Mumbai Police : मुंबई पोलिसांचं 'मुस्कान'! एका महिन्यात हरवलेल्या पावणेदोनशे बालकांना शोधलं
Mumbai Police : ऑपरेशन मुस्कान (Operation Muskan) ही हरवलेल्या मुलाना शोधून त्यांच्या आई-वडिलांच्या ताब्यात देण्यासाठी राबवली जाणारी एक मोहिम आहे.
Mumbai Police : मुंबई पोलिसाची कामगिरी आणि कीर्तीचं जगभरात कौतुक केलं जातं. अशीच एक चांगली कामगिरी पुन्हा समोर आली आहे. मुंबई पोलिसांनी गेला महिनाभर शहर आणि उपनगरात ऑपरेशन मुस्कान (Operation Muskan) राबवून हरवलेल्या 175 बालकांचा तर 15 बालमजूरांचा शोध घेऊन त्यांना पालकांच्या ताब्यात दिले. मुंबई पोलीस वेळोवेळी शहर आणि उपनगरात ऑपरेशन मुस्कान राबवून हरवलेल्या बालकांचा शोध घेत असतात. त्यानुसार जून महिन्यात देखील पोलिसांनी हे ऑपरेशन राबविले.
ऑपरेशन मुस्कान ही हरवलेल्या मुलाना शोधून त्यांच्या आई-वडिलांच्या ताब्यात देण्यासाठी राबवली जाणारी एक मोहिम आहे. संपूर्ण महाराष्ट्रात ही मोहिम राबवली जाते. मुंबई हे मेट्रो प्लेटिंग शहर असल्या कारणाने इथे मोठ्याप्रमाणे अशा घटना घडतात. त्यासाठी मुंबईमध्ये ऑपरेशन मुस्कान (Operation Muskan) राबवले गेले होते.
या अभियानाच्या अंतर्गत 1 जूनपासून ते 30 जूनदरम्यान एकूण 190 लहान मुलं-मुली सापडली आहेत. यामध्ये रेकॉर्ड वर नोंद असलेले एकूण 137 मुलं मिळाली आहेत. त्यामध्ये 102 मुली आणि 35 मुलांचा समावेश आहे.
यामध्ये विशेष महत्वाचे बाब म्हणजे जे रेकॉर्डवर नव्हतं, ज्यांच्या केस दाखल झालेल्या नव्हत्या किंवा ज्यांच्या संदर्भामध्ये त्यांच्या नातेवाईकांनी दिलेली नव्हती अशा सुद्धा 38 मुलं आणि मुलींना ताब्यात घेत त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आलं आहे.
त्या व्यतिरिक्त बालमजूर म्हणून मुलांना राबवून घेतलं जातं. अशी सुद्धा 15 मुलं मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतली आणि त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केली.
कुणाची लहान मुलं हरवली असतील तर तसे तात्काळ जवळच पोलिस स्टेशनला तक्रार करावी, असं आवाहन मुंबई गुन्हे शाखा पोलीस उपायुक्त बालसिंग राजपूत यांनी केलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या