राहुल सोलापूरकरचे तोंड फोडा आणि 1 लाख बक्षीस मिळवा, ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
राहुल सोलापूरकरचे तोंड फोडा आणि 1 लाख बक्षीस मिळवा, अशी घोषणा शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी (Sharad Koli) यांनी केलीय.

Sharad Koli on Rahul Solapurkar : अभिनेते राहुल सोलापूरकर (Rahul Solapurkar) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) आग्र्यावरुन पेटाऱ्यात बसून नव्हे तर लाच देऊन सुटले होते, अशा आशयाचे वक्तव्य सोलापूरकर यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर विविध स्तरातून टीका होत आहे. राहुल सोलापूरकरचे तोंड फोडा आणि 1 लाख बक्षीस मिळवा, अशी घोषणा शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी (Sharad Koli) यांनी केलीय.
शिवाजी महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या सोलापूरकरला फोडून काढा असा इशारा शरद कोळी यांनी दिला आहे. राहुल सोलापूर जिथे दिसेल तिथे त्याचे तोंड चपलीने रंगवणाऱ्या व्यक्तीला 1 लाखाचे बक्षीस मी जाहीर करत असल्याचे कोळी म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सोलापूरकर नेमकं काय म्हणाले होते?
छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून सुटले, मिठाईचे पेटारे-बिटारे काही नव्हते. चक्क लाच देऊन महाराज आले आणि त्यासाठी किती हुंडा वटवल्या आहेत, याचेसुद्धा पुरावे आहेत. अगदी औरंगजेबाच्या वजिराला आणि त्याच्या बायकोलासुद्धा महाराजांनी लाच दिलेली आहे. मोहसिन खान का मोईन खान नाव आहे बहुतेक त्याचं.. त्याच्याकडून अधिकृत शिक्क्याचे परवाने घेऊन सगळे बाहेर पडलेत. स्वामी परमानंद पाच हत्ती घेऊन शेवटचे गेले, त्याच्या परवान्याची अजूनही खूण सुद्धा आहे. लोकांना गोष्टी रुपात सांगताना काहीतरी रंजक करून सांगावं लागतं. मग ती रंजकता आली की इतिहासाला छेद दिला जातो किंवा बाजूला टाकला जातो, असं ते एका मुलाखतीत म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावर मोठ्या प्रमाणात टीका होताना दिसत आहे.
राहुल सोलापूरकर यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत केलेले वादग्रस्त विधान आपल्या विकृत मानसिकतेतून आल्याची टीका अनेकांनी केली होती. छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यातुन स्वकर्तुत्वावर निसटले हा इतिहास महाराष्ट्राच्या मनामनात कोरलेला असताना जाणीवपूर्वक राहुल सोलापुरकर याने छत्रपती शिवरायांची बदनामी करण्याची एक चाल खेळली आहे. याबाबत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
























