एक्स्प्लोर

राहुल सोलापूरकरची जीभ छाटणाऱ्यास एक लाखाचं बक्षीस, आमदार अमोल मिटकरींची वादग्रस्त घोषणा

Rahul Solapurkar : राहुल सोलापूरकर ज्या ठिकाणी दिसेल त्या ठिकाणी त्याचं थोबाड फोडणार, त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवावा अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे. 

अकोला : छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राहुल सोलापूरची जीभ छाटणाऱ्याला एक लाखांचे बक्षीस देणार असल्याची वादग्रस्त घोषणा राष्ट्रवादीचे आमदार म्हणून मिटकरी यांनी केली. जोपर्यंत राहुल सोलापूरकर हा छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेबांच्या जोड्यांवर नाक घासून माफी मागत नाही तोपर्यंत त्याला शिवप्रेमी माफ करणार नसल्याचं मिटकरी म्हणालेत. अभिनेते राहुल सोलापूरकरांचा जुन्हा व्हिडीओ व्हायरल होत असून त्यामध्ये त्यांनी आता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी वक्तव्य केल्यानंतर आता पुन्हा वाद निर्माण झाला आहे. 

काय म्हणाले अमोल मिटकरी? 

अमोल मिटकरी म्हणाले की, बहुजन समाजाची अस्मिता असलेल्या महामानवांच्या विरोधात राहुल सोलापूरकरने वक्तव्य केलं. त्याने चर्चेत राहण्यासाठीच हे वक्तव्य केलं, जाणीवपूर्वक बदनामी केली. राहुल सोलापूरकरने वापरलेले अपशब्द हे देशद्रोहापेक्षा कमी नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रातल्या जननेते पुढाकार घ्यावा आणि प्रत्येक पोलिस स्टेशनमध्ये त्याच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा नोंदवावा. 

राहुल सोलापूरकर जिथे दिसेल त्या ठिकाणी मी त्याचं थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाही असाही इशारा अमोल मिटकरी यांनी दिला आहे. तसेच त्याची जीभ छाटणाऱ्यास एक लाखांचं बक्षीस देण्याची घोषणाही त्यांनी केली. 

राहुल सोलापूरकरांचा माफीनामा

दरम्यान, बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी केलेल्या वक्तव्यावर वाद निर्माण झाल्यानंतर अभिनेता राहुल सोलापूरकरांनी पुन्हा एकदा माफी मागितली आहे. आंबेडकरांवर केलेल्या वक्तव्यावर सोलापूरकरांनी स्पष्टीकरण दिलं आहे. 

वेदात सांगितल्याप्रमाणं डॉ.बाबासाहेब आंबेडकरही ब्राह्मणच असल्याचं वक्तव्य राहुल सोलापूरकरांनी केलं होतं. शिवरायांनंतर आता  आंबेडकरांच्या संबंधित केलेल्या वक्तव्यानं राहुल सोलापूरकर चांगलेच अडचणीत आले आहेत.

राहुल सोलापूरकर यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत, जिथे दिसतील तिथे त्यांना जोड्याने मारायला हवं असं आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले. 

राहुल सोलापूरकर यांच्या पुण्यात असणाऱ्या निवासस्थानाबाहेर पोलिस बंदोबस्त करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी राहुल सोलापूरकर यांचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधातील वक्तव्य केल्याचा एक व्हीडीओ सोशल मीडियावर जाहीर केला. यानंतर खबरदारी म्हणून सोलापूरकर यांच्या कोथरूड येथील निवासस्थानाबाहेर पोलिसांनी तीन दिवसांपूर्वी लावलेला पोलिस बंदोबस्त आजही कायम असल्याचे पाहायला मिळतोय. 

