Bhandara: मंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात कोर्टाने अटक वॉरंट काढलं; दुसरीकडे अजित दादांच्या आणखी एका आमदाराच्या प्रकरणाचा आज अंतिम निर्णय, नेमकं प्रकरण काय?
Bhandara District Court : आमदार राजू कारेमोरे यांच्यासह चार जणांच्या विरोधात पोलिसांनी चार्जशीट दाखल केली होती. या प्रकरणाचा अंतिम निकाल आज (17 डिसेंबर) भंडारा जिल्हा न्यायालय येण्याची शक्यता आहे.

Bhandara News: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार राजू कारेमोरे (MLA Raju Karemore) यांनी 31 डिसेंबरच्या रात्री भंडाऱ्याच्या मोहाडी पोलिस (Bhandara Police) ठाण्यात जाऊन पोलिसांना शिवीगाळ आणि शासकीय कामात अडथळा आणला होता. याप्रकरणी आमदार राजू कारेमोरे यांना 3 जानेवारी 2022 ला अटक करण्यात आली होती. आमदार राजू कारेमोरे यांचे मित्र यासीन छवारे यांची 50 लाखांची रोकड पोलिसांनी लुटल्याचा आरोप कारेमोरे यांनी लावला होता. या प्रकरणात आमदार राजू कारेमोरे यांच्यासह चार जणांच्या विरोधात पोलिसांनी चार्जशीट दाखल केली होती. या प्रकरणाचा अंतिम निकाल आज (17 डिसेंबर) दुपारी 3 नंतर भंडारा जिल्हा न्यायालय (Bhandara District Court) येण्याची शक्यता आहे.
Bhandara District Court : तीन वर्षांपूर्वी पोलिस ठाण्यात जाऊन पोलिसांना शिवीगाळ केल्याचं प्रकरण
एकीकडे राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्याविरोधात नाशिक जिल्हा न्यायालयाने अटक वॉरंट (Arrest Warrant) जारी केले आहे. त्यामुळे मंत्री माणिकराव कोकाटे (Minister Manikrao Kokate) यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. तर दुसारिकडे राष्ट्रवादीचे कोकाटे यांच्या निकालानंतर राष्ट्रवादीचे आमदार राजू कारेमोरे यांच्या बाबत काय निर्णय येतो, याकडं आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
माणिकराव कोकाटे संकटात, धनुभाऊ दिल्लीत
दरम्यान, माणिकराव कोकाटे संकटात आल्यानंतर माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या दिल्ली दौऱ्याची चर्चा रंगली आहे. धनुभाऊंचा हा दौरा पूर्वनियोजित होता की घरवापसीसाठी उत्तम 'मुहूर्त' मानत फिल्डिंग लावली? याची चर्चा रंगली आहे. धनंजय मुंडे यांनी संसदेत वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी करत चर्चा केल्याची माहिती आहे. एनडीएमधील बहुंताश वरिष्ठ नेते दिल्लीत असल्याने मंत्रीपदासाठी धनुभाऊ चर्चा करत आहेत का? असा सुद्धा प्रश्न उपस्थित झाला आहे.
Bhandara : भंडाऱ्यात मध्यरात्री राष्ट्रीय महामार्गावर रोड रॉबरी; 10 ते 12 जणांच्या टोळक्यांनी केली लुटपाट
मध्यरात्री महामार्गावरून धावणारे वाहन थांबवून त्यांना लाठीकाठी आणि शास्त्राचा धाक दाखवून लूटमार केल्याचा प्रकार आज भंडाऱ्यात मध्यरात्री घडला. या प्रकरणी भंडारा पोलिसात एका ट्रॅक चालकानं तक्रार दाखल केली आहे. रायपूर येथून नागपूरकडे जाणाऱ्या एका ट्रॅक चालकाला रोड रॉबरी करणाऱ्या 10 ते 12 जणांच्या टोळक्यांनी थांबवून चालकाजवळील रोख रक्कम लुटली. यानंतर त्याला धमकावल्याची तक्रार चालकानं पोलिसात केली. ही घटना भंडारा शहराच्या बायपास महामार्गावरील कोरंभी देवस्थान जवळील वैनगंगा नदीच्या पुलावर घडली. या गंभीर प्रकाराची पोलिसांनी सूत्र हलवत, काहींना ताब्यात घेतलं असून उर्वरितांचा शोध घेण्यात येत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या























