एक्स्प्लोर

SDRF बोट दुर्घटना : धुळ्याच्या तीन अधिकाऱ्यांचा मृत्यू, दोन जणांचा शोध सुरु

Pravara River SDRF Boat : नगर जिल्ह्यातील प्रवरा नदीच्या पात्रात बुडालेल्यांच्या शोधासाठी गेलेली धुळ्यातील एसडीआरएफच्या पथकातील एक बोट बुडाल्याने दोन जवानांसह एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला.

Pravara River SDRF Boat : इंदापुरातील (Indapur) भीमा नदीच्या (Bhima River) पात्रात बोट बुडाली. यातील सहा जणांना शोधण्यासाठी एनडीआरएफची (NDRF) टीम या ठिकाणी आली होती. या टीमने सारे मृतदेह शोधले. परंतु त्याच वेळी एक आणखी एक दुर्दैवी बातमी समोर आली, ती म्हणजे नगर जिल्ह्यातील प्रवरा नदीच्या (Pravara River) पात्रात बुडालेल्यांच्या शोधासाठी गेलेली धुळ्यातील एसडीआरएफच्या (SDRF) पथकातील एक बोट बुडाल्याने दोन जवानांसह एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, प्रवरा नदीत बुडालेल्या युवकाचा शोध घेण्यासाठी आलेल्या धुळे (Dhule) येथील एसडीआरएफ पथकाची बोट आज सकाळी उलटली. या पथकातील चार जण आणि स्थानिक असे पाच जण प्रवरा नदी पात्रात बुडाले. यातील तीन जणांचे मृतदेह सापडले असून अन्य दोन जणांचा शोध सुरू आहे. काल बुधवारी दुपारी अकोले तालुक्यातील सुगाव बुद्रुक येथे प्रवरा नदीपत्रात पोहण्यासाठी गेलेले सागर पोपट जेडगुले (25) व अर्जुन रामदास जेडगुले (18) हे दोघे तरुण बुडाले होते. त्यातील सागर जेडगुले याचा मृतदेह बुधवारी सापडला तर अर्जुन जेडगुले याचा शोध सुरू होता. या तरुणाचा शोध घेण्यासाठी एसडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले. 

धुळ्यातील तिघांचा मृत्यू 

या तरुणाचा तपास सुरू असतानाच शोध पथकाची बोट उलटून पथकातील पाच जण आणि स्थानिक युवक गणेश मधुकर देशमुख असे सहा जण बुडाले.  धुळे एसडीआरएफ बलगट क्रमांक 6 चे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शिंदे, पोलिस शिपाई वैभव वाघ व पोलीस शिपाई राहुल पावरा या तिघांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या या दुर्दैवी मृत्यूमुळे पोलीस दलासह जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. तर पंकज पंढरीनाथ पवार, अशोक हिम्मतराव पवार कॉन्स्टेबल या दोघांना वाचवण्यात यश आले आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. तसेच गणेश मधुकर देशमुख (वाकचौरे) आणि अर्जुन रामदास जेडगूले यांचा शोध अद्याप सुरु आहे. 

भोवऱ्यामुळे दुर्घटना झाल्याचा अंदाज

दरम्यान, सुगाव बुद्रुक येथे प्रवरा नदी पात्रातील पाझर तलावामधून पडणाऱ्या पाण्याचा दाब अधिक असून तेथे भोवरा असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे ही दुदैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान घटनास्थळी माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. किरण लहामटे, माजी आमदार वैभव पिचड यांनी घटनास्थळी भेट दिली. स्थानिक नागरिकांसह अकोले तालुक्यातील नागरिकांनी परिसरात मोठी गर्दी केली आहे.

