एक्स्प्लोर

Akola News: अकोला बार्शीटाकळीत काँग्रेस, वंचितच्या नगरसेवकांचा छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला विरोध, प्रकरण नेमकं काय?

Akola News: पुतळा उभारण्यात परवानगी देणारा ठराव 9 विरूद्ध 5 मतांनी फेटाळलाभाजपचं काँग्रेस आणि वंचितविरोधात नगरपंचायतसमोर आंदोलन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी मागितलं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना स्पष्टीकरण

Maharashtra Akola News: अकोला जिल्ह्यातील (Akola News) बार्शीटाकळी (Barsi Takli) नगरपंचायतीच्या 9 नगरसेवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळा उभारणीस विरोध केला आहे. या विरोधामुळे कील नगरपंचायतच्या सर्वसाधारण सभेत पुतळा उभारणीचा ठराव फेटाळला गेला. या नऊ नगरसेवकांमध्ये काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी आणि अपक्ष नगरसेवकांचा समावेश आहेत. 17 सदस्यांच्या बार्शीटाकळी नगरपंचायतवर काँग्रेसची सत्ता आहे. यावरून आता भाजपनं काँग्रेस आणि वंचितला घेरलं आहे. 

अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी नगरपंचायतीवर सध्या काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची सत्ता आहे. या नगरपंचायतीवर 2018 मध्ये काँग्रेसचे महेफुज खान हे जनतेतून नगराध्यक्षपदी विजयी झाले होते. मात्र, काल झालेल्या नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेतील ठराव क्रमांक चारवरून आता काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी अडचणीत येण्याची शक्यता आहे. काल या सभेत शहरातील पंचायत समितीच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणीचा ठराव फेटाळण्यात आला आहे. यासंदर्भात नऊ नगरसेवकांनी पुतळा उभारणीला विरोध करत हा प्रस्ताव फेटाळून लावला. या नऊ नगरसेवकांमध्ये काँग्रेसच्या चार, वंचितचे तीन आणि दोन अपक्ष नगरसेवकांचा समावेश आहे. ठरावाला विरोध करणारे हे सर्व नऊ नगरसेवक एका विशिष्ट धर्माचे आहेत.  

नेमकं काय झालं कालच्या सर्वसाधारण सभेत?  

काल बार्शीटाकळी नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा झाली. या सभेत अनेक विषय कार्यक्रम पत्रिकेवर होते. मात्र, सर्वसाधारण सभेतील ठराव क्रमांकचार वरून सभागृहात मोठं रणकंदन माजलं. कारण, हा ठराव होता शहरातील पंचायत समिती परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारणीला परवानगी देण्याचा. पंचायत समितीने बार्शीटाकळी नगरपंचायतकडे याकडे रितसर परवानगी मागितली होती. त्यानंतर सर्वसाधारण सभेसमोर हा ठराव मंजूरीसाठी आला. मात्र, सभागृहातील एका विशिष्ट धर्माच्या नऊ नगरसेवकांनी या पुतळा उभारणीची परवानगी देण्याला विरोध दर्शविला. यामध्ये काँग्रेसच्या चार, वंचितचे तीन आणि दोन अपक्ष नगरसेवकांचा समावेश होता. या विषयावरून सभागृहात नगरसेवक दोन धर्मात विभागले गेले आहेत. भाजपचे तीन आणि काँग्रेसच्या दोन नगरसेवकांनी पुतळा उभारणीचं समर्थन केलं. त्यामुळे सभागृहात पुतळा उभारण्याचा ठराव 9 विरूद्ध 5 मतांनी फेटाळण्यात आला. या मतदानावेळी वंचितचे तीन सदस्य सभागृहात उपस्थित होते. तीन वंचितच्या इतर तीन सदस्यांनी पुतळा उभारणीला विरोध केला. 

बार्शीटाकळी नगरपंचायतीची कालची सर्वसाधारण सभा अवैध? 

बार्शटाकळी नगरपंचायतची याआधी 3 एप्रिलला सर्वसाधारण सभा झाली होती. मात्र, गोंधळामुळे ही सभा तहकूब करण्यात आली होती. तहकूब झालेली सभा तीन दिवसाच्या आतमध्ये घ्यावी असं कायदा सांगतो. मात्र, 3 एप्रिलला तहकूब झालेली सर्वसाधारण सभा काल 26 एप्रिलला घेण्यात आली. त्यामुळे कालची बार्शीटाकळी नगरपंचायतची सर्वसाधारण सभा अवैध आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

