Akola news : एकाच महाविद्यालयात शिकणाऱ्या एका तरुणीसह तीन तरुण बेपत्ता
Akola News : अकोल्यात एकाच महाविद्यालयाध्ये शिकणारे तीन तरुण आणि एक तरुणी मागील पाच दिवसांपासून बेपत्ता आहे. चौघेही कुठे दिसून आल्यास संपर्क साधण्याचे आवाहन अकोला पोलिसांनी केले आहे.
अकोला : एकाच महाविद्यालयामध्ये शिकणारे तीन तरुण आणि एक तरुणी मागील पाच दिवसांपासून बेपत्ता (Akola Missing Case) आहे. एक ऑगस्टपासून हे तिघे बेपत्ता आहे. 1 ऑगस्टला चौघेही घरून कॉलेजला गेले मात्र तेव्हापासून ते परतलेच नाहीत. चौघेही अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातल्या व्याळा येथील पॉलिटेक्निक महाविद्यालयात शिकत आहेत. बेपत्ता झालेल्यांमध्ये अकोला जिल्ह्यातील तिघांचा तर बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील पळशी खुर्द येथील तरुणाचा देखील समावेश आहे.
तुळशी अनिल ताले (वय 18 , रेणुका नगर, डाबकी रोड, अकोला), प्रतीक मनोहर तायडे (वय 21 रा.अडगाव बु. ता.तेल्हारा, जि. अकोला), आणि प्रफुल पांडुरंग लंगोटे (वय 19, राहणार न्यू भीम नगर, कृषी नगर, अकोला) यांच्यासह एक अल्पवयीन मुलगा असे चौघे बेपत्ता असल्याची तक्रार बाळापूर आणि सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात दाखल आहे. अकोला पोलिस पुढील तपास करत आहे.
बेपत्ता झालेले चौघेही बाळापूर तालुक्यातील व्याळा येथील मानव सिटी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. सोमवारी घरातून ते कॉलेजमध्ये गेले होते, मात्र अद्याप अद्याप घरी परतलेच नाही. हे चौघेही कुठे दिसून आल्यास तात्काळ अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक मुकुंद देशमुख यांना संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. 7020821785 आणि 9850528885 या मोबाईल क्रमांकावर माहिती देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
संबंधित बातम्या :
धक्कादायक! मराठवाड्यात दिवसाला 16 जण होतायत बेपत्ता; सहा महिन्यांत 1700 महिला मिसिंग