(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nagpur Crime : सोशल मीडियावरील जाहिरातीवरचा विश्वास पडला महागात; पैसेही गेले अन् शिक्षणही अपूर्णच
Nagpur Crime : असरारने आणखी पैसे देण्यास नकार दिला. त्याला राजस्थानला भेटण्यासाठी बोलाविले. मात्र तिथेही त्यांनी भेटण्यास टाळाटाळ केली. आरोपीच्या पत्त्यावर जाऊन खात्री केली असता त्याला फसवणूक झाल्याचे लक्षात आहे.
Nagpur Crime : चीनमधून वैद्यकीय (एमबीबीएस) करत असलेल्या (MBBS In China) एका तरुणाने आर्थिक अडचणीमुळे शिक्षण अर्धवट सोडले. मात्र सुटलेने शिक्षण पूर्ण करण्याची जाहिरात सोशल मीडियावर (advertising on social media) झळकली आणि सायबर भामट्यांनी त्याची आर्थिक फसवणूक केली. नागपूरमधील पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटला घडली.
सोशल मीडियावर झळकली जाहीरात
टेकानाका (Teka naka) वस्ती येथे राहणाऱ्या असरार अहमद कुरेशी (वय 28 वर्षे) असे फसवणूक झालेल्या युवकाचे नाव आहे. त्याने 2013 पूर्वी चीनमध्ये एमबीबीएस अभ्यासक्रमात प्रवेश घेतला होता. दरम्यान, त्याची आर्थिक परिस्थिती बिघडल्याने तो मध्येच शिक्षण सोडून मायदेशात परतला. 2018 साली त्याला फेसबुकवर अर्धवट (incomplete studies) राहिलेल्या तीन सेमिस्टरमध्ये प्रवेश घेण्याकरता जाहिरात दिसली. त्याने तिथे देण्यात आलेल्या 9782434429 या क्रमांकावर संपर्क केला.
नोंदणीसाठी 28 हजार रुपये
जाहिरातीत फोन क्रमांक असलेल्या विजय पाल या व्यक्तीने तरुणाकडून सुरुवातीला मूळ कागदपत्रे मागितली. त्यामुळे असरारने त्याला मेलद्वारे एमबीबीएसची ट्रान्सस्क्रिप्ट आणि (mbbs transcript) बारावीची गुणपत्रिका पाठवली. दरम्यान आरोपीने 28 हजार रुपये नोंदणी शुल्क मागितले. ते शुल्क पेटीएमच्या माध्यमातून विजय पाल याने सांगितलेल्या फोन क्रमांकावर दिले. यानंतर त्या विजयने फिर्यादीकडे आणखी पैसे मागितले.
राजस्थानला बोलावूनही भेट नाही
मात्र प्रत्यक्ष भेट नसल्याने असरारने आणखी पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे विजयने त्याला राजस्थानला (rajasthan to meet) भेटण्यासाठी बोलावले. मात्र तिथेही त्यांनी भेटण्यास टाळाटाळ केली. शिवाय त्यानंतर आरोपीच्या पत्त्यावर जाऊन खात्री केली असता त्याला फसवणूक झाल्याचे लक्षात आहे. याबाबत असरारने पाचपावली येथे दिलेल्या तक्रारीवरुन आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला.
नोकरीच्या नावावरही फसवणुकीच्या तक्रारी वाढल्या
एकीकडे शहरात बेरोजगारीचे प्रमाण वाढले असताना रोजगरासाठी तरुणांकडून प्रयत्न करण्यात येत आहे. ही संधी हेरुन सायबर चोरट्यांकडूनही नोकरीच्या नावावर तरुणांची फसवणूक करण्याच्या घटना वाढल्या आहेत. यामध्ये मोठमोठ्या कंपन्यांमध्ये नोकरी उपलब्ध असून अर्ज करा अशा जाहिराती झळकतात. वैयक्तिक माहिती भरुन अर्ज केल्यावर सायबर चोरट्यांकडून संपर्क साधण्यात येतो. यामध्ये उच्चशिक्षित तरुणांचीही फसवणूक झाल्याचे गेल्या काही महिन्यांतील सायबर पोलीस ठाण्यातील तक्रारींवरुन दिसून येत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
Nagpur : धक्कादायक! मौजमजेसाठी तरुणांकडून 20 लाखांचा दरोडा, गुन्हे शाखेकडून आठ आरोपींना अटक
Nagpur News : वयापेक्षा मोठ्या तरुणीसोबत 'लिव्ह इन', दुसरीसोबत लग्नाची तयारी अन् कहानी में ट्विस्ट