एक्स्प्लोर

OBC Mahaelgar Melava : अहमदनगरमध्ये आज ओबीसींचा महाएल्गार; मराठा आरक्षणाच्या अध्यादेशानंतर आज पहिलाच मेळावा

OBC Mahaelgar Melava : ओबीसींचा महाएल्गार मेळावा आज दुपारी तीन वाजता मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत होत आहे. मराठा आरक्षणाच्या अध्यादेशानंतर हा पहिलाच मेळावा अहमदनगरमध्ये होत आहे.

OBC Mahaelgar Melava अहमदनगर : येथील क्लेरा ब्रूस हायस्कूल मैदानावर आज (दि. 03) ओबीसींचा (OBC) महाएल्गार मेळावा दुपारी तीन वाजता पार पडणार आहे. या मेळाव्याची जोरदार तयारी करण्यात आली आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा होणार आहे. मराठा आरक्षणाच्या अध्यादेश निघाल्यानंतर हा पहिला मेळावा अहमदनगरमध्ये (Ahmednagar) होत आहे. या मेळाव्याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. 

या मेळाव्याला दीड ते दोन लाख ओबीसी बांधव येतील, असा दावा आयोजकांकडून करण्यात आलेला आहे. या महाएल्गार मेळाव्यात राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आमदार राम शिंदे,आमदार गोपीचंद पडळकर, माजी मंत्री महादेव जानकर , आमदार प्रकाश शेंडगे, कल्याण दळे, लक्ष्मण गायकवाड , शब्बीर अन्सारी,  पी.टी चव्हाण , दौलत शितोळे, सत्संग मुंडे, लक्ष्मण हाके या ओबीसी (OBC) नेत्यांची उपस्थिती असणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. 

25 हजार हरकती भरवून घेणार

विशेष म्हणजे या मेळाव्या दरम्यान मराठा आरक्षणावर हरकती घेणाऱ्या जवळपास 25 हजार अर्जंट वाटप करून ते अर्ज भरून घेतले जाणार आहेत. त्यासाठी स्वतंत्र व्यवस्था या महाएल्गार मेळाव्याच्या ठिकाणी असणार आहे, अशी माहिती समता परिषदेचे राज्य उपाध्यक्ष अंबादास गारुडकर यांनी दिली आहे. 

500 स्वयंसेवक तैनात

या मेळाव्याच्या नियोजनासाठी सात वेगवेगळ्या समित्या गठित करण्यात आल्या असून जवळपास 500 स्वयंसेवक तैनात असणार आहेत. ओबीसी महाएल्गार मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी सात समित्या नियुक्त करण्यात आल्या आहेत. ज्यात पाणीवाटप समिती, पार्किंग समिती, वाहतूक नियमन समिती, आरोग्य समिती ,नाश्ता वाटप समिती, मुख्य स्टेज नियोजन समिती यांचा समावेश करण्यात आलेला आहे. तर मेळावा परिसरामध्ये तीन कार्डीयाक रुग्णवाहिकांसह पाच रुग्णवाहिका असतील, ठिकठिकाणी मेडिकल किटचे वितरण करण्यात येणार आहे. या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर सात ठिकाणी वाहन पार्किंग व्यवस्था करण्यात आलेली आहे.

छगन भुजबळांची तोफ धडाडणार

मागील काही दिवसांपासून मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यामध्ये कायमच कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळाला. त्यामुळे या महाएल्गार मेळाव्यात छगन भुजबळ काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

आणखी वाचा 

संजय राऊत हाजीर हो...! दादा भुसे बदनामी प्रकरणी आज मालेगाव न्यायालयात सुनावणी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Pune Crime: क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट, म्हणाले, 'शरद पवारांच्या पत्रामुळेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली'
त्यावेळी आम्ही शरद पवारांच्या सूचनेनुसार वागत होतो; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : मोदींच्या सभेत फक्त पाच हजार लोकं होती; त्यातील निम्मे भाड्याची माणसंABP Majha Headlines :  9 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadnavis  : मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही - देवेंद्र फडणवीसRohit Pawar on Kangana Ranaut : रोहित पवारांचा कंगना रणावत यांच्यावर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Pune Crime: क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट, म्हणाले, 'शरद पवारांच्या पत्रामुळेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली'
त्यावेळी आम्ही शरद पवारांच्या सूचनेनुसार वागत होतो; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
Raj Thackeray: रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
Embed widget