एक्स्प्लोर

रोहित पाटलांनंतर विधानसभेसाठी पवारांकडून दुसरा तरूण उमेदवार जाहीर, राष्ट्रवादीचे तीन उमेदवार ठरले

Akole Vidhan Sabha Election : किरण लहामटेला संधी दिली, पण मुंबईत जाऊन तो भलतीकडेच बसला, आता त्याला खाली बसवा असं आवाहन शरद पवारांनी अकोलेकरांना केलं आहे. 

अहमदनगर : रोहित पाटील यांच्यापाठोपाठ शरद पवारांकडून विधानसभेसाठी आणखी एका तरूण उमेदवाराचं नाव जाहीर करण्यात आलं आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले मतदारसंघातून अमित भांगरे (Amit Bhangre) यांच्या पाठीशी उभे राहा असं आवाहन शरद पवारांनी (Sharad Pawar) केलं. या ठिकाणचे अजित पवार गटाचे आमदार किरण लहामटे (Kiran Lahamate) यांना खाली बसवा असं आवाहनही शरद पवारांनी केलं आहे. अकोलेतील शेतकरी मेळाव्यामध्ये शरद पवारांनी हे आवाहन केलं आहे. 

शरद पवारांनी या आधी तासगाव मतदारसंघातून दिवंगत नेते आर आर पाटील यांचे सुपूत्र रोहित पाटील यांच्या नावाची घोषणा केली होती. त्यानंतर आता अकोले मतदारसंघातून दुसरा तरुण उमेदवार जाहीर केला. त्यामुळे अकोले मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार डॉ. किरण लहामटे विरुद्ध शरद पवार गटाचे अमित भांगरे अशी लढत होणार हे स्पष्ट झालं आहे. 

डॉक्टरला निवडून दिलं अन् भलतीकडेच जावून बसला

अकोलेकरांना आवाहन करताना शरद पवार म्हणाले की, अमित भांगरे आणि त्याच्या सहकाऱ्यांना शक्ती द्या. तुमची मदत असेल तर अकोल्यात बदल झाल्याशिवाय राहणार नाही. पाच वर्षांपूर्वी एका डॉक्टरला (आमदार किरण लहामटे) मी संधी दिली. मला वाटलं साधा माणूस आहे, शब्दाला किंमत देईल. त्यांनी काही झालं तरी पवार साहेबांची साथ सोडणार नाही असं भाषण केलं होतं. पण मुंबईत गेल्यानंतर मात्र हा भलतीकडे जाऊन बसला. कुठं बसायचं हे ज्याला कळत नाही त्याला विधानसभेत खाली बसवायची वेळ आली आहे. आता अमित भांगरे या तरुणाच्या पाठीशी शक्ती उभी करा. तरुणांच्या ताकदीवर अकोले आणि महाराष्ट्रातले राजकारण बदलल्याशिवाय राहणार नाही.

किरण लहामटेला खाली बसवा

अकोलेतील आमदार किरण लहामटेला खाली बसवा आणि या ठिकाणी अमित भांगरेंना संधी द्या असं आवाहन शरद पवारांनी केलं आहे. त्यामुळे या ठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशीच लढत होणार हे जवळपास निश्चित झालं आहे. 

या आधी शरद पवारांनी सांगली जिल्ह्यातील तासगावमधून रोहित पाटील यांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यानंतर करमाळ्यातील एका कार्यक्रमात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी करमाळा विधानसभा मतदारसंघातून नारायण पाटील यांच्या नावाची घोषणा केली. आता अमित भांगरे यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादीचे विधानसभेसाठी तीन उमेदवार ठरल्याचं दिसून येतंय. 