आणखी वाचा 

नाशिक, प्रवरा, उजनी आणि राज्यात 22 जणांचा बुडून मृत्यू, सात दुर्घटनांनी महाराष्ट्र हादरला!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नोकऱ्या अन् पगारवाढ देणारं देशातील 1 नंबरचं शहर बंगळुरू; मुंबई कितव्या स्थानी, सरकारी वेतन किती?
नोकऱ्या अन् पगारवाढ देणारं देशातील 1 नंबरचं शहर बंगळुरू; मुंबई कितव्या स्थानी, सरकारी वेतन किती?
चिंचवड मतदारसंघात मोठा ट्विस्ट; शिवसेना ठाकरेंचा नेता करतोय भाजपचा प्रचार,सांगितलं राज'कारण'
चिंचवड मतदारसंघात मोठा ट्विस्ट; शिवसेना ठाकरेंचा नेता करतोय भाजपचा प्रचार,सांगितलं राज'कारण'
Kolhapur News : कोल्हापूर दक्षिण, चंदगड, करवीर, हातकणंगले, अन् राधानगरीत दारुचा अक्षरश: महापूर! 10 मतदारसंघात आत्तापर्यंत 10 कोटी 71 लाखांचा अवैद्य मुद्देमाल जप्त
कोल्हापूर दक्षिण, चंदगड, करवीर, हातकणंगले, अन् राधानगरीत दारुचा अक्षरश: महापूर! 10 मतदारसंघात आत्तापर्यंत 10 कोटी 71 लाखांचा अवैद्य मुद्देमाल जप्त
मुंबईत 1 किलो 950 ग्रॅम सोन्याच्या बांगड्या जप्त; निवडणूक काळातच भरारी पथकाची मोठी कारवाई
मुंबईत 1 किलो 950 ग्रॅम सोन्याच्या बांगड्या जप्त; निवडणूक काळातच भरारी पथकाची मोठी कारवाई
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Full Dindoshi | 'बाण' ते 'खान' दिंडोशींच्या सभेत राज ठाकरे उद्धव ठाकरेंवर कडाडले!ABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 8 PM 11 November 2024Kishori Pednekar on Amit Thackeray | अमित ठाकरे हे आक्रमक नाही तर उद्धट, पेडणेकरांची टीकाZeeshan Siddique Mumbai : रेकॉर्ड ब्रेक मतांनी यावर्षी मी निवडून येणार आहे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नोकऱ्या अन् पगारवाढ देणारं देशातील 1 नंबरचं शहर बंगळुरू; मुंबई कितव्या स्थानी, सरकारी वेतन किती?
नोकऱ्या अन् पगारवाढ देणारं देशातील 1 नंबरचं शहर बंगळुरू; मुंबई कितव्या स्थानी, सरकारी वेतन किती?
चिंचवड मतदारसंघात मोठा ट्विस्ट; शिवसेना ठाकरेंचा नेता करतोय भाजपचा प्रचार,सांगितलं राज'कारण'
चिंचवड मतदारसंघात मोठा ट्विस्ट; शिवसेना ठाकरेंचा नेता करतोय भाजपचा प्रचार,सांगितलं राज'कारण'
Kolhapur News : कोल्हापूर दक्षिण, चंदगड, करवीर, हातकणंगले, अन् राधानगरीत दारुचा अक्षरश: महापूर! 10 मतदारसंघात आत्तापर्यंत 10 कोटी 71 लाखांचा अवैद्य मुद्देमाल जप्त
कोल्हापूर दक्षिण, चंदगड, करवीर, हातकणंगले, अन् राधानगरीत दारुचा अक्षरश: महापूर! 10 मतदारसंघात आत्तापर्यंत 10 कोटी 71 लाखांचा अवैद्य मुद्देमाल जप्त
मुंबईत 1 किलो 950 ग्रॅम सोन्याच्या बांगड्या जप्त; निवडणूक काळातच भरारी पथकाची मोठी कारवाई
मुंबईत 1 किलो 950 ग्रॅम सोन्याच्या बांगड्या जप्त; निवडणूक काळातच भरारी पथकाची मोठी कारवाई
Uddhav Thackeray Full Speech Vani : यवतमाळला बॅगा तपासल्यानंतर उद्धव ठाकरेंचं स्फोटक भाषण
Uddhav Thackeray Full Speech Vani : यवतमाळला बॅगा तपासल्यानंतर उद्धव ठाकरेंचं स्फोटक भाषण
VIDEO : कन्नडच्या भरसभेत घड्याळ दाखवले, मुख्यमंत्री आपल्याच खासदारावर का चिडले? 
कन्नडच्या भरसभेत घड्याळ दाखवले, मुख्यमंत्री आपल्याच खासदारावर का चिडले? 
मोठी बातमी : संगमनेरमध्ये सोनाराच्या दुकानात भरदिवसा दरोडा, चोरट्यांचा हवेत गोळीबार करत दहशत माजवण्याचा प्रयत्न
मोठी बातमी : संगमनेरमध्ये सोनाराच्या दुकानात भरदिवसा दरोडा, चोरट्यांचा हवेत गोळीबार करत दहशत माजवण्याचा प्रयत्न
मुख्यमंत्री शिंदेंचं कौतुक, महायुतीला निवडून देण्याचं हिंदुंना आवाहन; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंदांनी सांगितलं 'कारण'
मुख्यमंत्री शिंदेंचं कौतुक, महायुतीला निवडून देण्याचं हिंदुंना आवाहन; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंदांनी सांगितलं 'कारण'
Embed widget