एक्स्प्लोर

Devendra Fadnavis Banner In Kolhapur: दैनिके, विमानतळानंतर आता कोल्हापुरातही 'निनावी' फ्लेक्सवर 'देवाभाऊ' प्रकटले!

या फ्लेक्सवरही निनावी पद्धतीने देवाभाऊ यांची बॅनरबाजी करण्यात आली आहे. त्यामुळे आता कोल्हापुरातील बॅनरबाजी ही कोणाकडून करण्यात आली? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

Devendra Fadnavis Banner In Kolhapur: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये आझाद मैदानात ठाण मांडल्यानंतर यशस्वी तोडगा काढल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निनावी जाहिराती राज्यभरातील दैनिकांमध्ये झळकल्याने राजकीय भुवया उंचावल्या. मराठीसह इंग्रजीच्या प्रमुख दैनिकांमध्ये पान एक आणि पान दोननंबरवर देवाभाऊ जाहिराती प्रसिद्ध झाल्या होत्या. या जाहिरातींवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी हल्लाबोल केला असतानाच आता कोल्हापूरमध्ये सुद्धा डिजिटल फ्लेक्सवर देवाभाऊ प्रकट झाले आहेत. अर्थातच या फ्लेक्सवरही निनावी पद्धतीने देवाभाऊ यांची बॅनरबाजी करण्यात आली आहे. त्यामुळे आता कोल्हापुरातील बॅनरबाजी ही कोणाकडून करण्यात आली? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

कोल्हापुरातही देवाभाऊंची फ्लेक्सबाजी

रोहित पवार यांनी दैनिकांमधून देवाभाऊ म्हणत देण्यात आलेल्या जाहिराती या भाजपकडून नव्हे तर मित्र पक्षाच्या मंत्र्यांकडून देण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता आणि लवकरच त्यांचं नाव उघड करणार असंही म्हटलं होतं. आता या सर्व पार्श्वभूमीवर कोल्हापूरमध्ये देवाभाऊ यांच्या जाहिराती कोणी लावल्या? असा सुद्धा प्रश्न उपस्थित झाला आहे. कोल्हापुरातील मध्यवर्ती भाग असलेल्या मिरजकर तिकटी, दसरा चौक परिसरामध्ये तसेच खानविलकर पेट्रोल पंपाच्या बाजूला भाजप कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर देवाभाऊ यांचे फलक  लावण्यात आले आहेत. त्यामुळे ही फलकबाजी आता भाजपच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली की अन्य कोणी केली याची आता याची चर्चा सुरू झाली आहे. 

भाजप नव्हे तर मित्रपक्षाच्या एका मंत्र्याने जाहिराती दिली

रम्यान, रोहित पवार यांनी म्हटले आहे की, हा मंत्री भाजपचा नव्हे तर मित्रपक्षाच्या एका मंत्र्याने जाहिराती दिली आहे. त्यामुळे या जाहिरातीसाठी करण्यात आलेल्या खर्चावरून त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. ते म्हणाले की या जाहिरातीसाठी कोट्यवधी रुपये कोठून आले? हा मंत्री कोण? असे असे अनेक प्रश्न निर्माण होतात. जाहिराती देणारे समोर आले तर या प्रश्नांची उत्तर नक्कीच मिळतील, असे त्यांनी ट्विट करत म्हटलं आहे. रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, एकीकडे राज्यात रोज ८ शेतकरी आत्महत्या होत असताना आणि अतिवृष्टीने संपूर्ण महाराष्ट्र झोडपला असताना वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर तसेच अनेक विमानतळांवर कोट्यवधी रुपये उधळून मुख्यमंत्र्यांच्या मोठमोठ्या जाहिराती देण्याची सरकारची वृत्ती बघून मोठी चीड आली, परंतु मा. देवेंद्र फडणवीस साहेबांसारखे मोठे नेते अशी चूक करणार नाहीत, हा विश्वास होता.

