मोठी बातमी: राज्यावरील वीज संकट आणखी गहिरं, सातही औष्णिक विद्युत केंद्र तिसऱ्या दिवशीही प्रभावित
Akola News: राज्यातील सातही औष्णिक विद्युत केंद्रातील वीजनिर्मिती सलग तिसऱ्या दिवशी प्रभावित झाल्याचं पाहायला मिळत आहे.
![मोठी बातमी: राज्यावरील वीज संकट आणखी गहिरं, सातही औष्णिक विद्युत केंद्र तिसऱ्या दिवशीही प्रभावित Power crisis in Maharashtra state all seven thermal power stations affected for third day Know all details मोठी बातमी: राज्यावरील वीज संकट आणखी गहिरं, सातही औष्णिक विद्युत केंद्र तिसऱ्या दिवशीही प्रभावित](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/09/62b0ab4907733738cecc4533963193b4_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Maharashtra Akola News Updates : अकोला : राज्यातील (Maharashtra News) सातही औष्णिक विद्युत केंद्रातील (Thermal Power Station) वीजनिर्मिती (Power Generation) सलग तिसऱ्या दिवशी प्रभावीत झाली आहे. त्यामुळे, राज्यातील वीज संकट वाढण्याची शक्यता आहे. सातही औष्णिक विद्युत केंद्रातून सध्या क्षमतेच्या 50 टक्केच वीजनिर्मिती केली जाणार आहे. पाऊस (Monsoon Updates), ओला कोळसा आणि दुरुस्तींच्या कामामुळे सातही केंद्रातील वीजनिर्मिती प्रभावित झाली आहे. 9540 मेगॅव्हॅटची क्षमता असताना सध्या फक्त 4732 मेगाव्हॅट वीजनिर्मिती या औष्णिक विद्युत केंद्रातून केली जात आहे. त्यामुळे ऐन गणेशोत्सवात राज्यावर भारनियमनाची टांगती तलवार आहे.
महाराष्ट्रात एकूण सात औष्णिक विद्युत केंद्र आहेत. या सात केंद्रावरुन राज्यासाठी विजनिर्मिती केली जाते. परंतु, आज सलग तिसऱ्या दिवशी या केंद्रांवरील वीजनिर्मिती प्रभावित झाल्यानं राज्यातील वीज संकट गहिरं होण्याची शक्यता आहे. पाऊल, ओला कोळसा आणि दुरुस्तीची कामं खोळंबल्यानं या सातही वीजनिर्मिती केंद्रांच्या क्षमतेच्या केवळ 50 टक्केच वीजनिर्मिती सध्या सुरू आहे. आणखी काही दिवस असंच सुरू राहिलं तर मात्र, राज्याला भारनियमनाला सामोरं जावं लागू शकतं.
केंद्र | क्षमता | निर्मिती |
कोराडी | 2190 | 1184 |
नाशिक | 630 | 130 |
भुसावळ | 1210 | 726 |
पारस | 500 | 346 |
परळी | 750 | 414 |
खापरखेडा | 1340 | 819 |
चंद्रपूर | 2920 | 1114 |
एकूण | 9540 | 4732 |
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)