ही बातमी वाचा: 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अशोक खरातच्या फरार पत्नीच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली; कोर्टाकडून नवी तारीख, नेमकं काय घडलं?
अशोक खरातच्या फरार पत्नीच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली; कोर्टाकडून नवी तारीख, नेमकं काय घडलं?
उन्हाळ्यात जपून, कुल्फीमध्ये चक्क वनस्पती तेल अन् भेसळ; अन्न व औषध विभागाची धाड, 1856 पॅकेट्स जप्त
उन्हाळ्यात जपून, कुल्फीमध्ये चक्क वनस्पती तेल अन् भेसळ; अन्न व औषध विभागाची धाड, 1856 पॅकेट्स जप्त
Pratibha Chakankar On Ashok Kharat Case: अशोक खरात प्रकरणात पोलिसांकडून 8 तास चौकशी, काय काय विचारलं?; प्रतिभा चाकणकर सगळं बोलून गेल्या!
अशोक खरात प्रकरणात पोलिसांकडून 8 तास चौकशी, काय काय विचारलं?; प्रतिभा चाकणकर सगळं बोलून गेल्या!
Pratibha Chakankar On Ashok Kharat: प्रतिभा चाकणकर म्हणाल्या, माझ्या नावाची बनावट खाती; आता सुषमा अंधारेंचे 6 धडधडीत सवाल
प्रतिभा चाकणकर म्हणाल्या, माझ्या नावाची बनावट खाती; आता सुषमा अंधारेंचे 6 धडधडीत सवाल

व्हिडीओ

Animal Parlor : साताऱ्यातील पाटणमध्ये जनावरांचं ब्युटी पार्लर Special Report
Women Reservation : महिला आरक्षण विधेयकावरून सत्ताधारी-विरोधक आमने-सामने Special Report
Nashik TCS : नाशिकच्या टीसीएसप्रकरणी रिसॉर्टवर कारवाई, कारागृहात धुलाई Special Report
Ayan Ahmad Amravati : रील स्टार अयान अहमद कसा बनला गुन्हेगार? Special Report
Bhondu Baba : मुंबईच्या मालाडमधील भोंदूबाबाचा पर्दाफाश Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shreyas Iyer : सरपंच श्रेयस अय्यरची सीमारेषेवर अफलातून उडी, यानसेनच्या साथीनं हार्दिक पांड्याचा करेक्ट कार्यक्रम, रोहित-सूर्या पाहत राहिले, पाहा व्हिडिओ
श्रेयस अय्यरची सीमारेषेवर अफलातून उडी, यानसेनची अचूक साथ, रोहित-सूर्या पाहत राहिले
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इस्त्रायल-लेबनॉनच्या शस्त्रसंधीची घोषणा, दोन्ही देशांचे नेते 34 वर्षानंतर भेटले
ट्रम्प यांच्याकडून आणखी एका युद्धाच्या शस्त्रसंधीची घोषणा, इस्त्रायल-लेबनॉन संघर्षाला 10 दिवस ब्रेक
धक्कादायक! नाशिकमध्ये विजेचा धक्का लागून दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू, वीजपंप दुरुस्ती करताना घडली घटना
धक्कादायक! नाशिकमध्ये विजेचा धक्का लागून दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू, वीजपंप दुरुस्ती करताना घडली घटना
MI vs PBKS : वानखेडेवर पंजाबच्या प्रभसिमरन आणि श्रेयस अय्यरचं वादळ,  पंजाबचा 7 विकेटनं मुंबईवर दणदणीत विजय, गुणतालिकेत टॉपवर
पंजाबचा 7 विकेटनं मुंबईवर दणदणीत विजय, गुणतालिकेत टॉपवर,वानखेडेवर प्रभसिमरन आणि श्रेयसचं वादळ
जपानी मेंदूज्वराविरोधात महाराष्ट्र सतर्क; लसीकरण मोहिमेला वेग, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती
जपानी मेंदूज्वराविरोधात महाराष्ट्र सतर्क; लसीकरण मोहिमेला वेग, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती
शासकीय कर्मचाऱ्यांना गुडन्यूज; 7 व्या वेतनगटानुसार सरकारी घरं मिळणार, सा. बांधकाम विभाग चटईक्षेत्र वाढवणार
शासकीय कर्मचाऱ्यांना गुडन्यूज; 7 व्या वेतनगटानुसार सरकारी घरं मिळणार, सा. बांधकाम विभाग चटईक्षेत्र वाढवणार
Suryakumar Yadav : रोहित दुखापतीमुळं संघाबाहेर सूर्यकुमार यादवचा खराब फॉर्म कायम, पहिल्याच बॉलवर बाद, अर्शदीप सिंगचा धमाका
सूर्यकुमार यादवचा खराब फॉर्म कायम, पहिल्याच बॉलवर बाद,अर्शदीप सिंगचा धमाका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 एप्रिल 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 एप्रिल 2026 | गुरुवार
Embed widget