ही बातमी वाचा : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नाशकमध्ये काय चाललंय काय? गेल्या तीन महिन्यात खूनाच्या 8-10 घटना; जाब विचारल्याने टोळक्याच्या मारहाणीचा व्हिडिओ समोर
नाशकात काय चाललंय काय? रंगपंचमीचं दुहेरी हत्याकांड ताजं असताना टोळक्याच्या मारहाणीचा Video समोर
तेव्हा मनिषा कायंदे म्हणाल्या, भाजपा आणि राणे गँगने संबंध जोडून थयथयाट केला, आदित्य ठाकरेंची नाक घासून माफी मागावी, आता सुषमा अंधारे तोच स्क्रीनशाॅट शेअर करत म्हणाल्या....
तेव्हा मनिषा कायंदे म्हणाल्या, भाजपा आणि राणे गँगने संबंध जोडून थयथयाट केला, आदित्य ठाकरेंची नाक घासून माफी मागावी, आता सुषमा अंधारे तोच स्क्रीनशाॅट शेअर करत म्हणाल्या....
औरंगजेब 1300 मतांनी पिछाडीवर, पराभवाच्या छायेत, संतोष जुवेकरच्या जीवात जीव आला, दिशाने आघाडी घेतली! राज्यातील राजकीय चिखलफेकीवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रियांचा पाऊस
औरंगजेब 1300 मतांनी पिछाडीवर, पराभवाच्या छायेत, संतोष जुवेकरच्या जीवात जीव आला, दिशाने आघाडी घेतली! राज्यातील राजकीय चिखलफेकीवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रियांचा पाऊस
एप्रिल महिन्यात राज्याची AI पॉलिसी, मंत्री शेलार यांची घोषणा; पालकमंत्रीपदाचाही मजेशीर किस्सा सांगितला
एप्रिल महिन्यात राज्याची AI पॉलिसी, मंत्री शेलार यांची घोषणा; पालकमंत्रीपदाचाही मजेशीर किस्सा सांगितला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Anmol Ratna Award 2025 Episode 3 : महाराष्ट्रातील उद्योग रत्नांचा सन्मान : अनमोल रत्न पुरस्कारDisha Salian Lawyer : उद्धव ठाकरेंचं गुंडांचं सरकार होतं; मविआच्या काळात कुणाकडे दाद मागणार?Yuzvendra Chahal + Dhanashree Verma : चहल आणि धनश्री मुंबईतील कोर्टात दाखल | FULL VIDEOChitra Wagh Angry Speech : ओ परब! तुमच्यासारखे 56 पायाला बांधून फिरते मी, चित्रा वाघांचा रुद्रावतार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नाशकमध्ये काय चाललंय काय? गेल्या तीन महिन्यात खूनाच्या 8-10 घटना; जाब विचारल्याने टोळक्याच्या मारहाणीचा व्हिडिओ समोर
नाशकात काय चाललंय काय? रंगपंचमीचं दुहेरी हत्याकांड ताजं असताना टोळक्याच्या मारहाणीचा Video समोर
तेव्हा मनिषा कायंदे म्हणाल्या, भाजपा आणि राणे गँगने संबंध जोडून थयथयाट केला, आदित्य ठाकरेंची नाक घासून माफी मागावी, आता सुषमा अंधारे तोच स्क्रीनशाॅट शेअर करत म्हणाल्या....
तेव्हा मनिषा कायंदे म्हणाल्या, भाजपा आणि राणे गँगने संबंध जोडून थयथयाट केला, आदित्य ठाकरेंची नाक घासून माफी मागावी, आता सुषमा अंधारे तोच स्क्रीनशाॅट शेअर करत म्हणाल्या....
औरंगजेब 1300 मतांनी पिछाडीवर, पराभवाच्या छायेत, संतोष जुवेकरच्या जीवात जीव आला, दिशाने आघाडी घेतली! राज्यातील राजकीय चिखलफेकीवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रियांचा पाऊस
औरंगजेब 1300 मतांनी पिछाडीवर, पराभवाच्या छायेत, संतोष जुवेकरच्या जीवात जीव आला, दिशाने आघाडी घेतली! राज्यातील राजकीय चिखलफेकीवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रियांचा पाऊस
एप्रिल महिन्यात राज्याची AI पॉलिसी, मंत्री शेलार यांची घोषणा; पालकमंत्रीपदाचाही मजेशीर किस्सा सांगितला
एप्रिल महिन्यात राज्याची AI पॉलिसी, मंत्री शेलार यांची घोषणा; पालकमंत्रीपदाचाही मजेशीर किस्सा सांगितला
Disha Salian Lawyer : उद्धव ठाकरेंचं गुंडांचं सरकार होतं; मविआच्या काळात कुणाकडे दाद मागणार?
Disha Salian Lawyer : उद्धव ठाकरेंचं गुंडांचं सरकार होतं; मविआच्या काळात कुणाकडे दाद मागणार?
Team India : बीसीसीआयकडून 'चॅम्पियन' टीम इंडियाला आयसीसीच्या बक्षीसाच्या तीनपट खजिना! रोहितपासून गंभीरपर्यंत, कोणाला किती कोटी मिळणार?
बीसीसीआयकडून 'चॅम्पियन' टीम इंडियाला आयसीसीच्या बक्षीसाच्या तीनपट खजिना! रोहितपासून गंभीरपर्यंत, कोणाला किती कोटी मिळणार?
बीडमध्ये चाललंय काय, महिलेनं पोलीस ठाण्यासमोर अंगावर ओतून घेतलं डिझेल; सुदैवाने दुर्घटना टळली
बीडमध्ये चाललंय काय, महिलेनं पोलीस ठाण्यासमोर अंगावर ओतून घेतलं डिझेल; सुदैवाने दुर्घटना टळली
Balasaheb Thorat on Disha Salian Case : दिशा सालियन प्रकरणात माजी मंत्र्यांचं मोठं वक्तव्य; बाळासाहेब थोरात स्पष्टच बोलले, 10 वर्षाचं सगळंच काढलं
दिशा सालियन प्रकरणात माजी मंत्र्यांचं मोठं वक्तव्य; बाळासाहेब थोरात स्पष्टच बोलले, 10 वर्षाचं सगळंच काढलं
Embed widget