीसोबत दुष्कर्म करणाऱ्या नराधमाची पत्नीची प्रतिक्रिया; म्हणाली 'मी त्यावेळी घरी नव्हते, ती छोटी मुलगी...'

व्हिडीओ

Nida Khan Mateen Patel : मतीन पटेलची भूमिका योग्य की अयोग्य? सहकारी नगरसेवक म्हणाले....
Rohit Pawar meet Vikas Lawande : विकास लवांडेंच्या भेटीनंतर रोहित पवार काय म्हणाले?
SSC Result 2026 : भले शाब्बास... दहावीच्या विद्यार्थ्यांची कामगिरी खास! Special Report
Suvendu Adhikari New CM of Bengal : पश्चिम बंगालचे नवे 'अधिकारी'Special Report
MP Jailer Firoza-Prisoner Dharmendra Love Story :जेलर कैद्याची कारगृहातील प्रेमकहाणी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उन्हाळ्यात मालदीवच्या बीचवर सनी लिओनीचा जलवा; समुद्रकिनारी वाळूत हॉट अदा, चाहते फिदा
उन्हाळ्यात मालदीवच्या बीचवर सनी लिओनीचा जलवा; समुद्रकिनारी वाळूत हॉट अदा, चाहते फिदा
Thalapathy Vijay: तीन दिवसांच्या नाट्यमय वळणानंतर थलपती विजय यांचा शपथविधीचा मुहूर्त अखेर ठरला! बहुमत सिद्ध करण्याची तारीख सुद्धा ठरली
तीन दिवसांच्या नाट्यमय वळणानंतर थलपती विजय यांचा शपथविधीचा मुहूर्त अखेर ठरला! बहुमत सिद्ध करण्याची तारीख सुद्धा ठरली
Kerala Government Formation: त्रिमूर्तीत 'हात' अडकला! थेट डीएमकेला तोडून टीव्हीके प्रमुख विजयसाठी अवघ्या काही क्षणात सरसावलेल्या काँग्रेसला केरळ मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटता सुटेना
त्रिमूर्तीत 'हात' अडकला! थेट डीएमकेला तोडून टीव्हीके प्रमुख विजयसाठी अवघ्या काही क्षणात सरसावलेल्या काँग्रेसला केरळ मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटता सुटेना
BCCI on IPL Rule: आयपीएल सुरु असतानाच बीसीसीआयला मास्तरकी करून नियम बदलायची वेळ का आली; कोणकोणत्या गोष्टींना एका झटक्यात बंदी आणली?
आयपीएल सुरु असतानाच बीसीसीआयला मास्तरकी करून नियम बदलायची वेळ का आली; कोणकोणत्या गोष्टींना एका झटक्यात बंदी आणली?
निदा खान अन् तिच्या आईला समोरासमोर बसवले; पोलिसांकडून दीड तास चौकशी, नेमकं काय विचारल?
निदा खान अन् तिच्या आईला समोरासमोर बसवले; पोलिसांकडून दीड तास चौकशी, नेमकं काय विचारल?
इंस्टाग्रामवरील धमक्यांना कंटाळून तरुणानं टोकाचं पाऊल, सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर
इंस्टाग्रामवरील धमक्यांना कंटाळून तरुणानं टोकाचं पाऊल, सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर
NS Raja Subramani: निवृत्त लेफ्टनंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी हे देशाचे तिसरे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ; व्हाईस ॲडमिरल कृष्ण स्वामिनाथन पुढील नौदल प्रमुख
निवृत्त लेफ्टनंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी हे देशाचे तिसरे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ; व्हाईस ॲडमिरल कृष्ण स्वामिनाथन पुढील नौदल प्रमुख
अपघाताच्या दोन भीषण घटनेत तीन ठार, 1 बेपत्ता; परभणीत देवदर्शनाहून परतणाऱ्या पती-पत्नीचा जागीच मृत्यू
अपघाताच्या दोन भीषण घटनेत तीन ठार, 1 बेपत्ता; परभणीत देवदर्शनाहून परतणाऱ्या पती-पत्नीचा जागीच मृत्यू
Embed widget