इतर महत्वाच्या बातम्या 

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये. गेल्या सहा वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.    
Read More

महत्त्वाच्या बातम्या

गोकुळच्या निवडणुकीत ठरावधारकांना यल्लमाचा भंडारा हातात देऊन शपथा घ्यायला लावण्याचा प्रकार? बेळगावात अंधश्रद्धा निर्मूलन समितीची तक्रार, ठरावधारकांना धाक दाखवल्याचा आरोप
गोकुळच्या निवडणुकीत ठरावधारकांना यल्लमाचा भंडारा हातात देऊन शपथा घ्यायला लावण्याचा प्रकार? बेळगावात अंधश्रद्धा निर्मूलन समितीची तक्रार, ठरावधारकांना धाक दाखवल्याचा आरोप
साखर पट्ट्यात खळबळ, कारखानदारांनी घेतला राजू शेट्टींचा धसका, साखरेचा हमीभाव वाढवा, नाहीतर कारखाने बंद ठेवा, सरकारला थेट इशारा
साखर पट्ट्यात खळबळ, कारखानदारांनी घेतला राजू शेट्टींचा धसका, साखरेचा हमीभाव वाढवा, नाहीतर कारखाने बंद ठेवा, सरकारला थेट इशारा
Gokul Election: कोल्हापूरचा गोकुळ गुजरातच्या घशात घालण्याचा महायुतीचा डाव; सतेज पाटलांचा थेट आरोप, महानंदसह तीन राज्यातील दूध संघ ताब्यात घेण्याची कहाणीच सांगितली
कोल्हापूरचा गोकुळ गुजरातच्या घशात घालण्याचा महायुतीचा डाव; सतेज पाटलांचा थेट आरोप, महानंदसह तीन राज्यातील दूध संघ ताब्यात घेण्याची कहाणीच सांगितली
Raju Shetti: राज्यात आजपासून ऊस गळीत हंगाम सुरू अन् शेतकरी आणि कारखानदारांमद्ये संघर्षाची ठिणगी; राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, कृष्णा साखर कारखान्यावर आज काटा बंद आंदोलन
राज्यात आजपासून ऊस गळीत हंगाम सुरू अन् शेतकरी आणि कारखानदारांमद्ये संघर्षाची ठिणगी; राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, कृष्णा साखर कारखान्यावर आज काटा बंद आंदोलन

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Milk Union Election : आधी सहलीवर पाठवलं; आता सौंदत्तीच्या देवीची घ्यायला लावली थपथ, गोकुळच्या निवडणुकीत ठराव धारकांनी देवीच्या प्रकोपाची भीती, व्हिडीओ समोर
आधी सहलीवर पाठवलं; आता सौंदत्तीच्या देवीची घ्यायला लावली थपथ, गोकुळच्या निवडणुकीत ठराव धारकांनी देवीच्या प्रकोपाची भीती, व्हिडीओ समोर
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: मान्सूनचं कमबॅक होणार, राज्यात 5 दिवस परतीचा पाऊस कोसळणार; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
मान्सूनचं कमबॅक होणार, राज्यात 5 दिवस परतीचा पाऊस कोसळणार; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
Mira Bhayandar Municipal Corporation BJP Corporator: रुपाली मोदींनी चप्पल फेकून मारली, तरुण शर्मांनी खासगी अवयवावर ठोसा मारल्याचा आरोप; 16 नगरसेवकांसह भाजप कार्यकर्त्याविरोधात FIR दाखल
रुपाली मोदींनी चप्पल फेकली, तरुण शर्मांनी खासगी अवयवावर ठोसा मारला; 16 नगरसेवकांसह भाजप कार्यकर्त्याविरोधात FIR
Uddhav Thackeray Shivsena UBT Dasara Melava 2026: ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली, पण मुंबई महानगरपालिकेने 24 अटी घातल्या, कोणकोणत्या अटींचं पालन करावे लागणार?
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली, पण BMC ने घातल्या 24 अटी!
Pratapgad Fort : छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
Ekta Kapoor On Hinduphobia: 'मी टिळा लावते, हातात धागा बांधते तर...'; एकता कपूर कुणावर चिडली? थेट सुनावत म्हणाली, 'हिंदूफोबिया...'
'मी टिळा लावते, हातात धागा बांधते तर...'; एकता कपूर कुणावर चिडली? थेट सुनावत म्हणाली, 'हिंदूफोबिया...'
Raigad Crime Controversy : रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
Team India Squad: बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
Embed widget