Akola News: अकोल्यात कृषीमंत्र्यांच्या नावावर कथित पथकाची धाड, कृषीमंत्री सत्तारांच्या स्वीय सहाय्यकाचा पथकात समावेश
अकोल्यातील एमआयडीसीमध्ये या पथकाने धाडी टाकल्या आहेत. दरम्यान या पथकानं पैशाची मागणी केल्याचा गंभीर आरोप एका खत कंपनीच्या व्यवस्थापकानं केला आहे.
अकोला : अकोल्यात (Akola News) कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या नावावर कृषी विभागाच्या कथित पथकाने धाडी टाकल्या आहेत. या पथकात अधिकार नसलेल्या अनेक खाजगी व्यक्तींचा समावेश असल्याची बाब समोर आली आहे अकोल्यातील एमआयडीसीमध्ये या पथकाने धाडी टाकल्या आहेत. या पथकात कृषीमंत्री अब्दुल सत्तारांचा स्विय सहायक दिपक गवळी देखील असल्याचं उघड झाले आहे. दरम्यान या पथकानं पैशाची मागणी केल्याचा गंभीर आरोप एका खत कंपनीच्या व्यवस्थापकानं केलाय. यावरून आता ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी सत्तारांवर निशाणा साधलाय.
पथकाची धाड एबीपी माझा'च्या कॅमेऱ्यात कैद
दरम्यान, पथकात कृषीमंत्री अब्दुल सत्तारांचा स्विय सहायक दिपक गवळी आणि वादग्रस्त असलेल्या हितेश भट्टड यांच्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी यावरून अब्दुल सत्तार यांच्यावर गंभीर आरोप केलेत. हे सारं पथक आणि पथकाची धाड एबीपी माझा'च्या कॅमेऱ्यात टिपल्या गेली आहे. दरम्यान, अकोल्यातील कृषीमंत्र्यांच्या कथित पथकाविरोधात खंडणीची तक्रार करणाऱ्या अक्षत फर्टीलायझर्सविरोधात कृषी विभागानं कारवाई सुरू केली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील कंपनीच्या उत्पादनांची विक्री थांबवली आहे. या कंपनीचा माल असलेल्या गोदामाला सील लावल्याची माहिती मिळत आहे.
कृषीमंत्र्यांच्या हकालपट्टीची मागणी
हितेश भट्टड या वादग्रस्त व्यक्तीचा या पथकात समावेश आहेय. भट्टडवर 2018 मध्ये बोगस खते आणि किटकनाशके विकल्याप्रकरणी नागपुरातील वाडी पोलिसांत गुन्हा दाखल असल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांनी दिली आहे. पथकाकडून पाच लाखांची मागणी झाल्याचा आरोप अक्षत फर्टीलायझर्सच्या व्यवस्थापकांनी केली आहे. ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी यावरून अब्दुल सत्तार यांच्यावर गंभीर आरोप केलेयेत. कृषीमंत्री अब्दुल सत्तारांसाठी पथकाची वसुली सुरू असल्याचा आरोप विरोधकांनी करत कृषीमंत्र्यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे.
हे ही वाचा :