(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Akola Gram Panchayat : जिल्ह्यातील 266 ग्रामपंचायतींवर येणार प्रशासक राज!
डिसेंबर 2022 मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची कार्यवाही करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
Akola News : ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या (Gram Panchayat) मुदती जस-जशा संपतील, तस-तसे त्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची कार्यवाही करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाचे (State Election Commission) सचिव किरण कुरुंदकर यांनी दिले आहेत. त्यामुळे सदर कालावधी मुदत संपणाऱ्या अकोला जिल्ह्यातील 266 ग्रामपंचायतींवर प्रशासकाची (Administrator) नेमणूक करण्यात येणार आहे.
'या' ग्रामपंचायतींच्या निवडणुका क्रमप्राप्त
कोविड 19 आजाराबाबत शासनाने लागू केलेले निर्बंध तसेच सर्वोच्च न्यायालयामध्ये (SUPREME COURT OF INDIA) दाखल असलेल्या विविध याचिकांमुळे जानेवारी 2021 ते सप्टेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका टप्प्या-टप्प्याने घेण्यात आल्या. आता राज्यातील ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 मध्ये मुदत संपणाऱ्या सुमारे सात हजार 649 तसेच नवनिर्मित 8 तसेच मागील निवडणुकांमधील समर्पित आयोगाच्या अहवालात दिसत नसलेल्या 18 अशा एकूण 7 हजार 675 ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेणे क्रमप्राप्त आहे.
निवडणुकांच्या पूर्व तयारीसाठी हवा वेळ
ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेनंतर मतदारयाद्या तयार करणे व प्रत्यक्ष निवडणूक यासाठी सुमारे 2-3 महिन्यांचा कालावधी आवश्यक असतो. त्यामुळे उर्वरित सुमारे सात हजार 675 ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेण्यासाठी आवश्यक ते नियोजन आरोग्याच्या स्तरावर करण्यात येत आहे. त्यामुळे ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या मुदती जस-जशा संपतील, तस-तसे ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची कार्यवाही करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे सदर कालावधीत मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील 266 ग्रामपंचायतींवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील प्रशासकाची नियुक्ती करण्यात येणाऱ्या ग्रामपंचायती
- ऑक्टोबर महिन्यात जिल्ह्यातील एका ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात येईल.
- डिसेंबरमध्ये मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील 265 ग्रामपंचायतींवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात येईल.
इतर महत्त्वाच्या बातम्या