एक्स्प्लोर

Amol Mitkari : 'मी लहान कार्यकर्ता...' एकनाथ खडसेंच्या गौप्यस्फोटावर मिटकरींचं उत्तर

Amol Mitkari : एकनाथ खडसे यांनी भाजपमधून आलेल्या ऑफरबाबत केलेल्या गौप्यस्फोटावर अमोल मिटकरींना प्रतिक्रिया दिली आहे.

अकोला : अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी आपल्याला राष्ट्रवादीमधून अजित पवार (Ajit Pawar) गटात येण्याची ऑफर दिल्याचा गौप्यस्फोट एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केला होता. यावर भाजप आणि अजित पवारांच्या गटातील अनेक नेत्यांनी उत्तर देखील दिलं होतं. पण यावर आता अमोल मिटकरी यांनीच मौन सोडलं आहे. 'एबीपी माझा'सोबत संवाद साधताना अमोल मिटकरी यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. आपण लहान कार्यकर्ते असून खडसे हे मोठे नेते आहेत. त्यामुळे मी त्यांना ऑफर देण्याचा प्रश्नच येत नाही, असं स्पष्टीकरण अमोल मिटकरी यांनी दिलं आहे. तर खडेंसना ऑफर राष्ट्रवादीमधले मोठे नेते देतील असं देखील अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे. 

मागील अनेक दिवसांपासून एकनाथ खडसे यांना अजित पवारांच्या गटातून ऑफर आल्याच्या चर्चा रंगत होत्या. यावरुन राजकिय वर्तुळात देखील अनेक दावे-प्रतिदावे करण्यात आले होते. पण मी शरद पवारांसोबतच असल्याचं यावेळी एकनाथ खडसे यांनी स्पष्टीकरण दिलं होतं. त्यामुळे या चर्चांना पूर्णविराम मिळाला. पण अमोल मिटकरी यांनी ऑफर दिल्याचं खडसेंनी म्हटलं आणि सत्ताधाऱ्यांकडून प्रत्युत्तर देण्यास सुरुवात झाली. तर यावर अमोल मिटकरींनी देखील आता मौन सोडलं आहे. 

काय म्हणाले मिटकरी?

अमोल मिटकरी यांनी एकनाथ खडसेंच्या आरोपांना उत्तर दिलं आहे. यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं की, मी लहान कार्यकर्ता आहे, त्यामुळे खडसेंना ऑफर पक्षातील मोठे नेते देतील. त्यांना पक्षात निमंत्रित करण्यासाठी पक्षाचे मोठे नेते आहेत. अजित पवारांसोबत जर चर्चा करायची असेल तर खडसेंना कोणत्याही मध्यस्थीची गरज नाही. तसेच पुढील काही काळआमध्ये अजित पवारांसोबतच्या आमदार आणि खासदारांची संख्या वाढणार असल्याचा दावा देखील यावेळी अमोल मिटकरी यांनी केला आहे. 

अमोल मिटकरी यांचं सूचक विधान 

सध्या आणखी एक खासदार आणि आमदार अजित पवार गटात जाणार असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. यामध्ये शरद पवार गटातील खासदारांची नावं समोर येत असून यामधील कोणता खासदार अजित पवारांकडे जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. यावर सूचक विधान करत अमोल मिटकरींनी म्हटलं की, राज्यातील सर्व अमोल नावाच्या व्यक्तींचं अजित पवारांवर खूप प्रेम आहे. 

दरम्यान एकनाथ खडसे यांचं उत्तर आणि अमोल मिटकरी यांच्या स्पष्टीकरणामुळे आता या वादाला पूर्णविराम मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच यावर आता एकनाथ खडसे देखील काही उत्तर देणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

हेही वाचा : 

Jalgoan News : खडसेंनी भाजपमध्ये येण्याचा प्रयत्न करु नये, महाजनांचं टीकास्त्र; खडसेंचही प्रत्युत्तर म्हणाले...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 19 January 2024Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडीSaif ali khan Case Update : नाश्ताचे पैसे आरोपीने Gpay केलं आणि आरोपी पोलिसांच्या ताब्यातDhananjay Munde : मी स्वत:च दादांना विनंती केली, बीड पालकमंत्री पदावरून धनंजय मुंडे म्हणाले..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
IPS Shivdeep Lande : बिहारचे सिंघम शिवदीप लांडेचा राजीनामा अखेर स्वीकारला; अवघ्या काही दिवसांमध्येच तीन धडाकेबाज अधिकाऱ्यांचा खाकी वर्दीला 'रामराम'
बिहारचे सिंघम शिवदीप लांडेचा राजीनामा अखेर स्वीकारला; अवघ्या काही दिवसांमध्येच तीन धडाकेबाज अधिकाऱ्यांचा खाकी वर्दीला 'रामराम'
सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी
सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी
Ajit Pawar : बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
Embed widget