बार्शीटाकळी नगरपंचायत पक्षीय बलाबल

नगराध्यक्ष : महेफुज खान : काँग्रेस

एकूण : 17

काँग्रेस : 06
वंचित : 06
भाजप : 03
अपक्ष : 02

ठरावाला विरोध करणारे 9 नगरसेवक

काँग्रेस : 04
वंचित : 03
अपक्ष : 02 

भाजपसह विरोधकांचा बार्शीटाकळीत मोर्चा 

दरम्यान, बार्शीटाकळीतील नऊ नगरसेवकांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला विरोध केल्यानं भाजपनं बुधवारपासूनच समाज माध्यमांद्वारे याचा विरोध आणि निषेध केला. भाजपचे आमदार रणधीर सावरकर, आमदार हरिश पिंपळे, भाजपचे अकोला महा नगराध्यक्ष विजय अग्रवाल, शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख विठ्ठल सरप, ठाकरेंच्या युवा सेनेचे प्रदेश सहसचिव सोनू वाटमारे, मनसेचे जिल्हाप्रमुख पंकज साबळे यांच्यासह वंचितचे कार्यकर्तेही उपस्थित होते. आज गुरूवारी तहसील कार्यालयावर मोर्चाचं आवाहन भाजपनं केलं. या आवाहनानंतर इतर पक्षही याविरोधात बार्शीटाकळीत रस्त्यावर उतरले. यात ठाकरे गट, शिंदे गट, मनसे आणि वंचितचे कार्यकर्ते मोर्चात सहभागी झालेत. अकोला चौकात हे सर्व लोक एकत्र झालेत. यासंदर्भात या नऊ नगरसेवकांवर कारवाईसाठीचं संयुक्त निवेदन तहसीलदारांना देण्यात आलं.

'ते' सर्व नऊ नगरसेवक 'नॉट रिचेबल' 

या ठरावानंतर चर्चेत आलेले हे सर्व नऊ नगरसेवक 'नॉट रिचेबल' झालेत. तर काहींना यावर काहीही बोलायला नकार दिला. यावर 'एबीपी माझा'ने यासंदर्भात नगराध्यक्ष महेफुज खान आणि उपनगराध्यक्ष हसन शहा यांच्याशी प्रतिक्रियेसाठी संपर्क केला. मात्र, त्यांनी यावर काहीही बोलणं टाळलं आहे. 

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा काँग्रेस आणि वंचितवर निशाणा

यावरून आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट काँग्रेस आणि वंचितवर निशाणा साधला. याप्रकरणी थेट काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी स्पष्टीकरण देण्याची मागणी बावनकुळेंनी केली. या भूमिकेतून काँग्रेस आणि वंचितचं शिवरायांवरील बेगडी प्रेम समोर आल्याचं बावनकुळे म्हणालेत. 

काँग्रेस आणि वंचितचं जिल्हा नेतृत्व या नगरसेवकांवर कारवाई करणार?

यासंदर्भात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला विरोध करीत असलेल्या या नऊ नगरसेवकांसंदर्भात 'एबीपी माझा'ने काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोकराव अमानकर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी यासंदर्भात नगराध्यक्षांकडून अहवाल मागितल्याचे सांगितले. गुरूवारी हा अहवाल मिळाल्यानंतर या नगरसेवकांवर कारवाईसंदर्भात निर्णय घेणार असल्याचे म्हटले आहे. यासोबतच 'वंचित'चे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे यांनी हा प्रकार दुर्दैवी असल्याचं म्हटलंय. यासोबतच तीन अनुपस्थित नगरसेवक हे बाजार समितीच्या प्रचारात असल्यानं अनुपस्थित असल्याचं म्हटलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयापेक्षा वंचितच्या नगरसेवकांना बाजार समितीची निवडणूक महत्वाची होती का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

'त्या' नऊ नगरसेवकांना 'अपात्र' करण्याची मागणी

कालच्या बार्शीटाकळी नगरपंचायतीमधील या विषयानंतर राज्यासह जिल्हाभरात संतापाची लाट उसळली. 'सोशल मीडिया'वर या विषयावर मोठ्या प्रमाणात निषेध नोंदविण्यात आला. या 'नऊ' नगरसेवकांना नगरसेवक पदावरून अपात्र करण्याची मागणी जनमानसात होऊ लागली आहे. महाराष्ट्राचं दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांच्या कोणताही अपमान सहन केला जाणार नाही, असा इशाराही आजच्या सभेसह सोशल मीडियावरून देण्यात आला आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे दैवत आहेत. त्यांच्या पुतळ्यावरून बार्शीटाकळी नगरपंचायतीमधील रंगलेले राजकारण हे दुर्दैवी आहे. या मुद्द्यावरून भाजपनं काँग्रेस आणि वंचितवर उपस्थित केलेल्या प्रश्नाचं उत्तर हे दोन पक्ष कसे देतात, हा पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  6:30 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Embed widget